नारायण बळी नागबळी माहिती
यज्ञ - शान्ति > पूजन कर्म विधी Posted at 2016-04-03 12:52:11
Narayana Nagbali
नारायण नागबली
भाग नं- 1
॥ श्री ॥
॥ श्री त्र्यंबकेश्वर प्रसन्नोस्तु ॥
नारायण नागबली : संततीदायक व पीडानिवारक
नारायणबली व नागबली विधी
हे दोन विधीचे नांव आहे. श्रीमन्नारायणादि पंचदेवतांना उद्देशून अतिश्रद्धेने दिलेले समंत्रक ओ विधीयुक्त असे जे अन्नोदक द्रव्यादी त्यास नारायणबली असे म्हणतात.
अष्टनागांना उद्देशून त्याचे समाधानाकरिता श्रद्धेने दिलेले समंत्रक विधीयुक्त, तिल, दर्भ, अन्नोदक, दूध इत्यादि अर्पण करणे यांस नागबली असे म्हणतात. या दोन्ही विधीस धर्मशास्त्रात ++ सकामश्राद्ध असे संबोधले आहे. शास्त्रकारांनी + पुत्रप्राप्ती, संततीस सौख्य, दुर्धर शरीर पीडा व योगक्षेमात वारंवार व्यत्यय येणे ह्या ज्या मानवी जीवनात येणाऱ्या अप्रिहार्य अडचणी आहेत यांचा परिहार होण्यासाठी हा विधी प्रामुख्याने करावा असे सांगितले आहे.
++ प्रेतोपद्रव्यादि संतंतीप्रतिबंधशरीरपीडानाशकत्वात सकामश्राद्ध भण्यते । ( गो. वि. दर्श )
+ कृते गर्भाधाने यदि गर्भोत्पत्यभावो मृतापत्या वा तदा प्रतिबंधक प्रतोपद्रवनिवृत्यर्थ नारायणबलीर्नांगबलिश्च कार्य ।
देशनिर्णय
उपायांची यथार्तता
अपत्यांचे महत्त्व
पिशाच्चबाधा निवारण
सर्पवध दोष
मानव व सर्प उत्पत्ती साम्य
ज्योतिष-शास्त्राप्रमाणे
मुहुर्त विचार
उत्तम दिवस व नक्षत्र
नारायण नागबली कर्माचे अधिकारी
स्थलवर्णन
धार्मिक खर्च
पूर्व तयारी
कुशावर्त तीर्थावरील विधी
प्रधान संकल्प
संकल्पाचा अर्थ
नारायणबली विधी
बलिप्रदान
( भ. सिं. पा. २३३
भाग नं २
देशनिर्णय :- हा विधी श्रीक्षेत्र त्र्यंबकेशोअर येथेच फक्त केला जातो. आज हजारो वर्षांची * परंपरा व शास्त्रप्रामाण्य या दोन्ही गोष्टी मुळेच येथे ह विधी करतात. ``निर्णयसिंधु'' या ग्रंथात नारायण नागबली हे सकाम श्राद्ध त्र्यंबकेश्वराच्या भूमीशिवाय इतरत्र करु नये असे स्पष्ट सांगितले आहे. ( नि. सिं. पान ४१४ पहा) याचे कारण शास्त्रकारांनी असे सांगितले आहे की ** ब्रम्हगिरीपर्वत हे पृथ्वीतलावर शंकराचे आद्य स्वरुप आहे. त्या ब्रम्हगिरीपासूनच पतितपावनी गौतमी गंगेचा उगम झाला आहे. भूतनाथ महामृत्युंजय श्री त्र्यंबकेश्वर महाराजांचे ज्या भूमीत कायम वास्तव्य आहे अशी श्रीत्र्यंबकेश्वर येथील भूमी सर्व पृथ्वीतलावर अत्यंत पवित्र आहे. म्हणूनच हा विधी येथे करावा. येथे केल्याने तो सद्यः फलदायी होतो, म्हणूनच तो इतरत्र करु नये असे स्पष्ट सांगितले आहे.
उपायांची यथार्तता :- हाविधी येथेच करण्याची अविच्छिन्न परंपरा आहे. ह विधी प्रामुख्याने अनपत्यता दूर होऊन संततिसौख्य लाभावे म्हणुन केला जातो. या करिता पतिपत्नी यांच्या शरीरातील दोष हे संतती न होण्यास एक दुष्ट कारण आहे.
आता शरीरात बिघाडही बाह्य करणाने घडू शकतात. बाह्य शितोष्णादी विकारांनी शरीरात शीतोष्ण बाधा होतात. असा अनुभव आहे. त्याचप्रमाणे अनपत्यतेंसहि दोन कारणे असू शकतात. एक इन्द्रियजन्य कारण, दुसरे इन्द्रियातील कारण असू शकते. जी गोष्ट बुद्धिगम्य होत नाही, येथे बुद्धिची गति कुंठित होते, अशा वेळी मानवाने वेदशास्त्रांचाच आधार घेतला पाहिजे कारण आमचे वैदिक तत्त्वज्ञान अदृष्ट
* पितुराज्ञा पुरोधाय कृते धर्मेण वै पुरा । त्रिशंकुस्वर्गंकामेन हरिश्चन्द्रेण वैकृतः । विधीत्रयप्रसंगेण मया संप्राथितः शिवः । सार्धं सुदर्शनैस्सांभ पुत्ररत्नमवाप्तये ॥
** सह्यस्यचो द्र्वो यत्र यत्र गोदावरी नदी । पृथिव्यमपि कृत्स्नायांस प्रदेशोऽति पावन ।
भाग नं. ३
कारणांचा निर्णय करुन त्यावर * उपाय सांगणारे आहे. थोडक्यांत मानवी शाक्तीच्या आतोक्याबाहेरचे परंतु मनुष्य प्रयत्न साध्य, अखिल साध्य साधनांचा अविष्कार वेदांत सांगितला आहे. ते वेद ज्या ऋषींनी पाहिले त्यास मंत्रदृष्टे म्हणतात. त्या मंत्रदृष्ट ऋषींनी मानवाचे कल्याणाकरिता जी जी कर्मे सांगितली आहेत, त्यातीलच हा एक भाग आहे. ज्यावेळी शरीरांतील दोष हे कारण नसतांही संतति प्राप्त होत नाही असे अनुभवास येते ; त्यावेळी त्यास अदृष्ट कारण परंपरा असलीच पाहिजे. त्या अदृष्ट कारण परंपरेचा समन्वय करूनच वेदाने हे अनुष्ठान करण्यास सांगितले आहे.
अपत्यांचे महत्त्व :- मानवांचा गृहस्थाश्रम संततिशिवाय सफल होत नाही. गृहस्थाश्रमांतील सौख्याचा ठेवा ``कुलदीपक पुत्र'' मानला जातो. म्हणूनच महाकवी भवभूतीने म्हटले की, ``अंतःकरण तत्त्वस्य दंपत्योः स्नेहसंस्त्रवात । आनंदग्रंथीरेकोंय अपत्यमिति पठ्यते '' ॥ ऐहिक सुख व ** पारलौकिक गति ह्या दोन्ही गोष्टी अपत्यलाभानेच मिळतात. या लोकी नानाविध दुःखानी मनुष्य पोळला जातो. मागे वर्णन केल्याप्रमाणे अजिबात संतति नसणे, जीवित संततीस आरोग्य नसणे, शरीरास कायम रोगपीडा असणे, योगक्षेम व्यवस्थित न चालणे, यास दृष्टा कारणपंरपरा असलीच पाहिजे. याचा विचार त्यांनी प्रथम करून ती कारणे प्रथम नमूद केली आहेत -
१) पूर्वजन्मी केलेले विशिष्ट कृत्य द्रव्यापहरनादि, २) या जन्मी केलेले विशिष्ट कृत्य, ३) वामकर्मी अभिचारयोग, (मंत्रतंत्रादि) ४) पितर, आप्त अगर इतर संबंधित यांस गति नसणे, ५) प्रेत लोकांतील पैशाचादिकांची पीडा असणे, ६) नागवध करणे .
_____________________________________
* प्रत्यक्षेणानुमित्या वा यस्तूपायो न बुद्धते । एनं विन्दति वेदेन तस्माद्वेदस्य वेदता ॥
** यस्य वै मृत्युकाले तु व्युच्छिन्ना संततिर्भवेत । स वसेन्नरके नित्यं पंकमग्ना करी यथा ।
भाग नं. ४
या सहा करणांनी विशेषेकरून अनपत्यादि दुःखे प्राप्त होतात, असे त्यास आढळून आले. आता वरील कारणांचा खुलासेवार विचार करू. पितरांस गति नसणे. म्हणजे सृष्टिकर्माप्रमाणे त्यास पितृलोक न मिळणे, म्हणजे त्यांची तृप्ती नसणे यामध्ये पुष्कळशा गोष्टी अंतर्भूत आहेत. शास्त्रकारांनी असे ठरविले आहे की ज्ञानराज्याचे संचालक ऋषी आहेत. आधिदेव कर्मराज्यांचे संचालक देवतागण आहेत व अधिभूत अधिभौतिक स्थूल राज्याचे संचालक नित्य पितर आहेत. र्थात पितरांचे तृप्तीने ऐहिक सुखाचा लाभ होतो त्यांची तृप्ति म्हणजे (१) त्यांना उद्देशून श्राद्ध करणे. आता श्राद्ध म्हणजे काय याचाही विचार क्रमप्राप्तच आहे. श्राद्ध या शब्दांत श्रद्धा हा मुख्य शब्द आहे. आपला जन्म ज्या कुलात झालेआ असतो त्या कुलातील तसेच मातामहादि कुलातील मृत पूर्वाजांच्या (प्रेत व पितर ) तृप्तीकरिता तसेच त्यांच्या तृप्तीने लाभणारी सत्संतति व चिरसंपत्ती याकरिता तिलदर्भादिकांनी सविधी दिलेल्या अन्नीदकरुप पितृयज्ञाला श्राद्ध असे म्हणतात. श्राद्धावाचून कितीही पवित्र व कितीहि मूल्यवान पदार्थ पितर ग्रहण करू शकत नाहीत श्रद्धापूर्वक असूनही बिनां मंत्राने दिलेले अन्नोदक पितरांना मिळत नाही असे स्कंद पुराण, माहेश्वर खंड, कुमारिका खंड अध्याय ३५-३६ या मध्ये सांगितले आहे. (१) हे पितर कर्माधीन नाहीत. या नित्य पितरांचे २१ गण आहेत ते श्राद्ध भाग पोहोचविण्याचे काम करतात. श्राद्धादि पितृकार्ये करणारा निरोगी, दीर्घायु, सुपुत्रवान, श्रीमान, धनोपार्जक असा होतो व परलोकी त्यास तृप्ती मिळते; म्हणूनच साधन सोडून साध्याची प्राप्ती कशी होणार ? यावरून * ऐहिक व पारलौकिक सुख देण्यास पितर कारणीभूत आहेत ही गोष्ट लक्षात येईलच. आता यात आणखी एक गोष्ट विचारणीय आहे. ती म्हणजे आपणास आपले पितरापैकी कोणास योग्य गति मिळाली व कोणास कोणत्या कारणाने मिळाली नाही हे समजण्यास काहीच मार्ग नाही. तेव्हा ज्यांना गति मिळाली नाही
________________________________________
* आयुःप्रजां धनं विद्यां स्वर्ग मोक्षंसुखानि च । प्रयच्छन्ति यथाराज्य नृणां प्रीताः पितामहा ॥
भाग नं. ५
अशा पितरांकरिता काय केले असता आपण त्या ऋणातून मुक्त होऊ याचा विचार आमचे ऋषींनी केला आहे. या कालांत पितृकर्माचा पूर्णपणे लोप झाला आहे. त्यामुळे सुखांचाहि नाश होत आहे; गृहस्थाश्रम म्हणजे पितरांची आराधना होय. गृहस्थाश्रमाच्या पूर्णतेस या पितरांचा अनुग्रह अत्यावश्यक आहे. पितृशापानेच * संततीविच्छेद होतो. योग्य बांधवाशीहि वैर उत्पन्न होते. पशू, द्रव्य यांचा विनाश होतो. मनुष्य व्यसनधीन होतो, अशी दुःखे निर्माण होतात. कुटुंबातील लोक धर्माभ्रष्ट व नीतिभ्रष्ट होतात. थोडक्यात म्हणजे घरांची कळच नष्ट होते. म्हणून या दुःखाचे निवृत्तिकरिता शास्त्रकारांनी उपाय योजना केली आहे की, पितराचे उद्देशाने ** पवित्र स्थळी, योग्य काली सत्पात्र पाहून विधियूक्त प्रकारे जे अन्न आहार द्रव्यादि अति श्रद्धेने दिलेले असते त्याला श्राद्ध असे म्हणतात. तोच हा नारायणबली विधी होय. पित्रार्जित संपत्तिकरिता व कर्तव्य म्हणून त्यांचे वृद्धापकाळी त्यांची सेवा करणे हे असे कर्तव्य आहे. तसेच मरणोत्तरहि त्यांचा अर्यमादि पितृदेवाकरिता आणि जगत्पालनकर्त्या विष्णूप्रीत्यर्थ तसेच सत्संतति व चिरसंपत्ति यांच्या लाभाने पूर्ण होणाऱ्या गृहस्थधर्माकरिता, हे अनुष्ठान प्रथम *** वेदानेच निर्माण केले आहे. आपले वंशातील सर्व मृतात्म्यांना प्रेत लोकांतून पितृलोक मिळावा हाच हा विधी करण्याचा उद्देश आहे. शास्त्राने सांगितलेला जो एकंदर श्राद्ध विचार आहे त्यातील हाच भाग प्रामुख्याने
____________________________________________
* एकस्य पुत्रनाशः स्यात ।एको दुहितरं लभेत । विरोधी बन्धुभिः सार्धं । प्रेतदोषास्ति मे खग ॥ संततिदृश्यते नैव समुत्पन्ना विनश्यति । प्रकुस्तेस्तु विप्र्यासी विद्विषो सहबन्धुघिः ॥ पशु द्रव्य विनाशः स्थात सा पीडा प्रेतसंभवा ॥
** देशे काले च पात्रे च श्रद्धया विधिना च यत ।
पितृनुद्दिश्य विप्रेभ्यो दानं श्राद्ध उदाहृनम ॥
*** पितृणां लोकमपि गच्छतु ये मृताः ( अथर्व वेद १२-२-४५)
भाग नं. ६
आहे. म्हणून त्यांनी * पुत्र शब्दाची व्याख्या केली आहे. यावरुन पारलौकिक सुख देण्यासहि पुर हाच कारणीभूत आहे. म्हणजे ते त्यांचे कर्तव्य आहे. या संबंधी शास्त्रातील आणखीहि पुरावे देता येतील. परंतु विस्तार भयास्तव नको. तरी या विधीच्या कारणांचा उद्देश या विवेचनावरुन लक्षांत येईलच.
