कडकडिला स्तंभ गडगडिले गगन

आरती  > विष्णु आरती Posted at 2018-03-29 14:39:59
कडकडिला स्तंभ गडगडिले गगन अवनी होत आहे कंपायमान तडतडली नक्षत्रे पडताती जाण उग्ररूपे प्रगटे तो सिंहवदन ।। १ ।। जयदेव जयदेव जय नरहरीराया आरती ओवाळू महाराजवर्या ।। ध्रु॰ ।। एकवासी स्वर्गमाळा डळमळली कैसी ब्रह्मयाच्या वाटे अभिनव चित्तासी चंद्रसूर्य दोन्ही लोपती प्रकाशी कैलासी शंकर दचके मानसी ।। २ ।। जय... थरथरती त्या जटा जिव्हा लळलळित तीक्ष्ण नखे तो दैत्य बिदारिन अर्धांगी कमलजा शिरी छाया धरीत माधवदास स्वामी नरहरी शोभत ।। ३ ।। जय...

Search

Search here.