मंगेशाची आरती2

आरती  > शिव आरती Posted at 2018-03-27 17:50:18
जय देव जय देव जय जी मंगेशा । आरती ओवाळूं तुजला सर्वेशा ॥ धृ. ॥ महास्थान तुझे गोमांतक प्रांती । भावेकरुनी करितां तुजला आरती ।। महाभक्त तुझे निशिदिनिं गुण गाती । मी तो दास तुझ्या चरणांची माती ॥ जय. ॥ १ ॥ धरिलासी अवतार दुष्टां माराया । साधूसंत जन पृथ्वी ताराया ॥ भक्तांचा तारक तूं मंगेशराया । सर्प अक्षय करितो तुजवरती छाया ॥ जय. ॥ २ ॥ दु:खदारिद्रादिक ही विघ्नें निवारी । संकष्टापासूनी मजलागीं तारीं ॥ शक्ती घेऊनि करीं दृष्टां संहारी । जैसा धेनू रक्षी कृष्ण नरकारी ॥ जय. ॥ ३ ॥ तत्व गुणवर्णन करितां पुण्याचे चेव । तुझिया चरणी आहे माझा दृढ भाव । तुझे देवालयीं बहुयचि उत्साह । मोरेश्वर तुज नमितो चरणी ठाव ॥ जय. ॥ ४ ॥

Search

Search here.