पिशाच्चबाधा निवारण :- आता दुसरे कारणांचा विचार करू. या जन्मी अगर मागील जन्मी एखाद्याचे द्रव्य, घर, शेती, वगैरे ऐहिक सुखसाधने यांचा अपहार करणें. आता अपहरण ज्याचे होते तो जीवात्मा त्या त्या प्रियतम वस्तुमध्ये तन्मय झालेला असतो. त्याचे जिवंत असताना झालेले संस्कार, असलेला निश्चय, विशिष्ट देहाचे ठिकाणी असणारा मी पणाचा अभिमान ** मृत्यूनंतरहि असतो. जीव *** हा त्याचे भावनेप्रमाणे, कल्पनेप्रमाणे व निश्चयाप्रमाणे बनतो; असे जिवाला उद्देशून उपनिषदात सांगितले आहे. जीव हा मनोमय म्हणजे वासनामय आहे. तो वासनेप्रमाणें शरीर धारण करतो व वासनेप्रमाणे शरीरास वागवतो व सर्व क्रिया करतो. देहपातानंतर सूक्ष्म देहाचे प्राधान्य असते. हा सूक्ष्म देह **** वासनामय असतो. वासना मनोमय असते व मन वासनामय असते. सूक्ष्म देअह नष्ट झाल्यावर प्राप्त होणारा अतिबाहिक सूक्ष्म देह पंचतन्मात्रा सूक्ष्म पांच ज्ञानेन्द्रिये ( मन, बुद्धि, चित्त, अहंकार व जीव अन्तकरण चतुष्टच या मिळून होतो ) तो केवळ मनोमय असतो. या विवेचनावरून ``अन्ते मतिः सा गतिः । या नियामाप्रमाणे त्या
____________________________________________
* पुँनाम नरकात त्रायतें इति पुत्रा ः ॥
** सयत्क्रतुरस्मिल्लोके भवति । तदेतत्प्रेय भवति । अद्य खलु ऋतूमय पुरुषः ( श्रुतिवाक्य) मृत्युनंतरहि वासनेप्रमाणे जीवात्मा जन्म घेतो असे सांगत आहे.
*** मनोमय प्राण शरीरनेता ।
**** वासनात्मकं मनः ।
भाग नं. ७
जीवात्म्यास गति मिळत नाही. तो जीवात्मा सूक्ष्म असल्यामुळे त्याच वसनेप्रमाणे वासनेशी * संबंधीत असलेल्या लोकांना ** तो पीडा देतो. याप्रमाणे सृष्टिक्रमानुसार गति मिळत नाही तो पैशाचिक्र योनीत जातो. अशा रितीने पैशाचादिक बाधा होते. या जन्मी अगर मागील जन्मी आपण केलेल्या कर्मांचा तो परिपाक असतो. तो दूर होण्याकरिता शास्त्रकारांनी असे सांगितले आहे की, सर्व व्याधि व पीडा आपल्या कर्मानेच दूर होतात व त्याचे निवारण औषधि दान, जप, होम देवानौष्ठान यांनी होते, असे शास्त्रवचन आहे. येथेही पीडा देणाऱ्याचे ज्ञान आपणास नसते. तसेच कारण परंपराही माहित नसते. म्हणूनच या विधीद्वारा, औषधीच्या उपयोगांनी, तसेच ब्राह्मणांना दिलेल्या दानाने, जेवू घातलेल्या अन्नाने, ब्राह्माणाकडून योग्य स्थळी केलेल्या अनुष्ठानाने आपली ग्रहपीडा, भूतबाधा, रोगबाधा नष्ट होतात हा अनुभव आहे. येथे सूक्ष्म देहाचे प्राधान्य गृहीत धरले जाते. पूर्वजन्म कर्मानेच अगर या जन्मीच्या अत्युत्कट पापाने दुःखाची प्राप्ती होते. पूर्व कर्म सूक्ष्म देह रुपानेच येथे असते. त्याचे फल सूक्ष्म देहानेच अयेथे देत असते. म्हणून संकल्पाने दिलेले अन्न-आहारादि संकल्परूप वासनामय सूक्ष्म देहावर परिणाम करू शकते. याप्रमाणे असलेली पैशाचिक बाधा दूर होऊन संतति प्रतिबंधक वगैरे दुःखे नाहीशी होतात.
सर्पवध दोष :- आता सर्पवध केल्याने संततीय प्रतिबंध होतो या कारणाचा विचार करू. मागे आहेच की वासनेप्रमाणे
______________________________________________
* आकाशात वायुमागत्य वायोरम्भो व्रजत्यथ अद्भ्योमेभ समासाद्य ततो वृष्टिर्भवेदसो । ततो धान्य धान्यानिभक्षाणि जायते कर्मचोदितः योनिमन्ये प्रपद्यन्ते शरीरावयदेहिन ॥
** जन्मान्तरकृतं कर्म व्याधिरूपेन बाधते तर्च्छांतिरौषथैर्दानैजंहोम सुरार्चंनै ः ।
भाग नं. ८
जन्म येतो. ज्यावेळी वासनेची परिणति वासनेपासूनच उत्पन्न होणारे कामक्रोधादि यांच्या अतिरेकात होते. * गीतेमध्ये असे वर्णन केले आहे. की, विषयांचे ठिकाणी तादात्म्य बुद्धि निर्माण झाल्यावर त्यापासून विषयाच्या प्राप्तीची इच्छा निर्माण होते. तो विषय उपलब्ध झाला नाही अगर त्यात अडथळे निर्माण झाले तर क्रोध निर्माण होते. क्रोधाची परिणति सारासार विचार-शून्यतेत होते. व पुढें बुद्धि नाशा होऊन त्याचे मानवत्व संपते अशी परंपरा सांगितलेली आहे. ज्यावेळी वर सांगितल्याप्रमाणे तीव्रवर वासनेची परिणती मानवत्व नाहीसे होण्यात होते. त्यावेळी त्यास सर्पयोनी प्राप्त होते. सर्वच सर्पयोनी याच कारणांनी जन्मास येते असे मात्र समजू नये. मात्र सर्प योनीत तो जीवात्मा जातो इतकेच सांगावयाचे आहे. सर्पयोनीचा व मानवाचा अत्यंत निकटवर्ति असा संबंध आहे. कारण महाभारतात असे वर्णन आहे की, ब्रह्मदेवापासून सप्तऋषी निर्माण झाले, त्यातील एका मरीची ऋषीचा मुलगा काश्यप ऋषी. त्यास दोन बायका होत्या, एकीचे नांव कद्रू व दुसरीचे विनता असे होते. कद्रूला सर्प झाले व विनतेला गरुड झाला. याप्रमाणे मानवाचा व नागयोनीचा निकटवर्ती संबंध आहे. नागयोनीतही मानवाप्रमाणे चातुर्वर्ण्य आहे असे वर्णन मिळते. यावरुन मानवाचा व सर्पाचा शास्त्रीय दृष्ट्या काय संबंध आहे याचा विचार करु कारण या विधीत मानवाप्रमाणे सर्पांचा अंत्यविधी करुन श्राद्ध, पिंडदान वगैरे करतात. म्हणूनच शास्त्रीयदृष्ट्या दोषांचे उत्पत्तीशी साम्य कसे येते याचा विचार करणे जरुर आहे.
मानव व सर्प उत्पत्ती साम्य - मानवाच्या उत्पत्तीचा विचार केला असता असे दिसून येते की, मानवाची उत्पत्ती जीवात्मा हा परमात्म्याचाच अंश आहे, याचे ज्ञान करुन घेणे म्हणजे परब्रह्मावस्था
__________________________________________
* संगात संजायते काम कामत्क्रोधोऽभिजायते ।
क्रोधाद भवरि संमोह संमोहात स्मृतिविभ्रमः ॥
स्मृतभ्रंशाद बुद्धिनासी बुद्धिनाशात प्रणश्यति ॥ - भगवद गीता
भाग नं. ९
प्राप्त करून घेणे होय. अल्पज्ञ जो जीवात्मा याची प्रमात्म्यासी एकरुपता निर्माण करून घेणे हेच मानवाचे ध्येय आहे. या ध्येयाची साध्यता योगशास्त्राप्रमाणे मानव शरीरात असणारी जी कुंडलिनी आहे तिचे जागृतीनेच साध्य होते. याचे वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी पुष्कळच केले आहे. ती कुंडलिनी मूलाधार चक्रामध्ये ( पाठीच्या कण्याच्या आरंभस्थळी ) असते. तिचे उत्थापनानेच मानवास ब्रह्मज्ञान ( जीवात्म ऐक्य) होते असा सिद्धांत आहे. म्हणजे मानवास मानवत्व या कुंडलिनीनेच होते. म्हणजे मानवाची वैज्ञानिक पूर्णता या कुंडलिनीचे ज्ञानानेच होते. या कुंडलिनीस सर्प ही संज्ञा शस्त्रात आहे. म्हणूनच कुंडलिनी अथवा सर्प या दोन्ही अवस्था एकच आहेत. मानवाची उत्पत्ती या कुंडलिनीपासून झाली आहे. म्हणूनच कुंडलिनी व सर्प हे एकच आहेत. य दृष्टीने सर्पांची क्रिया करण्यास शास्त्रकारानी सांगितले आहे. त्याचा वध केला असता, अगर करविला सता त्या पापाची परिणति वंश-विच्छेदनात होते असा पुत्रोत्पत्तीशी, संबंध आहे. त्या पापासून मुक्त होण्याकरिता हा विधी शास्त्राने निश्चित केला आहे. आता पुष्कळशा लोकांना असा अनुभव आहे की, पुरलेल्या द्रव्यावर ज्याने ते पुरले असेल त्या धनाशी तो जीवात्मा तादात्म्य असल्यास, तेथे तो सर्प रुपाने असतो. आता त्यास सर्प-योनी मिळाणाऱ्या कारणांचा विचार एक्ला असता असे दिसते की, आपले पुराणात वासुकी ( सर्प) याचे डोल्यावर पृथ्वी आहे असे सांगितले; याचा वैज्ञानिक अर्थ साप ( वासुकी) म्हणजे कुंडलिनी होय व तिचे डोक्यावर ही पृथ्वी म्हणजे पृथ्वीचे जड स्वरुप नसून, प्रथम तत्त्व जे अहंकार ( मीपणाची जाणीव रुप ) पृथ्वी हीच आहे असा आहे. आता जो जीव सर्प होतो त्याच्या सर्व भावना भौतिकच असतात. भौतिक वासनांची तिव्रता झाल्यानंतर तो मूलस्वरुप जी कुंडलिनी म्हणजे साप, या योनित जात असावा. म्हणूनच पुष्कळ लोकांना तसा अनुभव येतो. नागबली हा विधी केला असता नागहत्त्येच्या पापापासून होणारा त्रास नाहिसा होतो व त्या जीवात्म्यास गति मिळते असा येथे पुष्कळ अनुभव येतो. आता पुढचे कारण म्हणजे अभिचार योग. आपले
भाग नं.१०
मंत्रशास्त्रात वाममार्ग म्हणून एक प्रकार आहे की, ज्या योगे जारण मारण, उच्चाटन या क्रिया केल्या जातात त्यास अभिचार योग म्हणतात, त्या कारणानेहि शरीर-पीडा होऊन अनपत्यता संभवते. त्याचा परिहार या विधीने होतो.
