मारुती स्तोत्र

स्तोत्र - मंत्र  > हनुमान स्तोत्र Posted at 2018-03-30 07:11:57
मारुती स्तोत्र भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती . वनारि अंजनीसूता रामदूता प्रभंजना .. १.. महाबळी प्राणदाता सकळां उठवी बळें . सौख्यकारी दुःखहारी धूर्त वैष्णव गायका .. २.. दीनानाथा हरीरूपा सुंदरा जगदांतरा . पातालदेवताहंता भव्यसिंदूरलेपना .. ३.. लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना . पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका .. ४.. ध्वजांगें उचली बाहो आवेशें लोटला पुढें . काळाग्नि काळरुद्राग्नि देखतां कांपती भयें .. ५.. ब्रह्मांडें माइलीं नेणों आंवळे दंतपंगती . नेत्राग्नि चालिल्या ज्वाळा भ्रकुटी तठिल्या बळें .. ६.. पुच्छ तें मुरडिलें माथां किरीटी कुंडलें बरीं . सुवर्णकटिकांसोटी घंटा किंकिणि नागरा .. ७.. ठकारे पर्वताऐसा नेटका सडपातळू . चपळांग पाहतां मोठें महाविद्युल्लतेपरी .. ८.. कोटिच्या कोटि उड्डणें झेपावे उत्तरेकडे . मंदाद्रीसारिखा द्रोणू क्रोधें उत्पाटिला बळें .. ९.. आणिला मागुती नेला आला गेला मनोगती . मनासी टाकिलें मागें गतीसी तूळणा नसे .. १०.. अणूपासोनि ब्रह्मांडायेवढा होत जातसे . तयासी तुळणा कोठें मेरुमांदार धाकुटें .. ११.. ब्रह्मांडाभोंवते वेढे वज्रपुच्छें करूं शके . तयासी तुळणा कैंची ब्रह्मांडीं पाहतां नसे .. १२.. आरक्‍त देखिलें डोळां ग्रासिलें सूर्यमंडळा . वाढतां वाढतां वाढे भेदिलें शून्यमंडळा .. १३.. धनधान्य पशुवृद्धि पुत्रपौत्र समग्रही . पावती रूपविद्यादि स्तोत्रपाठें करूनियां .. १४.. भूतप्रेतसमंधादि रोगव्याधि समस्तही . नासती तूटती चिंता आनंदे भीमदर्शनें .. १५.. हे धरा पंधराश्लोकी लाभली शोभली भली . दृढदेहो निःसंदेहो संख्या चंद्रकलागुणें .. १६.. रामदासीं अग्रगण्यू कपिकुळासि मंडणू . रामरूपी अन्तरात्मा दर्शने दोष नासती .. १७.. .. इति श्री रामदासकृतं संकटनिरसनं नाम श्री मारुतिस्तोत्रम्‌ संपूर्णम्‌ ..

Search

Search here.