याप्रमाणे ऐहिक व पारलौकिक सुखांचा नाश करणारी कारणे असून त्या सर्पांचा परिहार नारायण नागबली या विधीने होतो असे शास्त्रकारांनी नमुद केले आहे. शस्त्र हे त्रिकालाबाधित असते म्हणूनच त्यास शास्त्र असे म्हणतात. निरनिराळ्या दृष्टीकोनातून विचार करणारी सर्व शस्त्रें वैद्यक शास्त्रहि यांची एकवाक्यता आहे म्हनुन ज्योतिषशास्त्रानेहि हीच गोष्ट कुंडलीद्वारा मानवांना समजावी म्हणून सांगितली आहे.
ज्योतिष-शास्त्राप्रमाणे :- ज्योतिष शास्त्रांचा बृहत्पाराशरी या नावाचा ग्रंथ आहे. त्यात अनपत्यता याबद्दल ग्रहांची परिस्थिती कशी अस्ता पितृदोष, सर्पदोष, पिशाच्यापासून होणारी पीडा या गोष्टी संभवतात, याचा फार सूक्ष्म विचार केला आहे. येथे तो सर्व देता येणे शक्य नाही. म्हणून प्रत्येक दोषाबद्दल उदाहरण म्हणून २।३ श्लोक अर्थासह देऊन त्याच्या परिहारार्थ हाच विधी करावा याची प्रमाणे देत आहे.
पुत्रस्थाने कुजक्षेत्रे पुत्रें राहुसमन्विते ।
सौम्यदृष्टे युते बापि सर्पशापासुतक्षय ॥
बृहत पाराशरी पान १०७, श्लोक ११३
अर्थ :- पंचम स्थान हे सूतस्थान आहे. यावरून संततीचा विचार केलेला स्पष्ट आहे. मंगळाचे क्षेत्रात ( मंगळाच्या राशी मेष व वृश्चिक ) पैकी एक राशी पंचमात असून राहुने युक्त असेल तो राहू बुधाने युक्त किंवा दृष्टा असेल, तर सर्पशाप आहे असे समजावे.
भाग नं. ११
पुत्रस्था भानुमंदारा स्वर्भानुः शशिजींऽगिरा ।
निर्बली पुंत्रलग्नेशो सर्पशापात्सुतक्षयः
वृ. पा. पा. १०७ श्लोक ११४
अर्थ - पंचमस्थानात रवि, शनि, राहू, बुध, मंगळ व गुरु यापैकी कोणताहि ग्रह असल्यास आणि पंचमेश व लग्नेश हे निर्बली असतील तर सर्पशापाने सूतक्षय ओतो.
सर्वसाधारण नियम - पंचमस्थान राहुने दूषित असेल तर सर्वदोष सांगितला आहे.
सर्वदोषांवर नागबली करावा
तद्दोषपरिहारार्थ नागपूजाम समारभेत ।
बृहत्पराशरी पान १०६ श्लोक १६, १७, १८
स्वगृह्योक्तविधानेन प्रतिष्ठा कारयेत सुधीः ॥
नागमूर्ति सुवर्णेन कृत्वा पूजा समाचरेत ॥
गोभूतिलहिरण्यादि दद्यात्वित्तानुसारव : ।
एवं कृते तु नागेंद्रप्रसादाद वर्धते कुलम ॥
ब्राह्मणाच्या शापाने वंशविच्छेद होतो-
गुरुक्षेत्रे यथा राहु पुत्रे जीवारभानुजा ः ॥
धर्मस्थानाधिपे नाशॆ ब्रह्मशापात सुतक्षयः ॥
भाग नं, १२
अर्थ - गुरुच्या स्थानात म्हणजे धन व मीन यापैकी कोणत्याही एका राशीचा राहू असून संतती-स्थानात गुरु, मंगळ किंवा शनि यापैकी ग्रह असून नवमस्थानाचा अधिपति अष्टमात म्हणजे मृत्युस्थानात असेअल तर ब्राहमाणाचा शाप समजावा
प्रेतशप (पिशाचादिक )
कर्मकोपं पितृभश्च तच्छापात वंशनाशतम ॥
पुत्रस्थिती मंदसूमी क्षीणचंद्रस्तु सप्तमे ॥
लग्ने व्यये राहुजीवी प्रेतशापात सुतक्षयः ॥
बृ. पाराशरी पा १११ श्लोक ९६
अर्थ - पंचम स्थानात शनि आणि सूर्य, तसेच सप्तम स्थानात क्षीण चंद्र असेल तर, त्याचप्रमाणे लग्नात राहू असेल तर किंवा व्यव स्थानात गुरु असेल तर प्रेत शाप संभवतो.
पितृशाप -
पितृस्तानधिपो भौमः पुत्रशिन समान्वितः ।
लग्ने पुत्रे पितृस्थाने पापात संततिनाशनम ॥
बृ. पा. पा. १०७ श्लोक २४
अर्थ - पितृस्थानाच ( दशमस्थान ) अधिपति मंगळ हा संतति स्थानाचा अधिपतिने युक्त असून तो लग्नात, पंचमात अगर दशमात असेल तर पितरांचा शाप समजावा
लग्नादष्टमगौ भानौ पुत्रस्थे भानुनंदने ।
पुत्रेशे राहुसंयुक्ते लग्ने पापे सुतक्षयः ॥
बृ. पा. पा. १०७ श्लोक २७
अर्थ - लग्नापासून अष्टमस्थानात सूर्य. त्याचप्रमाणे लग्ना पासून पंचमस्थानात शनि असेल तर आणि पंचमेश राहूने लग्नात युक्त असेल अतर वंश विच्छेदन होतो.
भाग नं. १३
ज्योतिष शास्त्राचा साधारपणे असा नियम आहे की, दशमेश या पंचमेश हे निर्बली असतीळ; राहू, मंगळ, असल्या पापग्रहांनी युक्त व दृष्ट असतील तर क्रमाने पितृशाप व शर्पशाप संभवतो. पितृशाप व प्रेतशाप यांचे निवारणार्थ नारायन-बली करावा असा ज्योतिष शास्त्रानेही उपाय सांगितला आहे.
तद्दोषस्य प्रशान्त्यर्थे विष्णुश्राद्धं च कारयेत ।
रुद्रस्नानं प्रकृर्वीत ब्रह्ममूर्ति प्रदाषयेत ॥
बृ. पा. पा. ११५ श्लोक १०७
या प्रमाणे ज्योतिषशास्त्रातहि या संबंधई सूक्ष्म विचार केला आहे. आता काही प्रमाणात शारीरिक व दैवी उपाय करुनही अपत्य सुखाचा लाभ होत नाही; त्याचे कारण असे आहे की, प्रारब्धकर्मापैकी काही थोडा भाग असा असतो की, ते प्रारब्ध टळूच शकत नाही. ते प्रारब्धकर्म भोगावेच लागए. त्याच्या भोगावाचून दुसरा पर्याय नसतो. गीतेमध्ये सांगितले आहे की, दैव चैवात्र पंचनम । असे कष्टतर प्रारब्ध संततीचे बाबतीतही असते. उदाहरणार्थ - राजा दशरथाला संतति नव्हती. त्याने वशिष्ट ऋषीच्या सांगण्याप्रमाणे पुत्र मेष्टी यज्ञ केला. त्या यज्ञाचे फल म्हणून प्रत्यक्ष राम त्याचे पोटी जन्माला आले. परंतु पुत्रसुख त्यास मिळाले नाही. दशरथाने अंतकाळी राम वनवासात असल्यामुळे पुनः शोकातच त्याचा अंत झाला. या उदाहरणावरून इतकेच सांगायचे की, संततीचे बाबतीतहि असे प्रारब्ध असू शकते. त्याचेही वर्णन ज्योतिष शास्त्राने केले आहे.
पुत्रविन्नकलत्रेशाः संयुक्ताः नवभगपा :
पापांशकाः पापयुक्ता अनपत्वमादिशेत ॥
बृ. पा पा. ११३ श्लोक १२४
अर्थ - सुतस्थान म्हणजे पंचम' ( वित्त) धनस्थान म्हणजे द्वितीय कलत्रस्थान म्हणजे सप्तम यांचे स्वामी नवांशाने एकत्र येऊन पापग्रहाचे अंशात असतील तर वा पापग्रहाने युक्त अस्तील तर अनपत्यत्त्व समजावे.
भाग नं. १४
आयुर्वेदामध्ये ( वैद्यशास्त्र) सत्संगती. दुर्धर शरीरपीडा विशेषे करून मेंदूवर होणारे दुष्परिणाम, हे नाहीसे होण्याकरिता नारायण नागबलीसारखी ज्यात प्रामुख्याने शिवाचे व विष्णूचे पूजन होते अशी विधाने करावी असे सांगितले आहे. एकूण शरीरशास्त्राची संपूर्ण चिकित्सा करणारी पाश्चिमात्य व पौर्वात्य जी शास्त्रे आहेत त्यापैकी जीवात्म्याचा विचार फक्त आयुर्वेदातच केलेला आहे हे आयुर्वेदाचे वैशिष्ठ्य आहे. आयुर्वेद हा अथर्ववेदाचा उपदेश आहे. उप उपसर्ग हा सामीप्यसंबंध दाखविणारा आहे. अथर्वण वेदामध्ये ज्याप्रमाणे रोगनिवृत्तीसाठी देवतानुष्ठानाचा निर्देश केला आहे. त्याप्रमाणे आयुर्वेदातहि हीच गोष्ट सांगितली आहे. आयुर्वेदात प्रामुख्याने चार भाग दृष्टिस पडतात, ते असे की रोग, रोग-हेतु, आरोग्य भैषज्य ही गोष्ट पातंजलीदर्शन द्वितीय पाद पंधराव्या सूत्रांत सांगितली आहे. या चार प्रकारामध्ये रोग हा भाग प्रमुख आहे. रोगाचे योग्य निदान व्हावे म्हणून रोंगाच्या निदानाचे अनेक प्रकार त्यात कर्मज म्हणून एक पद्धत सांगितली आहे. यारोगांच्या चिकित्सेत आयुर्वेदाच्या अष्टांगात तिचा समावेश केला आहे. आता कर्मज रोंगाचे निदान कसे करावे याबद्दल योग रत्नाकर या ग्रंथात
यथाशास्त्रं तु निर्णीतो यथाव्याधि चिकित्ससः ।
न शमं याति यों व्याध्रिः ज्ञेयः कर्मजो बुधः ।
पुण्यैश्च भेगजैः शान्तास्ते शेयाः कर्मदोंषजाः ।
रोगाचे सशास्त्र निदान होऊन, औषध योजना बरोबर असूनही जे रोंग बरे होत नाहीत ते कर्मज होत. त्याचप्रमाणे ज्याचे निदान करून औषधाबरोबर देवतानुष्ठान करून त्या पुण्याईची औषधास जोड दिल्यास ते रोग बरे होतात. आयुर्वेदामध्ये ज्वराचे उत्पत्तीस शंकराचा कोप हे एक कारण असू शकते, असे `विप्रकुष्टौ रुद्रकोपः ।' (माधवनिदान श्लो.५)मध्ये म्हटले आहे. म्हणून ज्वर नाहीसा होण्याकरिता शंकराची आराधना करावी असे वैद्यकशास्त्राचे मत आहे. याप्रमाणे आयुर्वेदामध्ये दुर्धर असे जे रोग (कुष्टादि) यांना पापरोग म्हणून संबोधिले आहे. भगवान धन्वतरी
भाग नं. १५
यांनी या रोगाबद्दल आपले मत असे दिले आहे की, हे पापरोग जोपर्यन्त त्या रोगास कारणीभूत असणारी पापे नष्ट होत नाहीत, तोपर्यंत जन्मजन्मांतरी हे रोग जात नाहीत. कारण ब्रह्म स्त्रीसज्जनवध परस्वहरणादिभि कर्मभिःपापरोगस्य संभवं प्राहुः । ( सुश्रुत निदान स्थन ५ श्लोक २३।२४) पापरोग हे ब्रह्महत्या , स्त्रीहत्या, परद्रव्यहरणादि कारणांनी उत्पन्न होतात. या सर्व पापांचा परिहार वेदमंत्र न देवतानुष्ठान यांनीच होती. त्याप्रमाणे मानसिक रोग (फिट येणे) नाहिसे होण्याकरिता नारायण नागबली यासारखे अनुष्ठान केले असता पैशाच्चादि योनिकडून मनावर व मेंदूवर होणारे दुष्परिणाम नाहीसे होतात. मागे पैशाचादिक योनि कशी प्राप्त होतेयाचे वर्ण्न करताना, पैशाचादि देह सूक्ष्म असतो. तो सूक्ष्म देहावरच (मनावरच) परिणाम करतो हे सांगितलेच आहे. मानसिक रोगाच्या परिहरणाकरिता आयुर्वेदाच्या पसिद्ध अश सुश्रुत यानावाच्या ग्रंथामध्ये पुजा रुद्रस्य कुर्वीत तद्गणांना च नित्यशः ( सु. उ. अ. ६१) असे सांगितले आहे. याचा अर्थ शांकराचे पैशाचादिक गण याश शंकराचे पूजन करावे असा उल्लेख आहे. नारायणबली या विधीतहि शंकराचे गणासह पूजन हा प्रामुख्याने विधी आहे. भगवान धन्वतरींनी औषधाचे बरोबरच सत्संतति होण्याकरिता मंत्रादि दिव्य देवताचे अनुष्ठानाचे महत्त्व प्रतिपादिले आहे.
देवता ब्राह्मणपराः शौचाचारहिते रताः ।
महागणान प्रसूयन्ते विपरीतास्तु निर्गुणान ॥
याप्रमाणे आयुर्वेद व ज्योतिषशास्त्र या सर्वांची वेदप्रणीत नारायणबली अनुष्ठान संबंधी पूर्ण एकवाक्यता आहे ही गोष्ट वाचकाचे लक्षात येईल.
ज्योतिष प्रमाण-- सर्वसाधारण असे ,म्हणता येईल की, लग्नेश किंवा पंचमेश यांचे अधिपति ६।८।१२ या त्रिकस्थानी असून वा पापग्रह यांनी मुक्त असतील तर त्या स्थानाची फळे मिळत नाहीत.
याप्रमाणे ज्योतिषशास्त्रानेहि व आयुर्वेदानेहि प्रेतशाप, पितृशाप, नागबधजन्य दोष यापासून होणाऱ्या पीडेपासून व पीडा देणाऱ्या
भाग नं. १६
जीवात्म्यास गति मिळावी म्हणून नारायण नागबली हाच विधी करावा असे सांगितले आहे; ही गोष्ट निश्चित आहे. आता हे दोन्ही विधी कसे करावे यासंबंधी शास्त्रीय मांडणीची माहिती देत आहे.
मुहुर्त विचार :- सर्वसाधारणपणे सकाम कर्मे * गुरुशुक्राचे अस्त, पौष मास, मल मास यामध्ये करु नयेत असा नियम आहे. परतु हा नियम या क्षेत्रात बंधनकारक नाही , ( नि. सि. पन ६२२) या विधी करता स्वतंत्र उल्लेख आहे फक्त ** नक्षत्र गुणदोष पहावा असे सांगितले आहे. या कर्मास धनिष्ठपंचक व त्रिपाद नक्षत्रे वर्ज्य आहेत. धनिष्ठापंचक म्हणजे धनिष्ठा नक्षत्राचे उत्तरार्धांस आरंभ करुन रेवतीचे अंतापर्यन्त या साडेचार नक्षत्रास धनिष्ठा पंचक म्हणतात. त्रिपाद नक्षत्रे कृतिका, पुनर्वसु, उत्तराफाल्गुनी, विशाखा, उत्तराषाढा व पुर्वाभाद्रपदा ही नक्षत्रे वर्ज्य होत. त्रिपाद नक्षत्राचा शेवटचा पाद आरंभाच्या दिवशी असल्यास त्या दिवशी प्रथम नागबली विधी करून नंतर दुसऱ्या दिवशी नारायन बली करावा.
उत्तम दिवस व नक्षत्रे :- रविवार, गुरुवार, सोमवार हे चार प्रारंभास उत्तम समजावेत. अश्विनी, पुष्य, हस्त, स्वाति व श्रवण ही चार नक्षत्रे आरंभास उत्तम होत.
नारायण नागबली कर्माचे अधिकारी :- हा विधी *** सर्व वर्णीयास करण्याचा अधिकार आहे. ज्याचे आई-वडील जिवंत आहेत त्यांनाही करता येतो. ब्राह्मणास मौजीबंधनानंतर ब्रह्मचर्यावस्थेत करता येतो. संततीकरता प्रमुख्याने हा विधी असल्याने सपत्नीकास करता येतो याबद्दल लिहिण्याचे कारण नाही. पत्नी नसताना कुलाचे उद्धाराकरिता करता येतो. स्त्री गर्भिणी असता ७ व्या महिन्यापर्यंत करता येतो.
_________________________________________________
* गुरुभार्गवयीमोंढचे पौषमासे मलिम्लुचे ।
नातीतः पितृमेध त्याद्वया गोदावरीविना ॥
** त्रिपादपंचकं वर्ज्य आरभे तु बलिद्वये ।
अन्यदोषस्य संप्राप्तिरस्मिन कार्ये न दुःखकृत ॥
*** विधानमाला-चातुर्वर्णेन कर्तव्ये बलिनारायणीऽमिदः ।
भाग नं. १७
स्थलवर्णन _ शास्त्रकारांनी हा विधी दोन नद्यांच्या संगमावर अश्वत्थ वृक्ष सान्निध्यात व महा स्मशानभूमीत करावा असे सांगितले आहे. त्र्यंबकेश्वरी हा विधी ज्या स्थळी केला जातो, ती जागा त्र्यंबकेश्वर मंदीराच्या पूर्व बाजूस आहे. फार पुरातन काळापासून हा विधी त्याच स्थळी करतात. ही जागा त्र्यंबकेश्वर मंदीराच्या पूर्व बाजूस देवळापासून १००-१५० फुट अंतरावर आहे. तेथे अंदाजे २०x४० फूट लांबी रुंदीची मजबूत दोन दालनी इमारत बांधलेली आहे. त्यास धर्मशाळा म्हणतात. उत्तरेचे बाजूस एक खोली आहे. त्या जागेस या विधीस लागणाऱ्या सामानाची व स्वयंपाकाची व्यवस्था आहे. तेथेच एक पाण्याचा हौद आहे. तेथील व्यवस्था व या कर्माचे काही अधिकार काशीकर या नावाचे ब्राह्मण घराण्याकडे आहे. ही धर्मशाळा महानदी गोदावरी व अहिल्या यांचे संगमावर भूतनाथ श्री त्र्यंबकेश्वर महाराज व * अश्वत्थ नारायण यांचे सान्निध्यात असून शिवाय जेथे आर्य महिलांनी आपल्या आत्मार्पणाने पातिव्रत्याचे नंदादीप कायम तेवत ठेवले आहेत, अशा अत्यंत पवित्र महास्मशान-भूमीत सर्व बाजूंनी योग्य अशा स्थळी हा विधी केला जातो.
धार्मिक खर्च :- नारायण नागबली हे सकाम कर्म आहे असे मागे सांगितले आहे. सकाम कर्मास प्रत्येकाने आपले बारा महिन्याचे जे उत्पन्न असेल त्याचा दहावा भाग खर्च कर्वा असा सर्वसाधारण नियम आहे. लोभाने वित्तशाठ्य होऊ नये व केवळ पैशाकरिता कोणाची अडवणूक होऊ नये म्हणून हा नियम असावा. थोडक्यात म्हणजे ``दद्याद वित्तानुसारतः'' म्हणजे प्रत्येकाने आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करावा. हे जे पैसे खर्च करावयाचे याच उद्देश असा की, या विधीत जी दाने द्यावयास सांगितली आहेत, ( दानाची माहिती स्वतंत्र दिली आहे) ती सर्व दाने देण्यास सर्वांचीच सांपत्तिक परिस्थिती असू शकत नाही, परंतु संशाने तरी त्याचे फळ कर्त्यास मिळून त्याचे मनोरथ पूर्ण व्हावे हा यामागील हेतु आहे.
पूर्व तयारी :- हा विधी कोऱ्या वस्त्रावर करावा लागतो. त्याकरिता एक धोतर-जोडी व पत्नीस पांढरे पातळ व चोळी लागते. ते
___________________________________________
* अश्वथो देवसदनः । तैत्तिरीय ३-८-१२।२
भाग नं. १८
स्वच्छ धुवून वाळत टाकावे म्हणजे विधीस जातना तीच वस्त्रे नेसून जावे लागते. उपाध्यायास या विधीसंबंधी पूर्व सूचना द्यावी म्हणजे त्यासहि तयारी ठेवण्यास सोईचे होते. बाकी लागणाऱ्या सर्व सामानाची यादी स्वतंत्र दिली आहे.
कुशावर्त तीर्थावरील विधी :- या विधीस आरंभ करण्यापूर्वी कुशावर्त तीर्थावर जाऊन गंगाभेट (गंगापूजन) करून नंतर स्नान करावे. ज्याचे वडील दिवंगत झाले असतील त्यांनी पितराचे उद्देशाने समंत्रक (क्षीर) * मुंडन करावे ( घ. सिं. पुर्वार्ध पान २३९ व ३७६) पाण्याने गुळणा करून स्नान करावे. देहशुद्धीकरता भस्म, गोमय, मृतिका लावून समंत्रक स्नान करावे.
आपले हातून होणारी कायिक, याचिक व मानसिक अशी म्हणजे शरीराकडून शारीरिक कृतीने, वाणीने व मनाने होणारी जी पापे या पापापासून मुक्त होण्याकरिता यथाशक्ति प्रजापत्यात्मक प्रायश्चिताचा संकल्प करून ब्राह्मणास दशदाने ( गो. भू. तिल, हिरण्य, आज्य, वस्त्र, ताम्र, धान्य, रौप्य, लवण ) ही दशदाने यथाशक्ति देण्याचा, तसेच गोप्रदान म्हणजे प्रत्यक्ष सवत्स गाय किंवा गाईप्रित्यर्थ यथाशक्ति निष्क्रय द्रव्य देण्याचा संकल्प करून उपाध्यायाची आज्ञा घेऊन शुद्धस्नान करावे. नंतर घरी आल्यावर वाळत घातलेली वस्त्रे नेसून घरातील मंडळीस व उपाध्यायास नमस्कार करून गंगेच्या पाण्याचा तांब्या भरून घेऊन, भांडे, पळी, ताम्हन घेऊन त्र्यंबकेश्वराचे देवळात जाऊन त्र्यंबकेश्वरास नमस्कार करून आपले मनोरथ पूर्ण करण्याविषयी प्रार्थना करून पूर्व दरवाजाने बाहेर पडावे. ज्या धर्मशाळेत हा विधी केला जातो ती धर्मशाळा पूर्वेसच देवळापासून १००-१५० फुटावर आहे. तेथे जावे म्हणजे या विधीस
____________________________________________
* मुंडन कर्म तु चौलं नागसंस्कारादिकपाधानादिके कार्यम ॥
गंगादर्शनात क्षौरम ॥
भाग नं. १९
सुरवात होते. हा विधी नारायण हेजे विष्णूचे नांव आहे त्या नावाने केला जातो. नारायणबली शब्दाची व्युत्पत्ति नारायण या शब्दाचा अर्थ `नारस्य मुक्ते अयनं प्राप्तियंस्मात' ज्ञान किंवा मुक्ती देणारा यास नारायण म्हणतात, येथेहि प्रेतभूमीतून मुक्तीच अभिप्रेत आहे. म्हणून या विधीस नारायणबली हे नांव देण्यात आले आहे. तसेच मोत्र काश्यप गृहीत धरले जाते; कारण ही पृथ्वी काश्यप ऋषीपासून झाल्याने, काश्यप गोत्र लावूनच विधी करतात नेत्राचमन ( डोळ्यास पाणी लावून ) हे स्मशान असल्यामुळे येथे प्रत्यक्ष आचमन करावयाचे नसते. म्हणून डोळ्यास पाणी लावल्याने आचमनाचे फळ मिळते. म्हणून नेत्राचमन करून आपले करंगळीशेजारील दोन्ही हातांचे बोटात ( पर्वित्रके) दर्भाच्या मुद्या घालाव्यात. नंतर शरीरशुद्धर्थ * प्रायश्चिताचा संकल्प करावा. नंतर संकल्पद्वारा रुद्रश्राद्ध करावे. नंतर नारायणबली या विधीचा प्रधान संकल्प करावा.
प्रधान संकल्प :- ``मम इह जन्मनि जन्मांतरे वा केनचित ( पुरुषेण स्त्रिया वा ) आचरितस्य ब्राह्मणादि द्रव्मापहरणस्य योगतः वासनावशात प्रेतीभूतस्य कस्यचित अस्मत संततिद्रर्व्यार्जनद्रव्यसंरक्षणादि योगक्षेमप्रतिबंध भूतम्य नानोपद्रव्यैः शारीरेषु निरंतरं बाध्यमानस्य प्रेतत्व निवृत्तिपूर्वक उत्तमलोक प्राप्तीद्वारा अस्मत सकलोपद्रव्यं निरसनेन आयुरारोग्य-ऐश्वर्याभिवृद्ध्यर्थ पुत्रपौत्र परंपरासंततिअविच्छेदार्थ मम कुले कस्यचिद दुर्भरेण मृतस्य च दुर्गति निरासार्थ सद्गति प्रात्यर्थ च श्री परमेश्वर प्रीत्यर्थ नारायणबल्यारव्यं कर्म करिष्ये ।
संकल्पाचा अर्थ - या जन्मी वा मागील जन्मी माझे वंशजांनी किंवा मी कोणाचे द्रव्यादि अपहरण केल्याने ( सोख्याचा अपहार करणारे कृत्य ) ज्याचे अपहरण झाले तो जीवात्मा तीव्र वासनमुळे पिशाचादि योनीत जाऊन आमचा संततिविच्छेद, द्रव्यार्जन, द्रव्य-संरक्षणास वारंवार
__________________________________________
* कर्मादौ पूर्वदिवसे मृतस्यैव द्विजन्मनः ।
प्रायश्चित तथा कृत्वा धर्मशास्त्रोक्तमार्गतः ॥ - रत्नमालायां देवल
भाग नं. 20
व्यत्यय आणणे वगैरे पीडा करतो; या पीडेपासून आमची सुटका व्हावी. तसेच पीडा देणाऱ्या जीवात्म्याची ज्याचे प्रेतत्वापासून ( पिशाच्च योनी ) सुटका होऊन त्यास उत्तम गति मिळावी; तसेच आमचे कुलात कोणास दुमंरणाने मिळणारी दुमंरणाने मिळणारी दुर्गति ( यास पुष्कळ कारणे आहेत) मिळाली असल्यास त्यासही सद्गति मिळून आमची पुत्र-पौत्र-परंपरा अविच्छिन्न चालावी म्हणुन मी नारायणवली हा विधी करीत आहे.
नारायणबली विधी _ पाच कलशावर पूर्ण पात्रांची स्थापना व कलशपूजन करावे. त्या पांच कलशावर या विधीच्या ज्या प्रमुख पाच देवता ( विष्णूची मूर्ती सोन्याची, रुद्राची तांब्याची, ब्रह्मदेवाची रुप्याची यमाची लोहाची, प्रेताची दर्भाची ) आहेत. त्याची प्राणप्रतिष्ठा करून षोडशोपचारे पूजन करावे व मुख्य देवतेस उद्देशून ( भाताचा चरु किंवा कणकेच्या ) १६ आहूती द्याव्या नंतर स्विष्टकृत होम व प्रायश्चित्य होम करावा. अग्निपूजन करून होमाची पूर्तता करावी. विष्णू बलीच्या अंगभूत विष्णूश्राद्ध ( प्रेतास विष्णूरूप मानून) व पाच देवतांना उद्देशून पिडदान करावे. ( हे पिंडदान दक्षिणेस तोंड करून करावे. पत्नीने लांब बसावे. ) विष्णूश्राद्धांत १० व पंचदेवतास ५ असे एकूण १५ पिंड द्यावेत. ( आपल्या सूत्राप्रमाणे पिंडदान करावे) पहिल्या १० पिंडास विष्णूश्राद्ध असे म्हणतात. विष्णूश्राद्धाचे १० पिंडावर प्रत्येकी गोप्रदान द्यावे असे सांगितले आहे. नंतर दुसरा पिंड द्यावा यास विष्णूश्राद्ध म्हणतात. यावर गाय व बैल याचे लग्न लावून त्याचे दान करावे असे सांगितले आहे. नंतर ४ था पिंड यमास उद्देशून द्यावा, यास यमश्राद्ध म्हणतात. या श्राद्धावर दुभती म्हैस असते. तिचे दान द्यावे असे सांगितले आहे. नंतर ५ वा पिंड द्यावा, तो प्रेतास उद्देशून असतो. त्यावर १३ मण तिळाचे दान द्यावे असे सांगितले आहे. नंतर सर्व पिंडाचे समंत्रक पूजन करून विसर्जन करावे. ( वर सांगितल्याप्रमाणे या विधीत जो दाने द्यावयास सांगितली आहेत, ती सर्व देण्यास सक्ती नसते. ) म्हणून आपण जे पैसे एकूण धार्मिक
भाग नं. २१
खर्चाकरिता देण्याचे ठरविले असेल त्यातूनच `यथाशक्ति यथाशेन' म्हणजे मी माझ्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे ही दाने देत आहे. असा याचा अर्थ आहे. ( प्रत्येक दानाचे वेळी हीच व्यवस्था समजावी )
बलिप्रदान :- एका पत्रावळीवर शिजविलेला भात बुरुजाच्या आकाराचा करून ठेवावा; व त्यावर एक काकडा पेटवून ठेवावा. त्याचे समोर यजमान पतीपत्नीने बसावे. प्रेतास उत्तम गति मिळावी म्हणून हे बलिप्रदान करावयाचे असते. उभयतांनी त्या बलीचे पूजन करावयाचे असते नंतर त्या बली समोर प्रार्थना करावयाची की, आमच्या कुटूंबाचा त्याने अभ्युदय करावा; आमच्या संततीस, आमच्या संत्तीस वृद्धि असावी अशी प्रार्थना करून पंचदेवतांना नमस्कारकरूनतो बली अर्पण करावयाचा व मग पत्रावळीसुद्धा दिलेला तो भाताच बली हाताने उचलून धर्मशाळेच्या बाहेर असलेले देऊळ ( चबुतरा ) यावर नेऊन ठेवायच. पत्नीने धर्मशाळेच्या दारापर्यंत पाण्याने भरलेले भांडे घेऊन जावे बलीस काकाने ( कावळ्याने ) स्पर्श केल्यानंतर यजमानाने हातपाय धुवून आत यावे. ( जर कावळ्याने त्या बलीस स्पर्शकेला नाही तर त्या अतृप्त जीवात्म्याची वासनातृप्ती झाली नाही असे समजले जाते. ) या प्रकाराचा पुष्कळ वेळा येथे अनुभव येतो. कावळा स्पर्श न करण्याचे कारन असे समजले जाते की, अतृप्त असा जो सूक्ष्म जीवात्मा तो त्या बलीचे भोवती फिरत असतो,ईश्वराने कावळा ह्या पक्षाचे नजरेत असे वैशिष्ट्य ठेवले आहे की, त्यास सूक्ष्म जीवात्मा पाहता येतो. म्हणून असे म्हणतात की, ( काकदृष्टिः बकध्यायनम । ) अशी काही वैशिष्ट्ये प्राण्याच्या ठिकाणी पहावयास मिळतात; ज्याप्रमाणे कुत्र्यास वासावरून वस्तुचे ज्ञान होते. असो त्यामुळे काकस्पर्श होत नाही. वास्तविक विचार करता झाडावर शेकडो कावळे बसलेले असतात. भात पाहिल्याबरोबर त्यावर झडप घालणे हा त्यांचा स्वभाव असूनहि एकही कावळा त्या बलीला स्पर्श करीत नाही अशी घटना पुष्कळ वेळा येथे अनुभवास येते. असे झाल्यास म्हणजे त्या सूक्ष्म जीवाची तृप्ति झाली नसल्यास शास्त्रकारांनी त्यास पुण्याईची जोड द्यावी असे सांगितले आहे. त्याकरिता येथील अनुभवाचा उपाय
भाग नं. २२
म्हणजे येथे जो ब्रह्मगिरी पर्वत आहे, ( हे शंकराचे पृथ्वीतलावरील आद्यस्वरुप आहे असे पुराणात वर्णन आहे.) त्या या शंकराच्या स्वरुपाला प्रदक्षिणा घातल्याने मानवाची सर्व पापे नाहीशी होतात. म्हणूनच नामदेव आपल्या गाथेत म्हणतात की, नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्या नाही गणना ॥ या प्रदक्षिणेने अपार पुण्याचा लाभ घडातो. ज्ञानेश्वराचे वडील बंधू जे निवृत्तीनाथ ते आपले भाऊ ज्ञानेश्वर सोपानदेव व मुक्ताबाई यांचेसह त्र्यंबकेश्वर येथे रहात असत. ( निवृत्तिनाथांचे समग्र चरित्र येथे मिळते ते पहावे. ) ही सर्व भावंडे ही प्रदक्षिणा दररओज करीत असत; असा त्यांचा नियम होता. आणि त्यास याच प्रदक्षिणेचे रस्त्याने त्यांचे गुरू जे गहिनीनाथ यांची भेट होऊन त्यांनी निवृत्तीनाथांना ब्रह्मसाक्षाक्तारकरून दिला. असे चरित्र आहे. तेव्हा ही प्रदक्षिणा यजमानाने स्वतः करण्याचा संकल्प करावा. आपणास अशक्य असल्यास ब्राह्मणाकरवी ११ किंवा २१ आपले शक्ति अनुसार करविण्याचा संकल्प केला असता या पुण्याईच्या दानाने तो जीवात्मा मुक्तावस्थेत जातो, म्हणजे काकस्पर्श होतो, असा येथील कायमचा अनुभव आहे. नंतर पंचदेवता व अग्नि यांचे विसर्जन करावे. यास नारायणबली शुद्ध व सत्त्वसंपन्न होतो. परंतु या विधीने तो मोक्षास जात नाही. आपल्या प्रथम संकल्पात त्यास * मोक्ष मिळावा असा आपला उद्देश आहे. म्हणूनच त्यासाठी पर्णशर करणे जरूर आहे. म्हणून तो विधी करण्याची योजना स्वतंत्र केली आहे. तो पर्णशरविधी आता सांगतो.
पालाशविधी :- प्रथम मनुष्याच्या आकृतीकरिता ** पळसाच्या ३६० काड्या घेऊन त्या दोरीने बांधाव्या. मस्तकाचे ठिकाणी नारळ ठेऊन त्या काड्यावर व नारळावर कणकीचा गोळा ठेवून मनुष्याची आकृती
___________________________________________
* अनेन नारायणबलिकर्मणा भगवान विष्णूरिमं प्रेत शुद्धमपापमहं करोतु ॥ ( धर्मसिंधु पान २४४ )
** ब्रह्मवैपालाशः शतपथ ५।३।४।१८
भाग नं. २३
तयार करावी. आपणास पीडा देणारा वा ज्यास गति मिळाली नाही त्या जीवात्म्याचा तो देह आहे असे कल्पून * नारायण हे नांव घेऊन व त्याचे गोत्र काश्यप आहे असे धरून त्याच्या अंत्यविधीस सुरवात करावी. यास पालाशविधी किंवा पर्णशर असे म्हणतात. यममानाने सपत्नीक त्या पुतळ्यापुढे बसावे नंतर तो शुद्ध जीवात्मा पूर्ण मुक्त होऊन त्यास मोक्ष मिळावा असा संकल्प करून, त्याची प्राणप्रतिष्ठा करून त्याचे षोडशोपचारे पूजन करावे व त्या जीवात्म्यास ब्रह्मगिरीचे प्रदक्षिणेचे जे पुण्य प्राप्त होते ते त्यास समर्पण करून आपण प्रेतयोनीतून मोक्षास जावे अशी प्रार्थना करून तो जीवात्मा मृत झाला अशी कल्पना करून त्या पुतळ्यावर पांच पिंड द्यावेत ते असे मुखावर, कपाळावर, नाभीवर व दोन्ही हातावर असे एकेक याप्रमाणे एकेक पिंडा दावून बसवावे. ( यजमान पत्नीने नमस्कार करून बाजूस बसावे. यजमानाने तो पुतळा घेऊन ज्या ठिकाणी दहन करावयाचे आहे. तेथे त्या पुतळ्याचे पाय उत्तरेकडे करून तो पुतळा गोवरीवर ठेवावा. नंतर प्रेताप्रमाणे त्यास संमत्रक अग्नि द्यावा. नंतर पाण्याने भरलेला एक लहान कुंभ ( मडके हातात घेऊन त्या पुतळ्यास अपसब्य ( उलटी) अशा तीन प्रदक्षिणा घालाव्या. त्या प्रेताचे डोंक्याचे बाजूस अश्मा ( दगड) ठेवलेला असतो. त्या दगडावर तो उदक कुंभ डाव्या खांद्यावरून टाकावा. म्हण्जे तो कुंभ फुटला पाहिजे. या क्रियेस उदकुंभदान म्हणतात. ज्या दगडावर आपण उदकुंभ फोडला, तो दगड घेऊन यजमानाने धर्मशाळेत यावे व त्या अश्वावर दहा वेळा भांड्यात तीळ टाकून ते पाणी अंगठ्यावरून वाकड्या हाताने द्यावे. यास तिलांजली असे म्हणतात. नंतर अवयव श्राद्ध होते. त्याचे दहा पिंड देतात. नंतर विषम श्राद्ध होते. त्यानिमित्त ८ पिंड एतात. या श्राद्धास नवश्राद्ध असेहि म्हणतात. या सर्व पिंडाचे पूजनकरून विसर्जन करतात.
_________________________________________
* श्राद्धमयुखे पर्णशरदाहविचारे_ श्राद्धचितामणी विष्णुश्राद्ध विना
पर्णशरदाही न मुक्तं कर्तव्यं वैष्णवं श्राद्ध प्रेतमृक्त्यर्थमादरात ॥
भाग नं. २४
नंतर स्मशानवासी देवतांना उद्देशून पिंडदान करतात. नंतर त्यांचे पूजन करून अश्म्याचे विसर्जन करावे. ( तो अश्मा गंगेच्या प्रवाहात टाकावा. ) याप्रमाणे दहाव्या दिवसापर्यन्तचे कर्म पूर्ण करतात. ( नारायण बलीचे पहिल्या दिवसाचे कर्म पूर्ण होते. ) यजमानाने विसर्जन केलेले सर्व पिंड, दर्भ वगैरे भरून गंगेत टाकावे. यजमानास व त्याचे पत्नीस * एक दिवस अशीच धरावे लागते. यजमानाने उभयता स्नान करावे. दुसरे दिवशी ज्या ठिकाणी पुतळा दहन केला असेल तेथील रक्षा भरून गंगेत टाकावी. त्या जमिनीवर दूध, तुप शिंपडून हातपाय धुवून कुशावर्तावर स्नाने करावी, म्हणजे त्यांचे अशीच संपते. वस्त्रे धुवून सोवळ्यात वाळत टाकावी.
दुसरे दिवशी :- दुसरे दिवशी स्नाने आटोपल्यावर तीच धौत वस्त्रे नेसून गंगेच्या पाण्याचा तांब्या भरून पळी, भांडे, ताम्हण घेऊन त्र्यंबकेश्वराच्या देवळात जावे. तेथे त्र्यंबकेश्वरची प्रार्थना करून पूर्व दरवाजाने हा विधी जेथे होतो त्या धर्मशाळेत उभयतांनी गावे, म्हणजे अग्नामहिदोदिष्ट या कर्मास प्रारंभ करावयाचा, नेत्राचमन ( डोळ्यात पाणि लावणे ) करून करंगळीचे शेजारील बोटात पवित्रके घालावी. प्रथम अकरावे दिवसाचे जे कर्म असेल त्यास सुरवात होते. पहिल्या श्राद्धास अग्नांअहिकोदिष्ट श्राद्ध असे म्हणतात. ( हे कृताकृत आहे. ) त्याचा संकल्प करून, स्थंडिलावर अग्नीची समंत्रक प्रतिष्ठाकरून वायव्य कोनास एक चट ( पळसाचे पान) मांडून, अग्निस्वरुप ब्राह्मण कल्पून, त्याची पूजा करावी व अग्निसमोर तयार केलेले सर्व अन्न ( भात, वरण, भाजी, लाडू वगैरे) पत्रावळीवर वाढून अन्न निवेदन करावे. नंतर ते सर्व अन्न यजमानाने त्याच पत्रावळीवर एकत्र करून त्या अन्नाचे
_____________________________________________
* अशीच पिंडदःकुर्यात नतु तव बन्धु गोत्रजाः । नि. सिंधु
स्द्यः शौचे तथैकाहे सद्यः संचयतं भावेत ॥ सदनरत्ने
एकाहशौचम । बोधायनसूत्र
स्मृत्यर्थ सीर प्रमादत्राना एकाहशौत्रम ॥
भाग नं. २५
चार भाग करावेत व प्रत्येक भागातील ८ याप्रमाणे समंत्रक ( स्वाहा म्हटल्यावर ) आहुती अग्नीत द्यावी. नंतर श्राद्धानिमित्त एक पिंड द्यावा. त्या पिंडाचे पूजन करून विसर्जन करावा. या श्राद्धावर वैतरणा, धेनू, ऋण धेनू अशा ३ गाई, नौका, तिलपात्र वगैरे दाने सांगितली आहेत. नंतर मासिक श्राद्धास सुरवात होते.
मासिक श्रद्ध - बारा महिन्यापर्यंतची जी एकंदर सोळा श्राद्धे करावि लागतात ती गव्हाचे पिठाचे पिंड देऊन करतात. यजमानाने दक्षिणेस तोंड करून बसावे, यजमानाचे समोर चार दर्भाच्या काड्या मांडलेल्या असतात. त्या काडीवर चार याप्रमाणे पिंडदान करावे.
सोळा श्राद्धांची नांवे - अद्यमासिक, उत्मासिक, द्वितीय मासिक, त्रयी पाक्षिक, तृतीय मासिक, चतुर्थ मासिक, पंच मासिक, उनषण्मासिक, षण्मासिक, स्प्तमासिक, अष्टमासिक, नवमासिक, दशमासिक, एकादश मासिक, द्वादश मासिक, उनाद्विक याप्रमाणे १६ श्राद्धे पिंडदान देऊन करतात. ही श्राद्धे सपिंडीस अधिकार प्राप्त व्हावा म्हणून एकतंत्रेण करतात. यजमानाने उपतिष्ठतु असे उपाध्यायांनी म्हटले म्हणजे पिंड द्यावा. याप्रमाणे १६ पिंड दिल्यावर त्या सर्व पिंडाची पूजा करून ते सर्व पिंड विसर्जन करावेत. या श्राद्धावर अन्नदान, उदकदान दीपदान, छत्री, पादुका वगैरे दाने सांगितली आहेत.
सपिंडि श्राद्ध - याचा अर्थ प्रेतयोनीतील असलेला म्हणूनच आपणास पीडादेणारा जो जीवात्मा त्यास पितरादि उत्तम लोकांस पाठविणे आपणास पीडा देणाऱ्याचे नाव वगैरे माहित नसल्याने, त्याच्या पितरांची नांवे ब्रह्मा, विष्णू, रुद्र अशी नांवे घेऊन हे श्राद्ध केले जाते. चटरुपी ब्राह्मण कल्पून ( पळसाचे पानावर दर्भाच्या दोन काड्या घेऊन त्याचे टोकास गाठ द्यावी ) हे श्राद्ध करावे. यजमानाने पूर्वेस तोंड करून असावे, नवीन पवित्रके धारण करून नेत्राचमन करावे. नंतर सपिंडी श्राद्धाचा संकल्प करावा. नंतर तीन चट मांडावेत. ( पूर्वाभिमुख कामकालसंज्ञक देवांचा असतो. दक्षिण बाजूस उत्तराभिमुख तीन चट मांडावेत
भाग नं. २६
पुर्वाभिमुख चटावर प्रेतांना आवाहन करावे दक्षिणेकडील दुसरे चटावर सांगितल्याप्रमाणे ब्रह्मा, विष्णू, रुद्ररुप पितारास आवाहन करावे, नंतर आसनादि उपचारांने त्या सर्व चटांची पूजा करावी. नंतर प्रेतासा दिलेल्या अर्घ्यातील (प्रेतांच्या चटापुढे द्रोण मांडून त्यात पाणी घालावे. त्यास अर्घ्यपात्र म्हणतात.) पाण्याने त्याचे पितरांचे अर्घ्याशी संयोजन करावे. ( त्याचे पितराचे चटापुढे तीन द्रोण मांडून त्यात पाणी असते त्या पाण्यात प्रेतापुढे असलेल्या द्रोणांतील पाणी तिन्ही द्रोणात थोडे थोडे टाकावयाचे असते. यास अर्घ्यसंयोजन म्हणतात.) नंतर श्राद्धाप्रमाणे सर्व विधी करून पिंड-प्रदान करावे ते असे-यजमानाने आग्नेय दिशेस तोंड करून बआवे. समोर दोन वेगवेगळ्या ठिकाणी दर्भ पसरावेत. पहिल्या ठिकाणच्या दर्भावर प्रेतास उद्देशून एक लांबकोळा पिंड द्यावा. दुसऱ्या ठिकाणच्या दर्भावर प्रेतास उद्देशून तीन पिंड द्यावेत. त्या पिंडाचे ( प्रेतपिंडाचे) पूजन करावे. नंतर एक दर्भाची दोरी तयार केलेली असते. ती दुहेरी असते. त्या दोरीत दोन बोटे घालून डोळे मिटून ``ॐ नमो भगवते वासुदेवाय '' असा मंत्र तोंडाने म्हणून, ती दोरी पिंडावर ठेऊन बोटांनी दाबून जमिनीस टेकवावी, म्हणजे त्या लांबकोळ्या पिंडाचे तीनभाग होतात. नंतर त्या भागास दही व मध लावावा. या तीन भागापैकी पहिला भाग व दोन पिंड याचे एकत्रीकरण करून दुसऱ्या काडीवर ठेवावे, यास पिंडसंधीजन म्हणतात. या संयोजनने वेळी जे मंत्र म्हणतात त्याचे अर्थगांभीर्य अतिशय उत्तम आहे. नंतर या पिंडाचे पूजन करतात. हे श्राद्ध झाले म्हणजे तो जीवात्मा प्रेतलोकातून पितृलोकांत जातो. म्हणजे प्रेतयोनीपासून मुक्त होतो. ज्यावेळी पैशाचिक बाधा सते त्यावेळी ते पिशाच्च याच श्राद्धाचे वेळी अंगात संचार करते व आपले म्हणणे, म्हणजे या शरीरात प्रवेश करण्याचे कारण वगैरे, सर्व खुलासा सविस्तर होतो. अंगात संचार झाल्यानंतर आपली वासना काय आहे. या जीवात्म्याशी त्याचा
भाग नं. २७
संबंध कसा आला वगैरे सर्व व्यवहार स्पष्टपणे ते पिशाच्च सांगते, येथील देवता-म्हात्म्य व होणारे योग्य अनुष्ठान यामुळे पिशाच्च योनीत गेलेला तो जीवात्मा आपणास योग्य गति मिळत आहे या दृष्टीने मुक्ति घेण्यास तयार होतो. या सपिंडी श्राद्धानिमित्त दिलेले जे तीन पिंड असतात, त्यापैकी मधला पिंड हातात घेऊन कुशावर्त तीर्थावर जाऊन मुक्ति घेतो, असा प्रत्यक्ष येथे अनुभव येतो.
पाथेय श्राद्ध - प्रेत लोकांतून पितृलोकांत जाण्याकरिता म्हणून शिदोरीप्रमाणे त्या जीवात्म्यास उद्देशून पिंडदान करतात. म्हणून यास पाथेय श्राद्ध असे म्हणतात. हे श्राद्ध कणकीचे तीन पिंड देऊन करतात. नंतर सर्व पिंडाचे पूजन करुन यम्य स्मृत्या करून म्हणजे कर्म ईश्वरार्पण करतात. या विधीस सकाम नारायणबली पालाशविधीयुक्त ( मोक्ष देणारा ) असे म्हणतात. निर्णयसिंधुकारांनी सकाम नारायणबली म्हणून याचा उल्लेख केला आहे. या विधीने प्रेताची शुद्धी होते व पालाश विधीने प्रेतयोनीतून जीवात्मा मोक्षास जातो, अशा रीतीने अनपत्यता, दुर्धर शरीरपीडा वगैरे दोष नाहीसे होतात. तसेच अभिचार कर्माचा प्रयोग झाला असल्यास तोही नाहीसा होतो. या विधीस शास्त्रकारांनी संततिफलक म्हणजे संतति होणे हे ज्यांचे फल आहे. असे त्याचे अन्वर्थक नांव दिले आहे.
**********************************
नागबली
नागबली हा विधी नारायणबली पूर्ण झाल्यानंतर लगेच सुरू करतात. हा विधी * त्र्यंबकेश्वरीच करावा असे दालभ्य संहितेत संगितले
_______________________________________________
* ये तू नागबली राजन कुर्वन्ति त्र्यंबके नराः ।
नागस्य दर्शनं तेषां यत्रकुत्रापिआयते ॥
अपुत्रो पुत्रिकायुक्तो धनधान्यसमन्वितः ।
भूनक्ति भोगानआखिलान ते मोक्षमाघ्नुयात ॥
भाग नं.२८
आहे. नारायण बली व नागबली हेदोन्ही विधी स्वतंत्र आहेत. अनपत्यता दूर व्हावी म्हणून हे दोन्ही विधी बरोबरच करावे असे शास्त्रवचन आहे. म्हणजे कोणत्याहि अदृश्य कारणांनी निर्माण होणारी अनपत्यता, दुर्धर शरीरपीडा, संतति विच्छेद वगैरे दुःखे नाहीशी होतात. कधी कधी आपल्या पत्रिकेप्रमाणे नागहत्या हा एकच दोष निश्चित असल्यास, हा एकच विधी स्वतंत्र करतात. य विधीकरता अमावस्या, पौर्णिमा, पंचमी व अश्लेषा नक्षत्रासह नवमी हे मुहूर्त घ्यावेत. त्यातहि श्रावण शुद्ध पंचमी व मार्गशीर्ष शुद्ध पंचमी हे दिवस फारच उत्तम सांगितले आहेत. या दोन्ही पंचमीना नागपंचमी अशी संज्ञा आहे, जनमेजय राजाने केलेले सर्पसत्र हे याच पंचमीला अस्तिक ऋषींनी थांबविले. त्यामुळे नागजातीस अतिशय समाधान झाले.
मुहुर्त विचार :- नागांनी असे सांगितले आहे की, * नागपंचमीचे दिवशी जे लोक आमची पूजा करतील त्यास आमचे जतीपासून अभय मिळेल, म्हणूनच या विधीकरिता हे दोअन मुहूर्त प्रामुख्याने गणले जातात. नागबली या विधीस नक्षत्रदोष पहावा लागत नाही. मगे सांगितल्याप्रमाणे याजन्मी यामागील जन्मी नागवध केला सएल किंवा वधास सहाय्य केले असेल तर त्या पापाने संततीस प्रतिबंध होतो. तो दूर व्हावा म्हणून हा विधी करतात. मध्यम नाग प्रतिमा, तीळ, राळे, गहू अगर तांदूळ यापैकी कोणत्या तरी एकाच्या पिठाची तयार करतात. ती लहान सुपलीत आरक्त वस्त्रावर ठेवतात. त्या प्रतिमेचे समोर यजमानाने सपत्निक पूर्वेकडे तोंड करून बसावे. नेत्राचमन करून नागबली हाविधी करण्या करिता योग्यता प्राप्त व्हावी. शरीराची व मनाची शुद्धता व्हावी म्हणून प्रायश्चिताचा संकल्प करावयाचा - मग प्रधान संकल्प करावयाचा - `सम
______________________________________________
* पंचमी दयिता राजन नागानामानंदवर्धिनी ।
पंचम्मां किल नागाना भवत्युत्सवी महान ॥
एते प्रयच्छन्त्यभयं प्राणिनां प्राणजीविनाम ॥
दालभ्य ऋषी सुहोत्र राजास सांगत आहेत.
भाग नं. २९
इहजन्मनि जन्मान्तरे वा ज्ञानान अज्ञानात वा कृतसर्पवधः तद्दोषपरिहारार्थ तथाच मग कुले केनचित पुरुषेण स्त्रिया वा पूर्वहस्तख्य नागस्य संततेः अंतरायभुढयोगनिवृत्या उत्तमलोकवाप्यर्थ अष्टौ नागान उद्दिश्य श्रीमत अनंत प्रीत्यर्थ नागबलीविधी करिष्ये ॥
अर्थ - मी ह्या जन्मी या मागील जन्मी जाणून वा अज्ञानाने सर्पवध केला असेल; त्या पापाच्या निवृत्तिकरिता तसेच माझ्या कुलातील पुर्षाने किंवा स्त्रीने पूर्वी मारलेल्या नागाच्या दोषामुळे संतती प्रतिबंधकयोग निर्माण झाला असल्यास तो दोष नाहीसा व्हावा व त्या नागासहि योग्य गति मिळावी म्हणून मी नागबली हा विधी, आठ प्रकारचे जे नाग आहेत, त्यास उद्देशून करीत आहे असा अर्थ आहे.
नंतर त्या पिठाच्या नागमूर्तीस संतति प्रतिबंध वगैरे करणारा ( पूर्वी ज्याचा वध केला तो ) त्याचे आवाहन मंत्राने करतात. तो मंत्र असा - `एही पूर्वमृत सर्प अस्मिन पिष्टे समाविश । संस्कारार्थ अहं भक्त्या प्रार्थयामि समाहितः ॥ `नंतर त्या नागाची प्राणप्रतिष्ठा करतात. ( यजमानाने नागमूर्तीस हात लावावा ) नंतर ` भूजङगेशान विग्रहे सर्पराजाय धौमहि । तन्नी नागःप्रचोदयात । या मंत्राने नागाचे षोडषोपचारे पूजन उभयतांकडून केले जाते. नंतर बलिप्रदान करतात. ( एका पत्राबळीवर भात ठेऊन त्यात काकडा लावतात. ) त्यात बलिचेहि पूजन केले जाते व त्या नागाची प्रार्थना केली जाते. ( यजमानाने उभयता उभे राहून प्रार्थना करावी ) ती अशी :- `यझ कश्चित कुले नागो हातो अन्येन केनचित । प्रीती भूतो मया दत्तो बलि गृण्हन्तु तुत्पये ॥ यजमानाने पुढील प्रार्थना तोंडाने म्हणावी :- ``माझ्या कुलांत कोणी आपणास मारले असल्यास त्या सर्व दोषांबद्दल आम्हास क्षमा करून आम्ही दिलेल्या बलीचा स्वीकार करून, शरीरास आरोग्य करावे.'' नंतर बलीस व नागास अक्षता व फुल वहावे. नंतर तो बली देवळावर नेऊन ठेवावा. यजमान पत्नीने दारापर्यंत पाण्याने भरलेले भांडे घेऊन
भाग नं. ३०
जावे, बलीस काकस्पर्श झाल्यानंतर हातपाय धुवून धर्मशाळेत यावे. नंतर ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेचे पुण्य, त्या नागास देऊन त्या पुण्याईने आपण मोक्षास जावे. अशी प्रार्थना करून तो नाग मृत झाला असे समजावे. नंतर यजमानाने तो नाग व तुपाचा द्रोण घेऊन ज्या ठिकाणी त्या नागास दहन करावयाचे आहे तेथे जावे. तेथे त्यास सर्मत्रक अग्नि द्यावा. तेथील विधी आटोपल्यावर यजमानाने धर्मशाळेत यावे. नंतर आठ जे प्रमुख नाग, सर्प, अनंत, शेंध, कपिंल, नाग, कालिय, शंखपाल, भूदर अशी त्याची नावे आहेत. त्यास उद्देशून कणकीचे आठ पिंड द्यावेत. त्यास बलि असे म्हणतात. त्याचे पूजन सरळ हाताने करावे. नंतर एथील ब्राह्मण व उपाध्याय यजमानास आशीर्वाद देतात. त्यावेळी आपले मनोरथ पूर्ण झाल्यावर आपण हा विधी पुन्हा येऊन करावयाचा असल्यास यजमानास विचारणा करावयाचे. नंतर यजमानाने सर्व पिंडप्रदान, नैवेद्य तिलोदक, यवोदक, दर्भ हे सर्व भरून गंगेत टाकावे. या कर्मानिमित्त एक दिवस यजमान ( पतीपत्नी) यास अशीच असते. यजमानाने (उभयतांनी) कुशावर्तावर जाऊन तेथे दिलेल्या मंत्राक्षता (तांदूळ) गंगेत टाकून स्नान करावे. रोजचे कपडे घालावेत. याप्रमाणे त्या सर्व दिवसाचे कर्म पुरे होते.
तिसरे दिवशीचे कृत्य :- तिसरे दिवशी सकाळी, ज्या ठिकाणी नागाचे दहन केले होते, त्या तेथील रक्षा भरून गंगेत टाकून. त्या जागेवर दूध, तुप शिंपडून घरी आल्यानंतर उभयातांनी शुद्ध स्नान करावे. स्नानानंतर अशीच संपते. नंतर घरी पुण्याहवाचन करावयाचे. सुवर्णाची नागप्रतिमा आपले शक्तीप्रमाणे प्रत्येकाने करावी. सुवर्णनाग मूर्तीपूजन विध _ ( शास्त्रात ८० गुंजा वजन असावे असे सांगते. ) त्या नागप्रतिमेची प्राणप्रतिष्ठा करुन शोडषोपचारे त्या नागमुर्तीचे पुजन करावे. नंतर त्या मूर्तीचे विसर्जन करून ती नवी मूर्ती उपाध्यास दान करावयाची, आतापर्यंत जे कर्म झाले त्यामध्ये सांगितलेल्या दानाबद्दल जे द्रव्य देण्याचे आपण ठरविले असेल, ते द्रव्य येथे याच वेळी त्याचे पूजन करून द्यावे नंतर उभयतांनी विडा, दक्षिणा व भांडे
भाग . नं. ३१
घेऊन श्री त्र्यंबकेश्वराचे दर्शनास जाऊन श्री त्र्यंबकेश्वराची प्रार्थना क्रावी. आम्ही केलेली ही आपली यथाशक्ति सेवा आपले चरणी अर्पण केली आहे. आपण आमचे मनोरथ पूर्ण करावे अशी प्रार्थना करून घरी यावे. ज्यांचे आई-वडील परलोकवासी झाले असतील त्यांनी तीर्थश्राद्ध करावे व या दोन्ही विधी निमित्त ब्राह्मण भोजन घालावे. कमीत कमी ८ ब्राह्मण घालतात. उत्तम पक्ष२१ व मध्यम पक्ष १२ ब्राह्मणास भोजन द्यावे. याप्रमाणे ब्राह्मण भोजन झाल्यानंतर हा नारायण नागबली पूर्ण होतोत हे पैतृक कर्म असल्याने, दैविक कर्म करणे जरूर असते. येथील मुख्य देवता श्री त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग आहे. ( या ज्योतिर्लिंगासंबंधी सर्व सविस्तर माहिती ज्योतिर्लिंग या पुस्तकात स्वतंत्र दिली आहे. तो भाविक जिज्ञासूनी जरुर वाचावी. ) `जलधारा शिवपिर्यः या तत्त्वाप्रमाणे श्रीत्र्यंबकेश्वरावर लघुरुद्र करावा. लघुरुद्रास १६ ब्राह्मण सांगतात. त्यास दक्षिणा व भोजन द्यावे. निदान एकादशनी व त्र्यंबकेश्वरास व गोदावरील नैवेद्य करून सुवासिनी-ब्राह्मणभोजन घालावे. या प्रमाणे दैविक कर्म जरूर करावे. हे दोन्ही विधीकरण्याकरीता येथे तीन दिवस रहावेलागते. ( सवड नसल्यास तिसरे दिवशी संध्याकाळी जाता येते) हा विधी त्र्यंबकेश्वर येथेच करावा अशी शास्त्रांज्ञा आहे हे मागे सांगितले आहेच. या विधीची मांडणी शास्त्राद्वारे उत्तम प्रकारची केली आहे.
या विधीसंबंधी समग्र माहिती इतर ठिकाणच्या शास्त्रपंडितास नाही. कारन हा विधी या क्षेत्राचेच ध्येय आहे. त्यामुळे हा प्रयोग करण्याची शास्त्रीय प्रंपरा येथेच ठरलेली आहे. हा विधी करण्याकरिता सर्व भारतातून दरसाल हजारो लोक येतात. पुष्कळशा लोकांचे मनोरथ पूर्ण झाल्याने दाखले येथे पहावयास मिळतात. तसेच पैशाचादिक बाधा असल्यास ती दूर होते. क्वचित द्रव्यलोभास्तव त्यावर असलेल्या नागाची हत्या केली असल्यास, तो नाग त्या माणसाचे अंगात येऊन मुक्ति घेतो अशी उदाहरणे पहावयास मिळतात. ज्याला विवाह झाल्यानंतर १५-२० वर्षात संतति झाली नाही अशा दांपत्याना संतति प्राप्तिसाठी हा विधी केल्यानंतर संतति झाल्याची पुष्कळ उदाहरणे आहेत. ज्यांना फक्त कन्या
भाग नं. ३२
संततीच होत आहे. परंतु पुत्रप्राप्ती होत नाही अशांना हा विधी केल्यानंतर, पुत्रप्राप्ती झाल्याची उदाहरणे आहेत. ज्यांची संतती होऊन वाचत नाही, तसेच असणाऱ्या संततीस आरोग्य लाभत नाही त्या सर्वांना या विधीचा उपयोग झाल्याची शेकडो उदाहरणे आहेत. ती नावासुद्धा सविस्तर देता येणे शक्य नाही कारण त्याचाच ग्रंथ होऊन बसेल. थोडक्यात म्हणजे शास्त्रकारांनी प्रपंचात येणारी नानाविध दुःखे यांचा परिहार व्हावा म्हणून, दुष्ट व अदुष्ट कारणे यांचा विचार करून त्यांच्या परिहारा करिता जी विधाने करण्यात सांगितली आहेत, त्यापैकीच अनुभवसिद्ध असे हे वैदिक अनुष्ठान आहे. यास श्रद्धेची पूर्ण आवश्यकता आहे. कारण `श्रद्धावान ' लभते ज्ञानम । असा सिद्धांत आहे. तरी श्री त्र्यंबकेश्वर महराजांचे चरणी पूर्ण श्रद्धा ठेवून आपले संसारसुखाची पूर्तता करून घ्यावी.
******************************************
श्राद्ध क्रिया व नारायण नागबली यासंबंधी
ऐतिहासिक व पौराणिक कथा
पौराणिक कथा त्रिशंकू राजाची
पूर्वी सूर्यवंशातर्गत इक्ष्वाकु कुलात, त्रिशंकु या नावाचा राजा होऊन गेला. त्याच्या वडिलांचे नांव पृथू असे होते. त्यास अशी इच्छा उत्पन्न झाली की, आपण स्वर्गात जावे. म्हणून तो आपले घराण्याचे जे कुलगुरु वसिष्ठ यांचेकडे जाऊन त्यास त्याने विनंती केलीकी स्वर्गकामी यजेत्` - ज्यास स्वर्ग मिळावा असी इच्छा असेल त्याने यज्ञ करावा, असे जर आहे तर मला स्वर्गात जाण्याची इच्छा आहे. परंतु माझी इच्छा, मृत झाल्या नंतर स्वर्गप्राप्तीची नसून या देहानेच ( पंचभौतिक) स्वर्गास जावे अशी आहे. आपण यज्ञाचे आचार्यत्व करून तो यज्ञ मजकडून करवावा. त्यावर वसिष्ठ ऋषींनी सांगितले की, `या जड देहाने स्वर्गात जाता येत नाही, तेथील शरीरे तेजोमय असताततेव्हा तुझी इच्छा पूर्ण होणे शक्य नाही. म्हणून मी तुझ्याकडून मज करवू शकत नाही.' असे वसिष्ठांनी सांगितल्या नंतर, त्याचे
भाग नं. ३३
मुलासहि त्रिशंकूने विचारणा केली. परंतु वशिष्ठाचे मुलांनीही नकार दिल्यावर, त्रिशंकून राग येऊन त्याने सांगितले की, `मी दुसरा सुरू करून त्याजकडून यज्ञ करवून घेईन' असे म्हटल्यांबरोबर वशिष्ठांनाहि, योग्य मार्गदर्शन करीत असता हा ऐकत नाही असे वाटून कोप झाला. त्यांनी त्रिशंकूस असा शाप दिला कि, `तू तेजोहीन होशील'. त्या शापाने त्रिशंकू निस्तेज होऊन गेला. परंतु त्यानेआपला हट्ट न सोडता, तो विश्वामित्राकडे गेला व आपली इच्छा त्यास सांगून त्यास आचार्यत्वाची प्रार्थना करूनत याच्या यज्ञीय संमतीने यज्ञास काम होत नाही असे विश्वामित्राचे लक्षात आल्यावर त्यांनी असे ठरविले की, आपण आजपर्यंत जी तपश्चर्या केली त्या पुण्याईच्या दानाने, त्यास आपण स्वर्गात पाठवू. कारण आपण दिलेला शब्द पूर्ण केलाच पाहिजे असा विचार करून त्रिशंकूचे हातावर आपले सर्व पुण्याईचे उदक सोडून त्यास विश्वामित्रांनी स्वर्गात पाठविले. स्वर्गाचा राजा जो इंद्र त्यास स्वर्गात घेईना. त्यास स्वर्गातून खाली ढकलण्यात आले. तो खालीमस्तक करून कोलमडला. त्याने विश्वामित्रांची प्रार्थना केली तेव्हा विश्वामित्रांनी त्यास आकाशात आधांतरी स्थिर केले व इंद्रास सांगितले की, `तू यास स्वर्गात घे, न घेतल्यास मी स्वतंत्र स्वर्ग निर्माण करून त्यात त्यास ठेवीन, तेव्हा देवेंद्र व विश्वामित्र यांच्यामध्ये विचारविनिमय होऊन त्रिशंकूस नक्षत्रामध्ये जागा देण्यात आली. अशा रीतीने त्रिशंकूच्या जीवात्म्यास योग्य गति मिळाली नाही म्हणून त्याचा मुलगा जो हरिश्चंद्र, याने हा विधी केला असे दालभ्य संहितेत `त्रिशंकुः स्वर्गकामेन हरिश्चन्द्रेण वै कृत' असे वर्णन आहे.
********************************
पौराणिक कथा दुसरी -
भीष्माचार्याची कथा
एकदा भीष्माचार्य आपले दिवगंत वडीलजे शंतनू यांना उद्देशून श्राद्ध करीत असताना त्यास पिंड देण्याकरिता जमिनीवर दर्भमुष्टि
भाग नं. ३४
पसरल्या होत्या; त्या खालील जमिनीतून त्याच्या वडिलांचा सुवर्णकंकणयुक्त होत वरती आला. तो हात पाहिल्यानंतर, भीष्माचार्यांना शंका उत्पन्न झाली की, पिंडदान हे या हातावर करावे किंवा दर्भावर करावे. त्यावर त्यांनी असे सांगितले की, शास्त्रप्रामाण्यावरून मी पिंडदान करीत आहे. त्यामुळे माझे वडिलांचा हात प्रत्यक्ष पिंड घेण्यास भूमीतून वर आला. शास्त्र सांगत आहे की, पिंडप्रदान हे दर्भावरच केले पाहिजे. असे सांगून त्यांनी पितरास उदेशून हातावर पिंड न देता दर्भावरच पिंडप्रदान केले, हे पाहून वर आलेला हात अदृश्य झाला. शंतनूने भीष्मास सांगितले की, `मी तुझी शास्त्रावरील श्रद्धेची परीक्षा पहाण्याकरिता हात वर केला होता. परंतु शास्त्रात सांगितल्याप्रमाणे श्रद्धेने तू जे दर्भावर पिंडप्रदान केलेस, त्यामुळे मला पूर्ण तृप्ती मिळाली आहे.' असा कथाभाग महाभारतात अनुशासन पर्वात आहे. ( अध्याय ८४ श्लोक १४ पासून ) याप्रमाणे अनेक उदाहरणे याविषयी आहेत. तो सर्व इतिहास देता येणे शक्य नाही.
भाग . नं. ३५
उपसंहार
वेद पुराणदि ग्रंथात नाना तऱ्हेचे रोग व संकटे यांचे निरसनार्थ विविध विधी-विधाने सांगितली आहेत. आपणकेवळ निसर्गाचाच जरी विचार करू लागलो तरी असे दिसते की, निसर्गातहि कार्य करण्याची शक्ती दृष्टीस पडते. चंद्रोदय झाला असताना समुद्राचे पाणी वर खेचले जाते म्हणजे समुद्रास भरती येते. तसेच वर फेकले गेलेले पदार्थ ( कार्ये) पृथ्वीच्या आकर्षण शक्तीचे (कारण) टपकनखाली पडतात. कार्यकारन भावांचा विचार करताना असे दिसते की, काही कार्ये व त्यांची कारणे सर्वसाधारण मानवी बुद्धिस आकलन करता येतात. तर काही मानवी बुद्धीस अनाकलनीय राहतात. केवळ तो कार्ये व त्यांची कारणे आकलन करता येत नाहीत; म्हणून ती आकलन करण्यास अशक्य किंवा त्याचा संपूर्ण अभावच आहे असे म्हणणे तर्कसंगत वा बुद्धिवादास धरूनहोणार नाही,ही जोआर्ये वा कारणे, जी सर्वसाधारण मानवी बुद्धीच्या आवाक्याबाहेरची असतात. त्यांचा सूक्ष्म शोध करून त्यांची साखळी जमविण्याचे कम वेद व शास्त्रे करतात व नारायन नागबली या सारख्या विधी-विध्धानाने ती प्रकाशित केली जातात. सांप्रतहि हजारो लोक नाग-नारायणबलीचे विधान अपत्यप्राप्तीसाठी अगर काही हेतूपूर्तीसाठी करीत असतात. हा विधी म्हणजे सकाम श्राद्ध आहे. हे पुस्तकात निर्दिष्ट केले आहेच नाग व नारायण यास उद्देशून केलेले सकाम श्राद्ध म्हणजेच त्यास उद्देशून अति श्रद्धेने दिलेल्या विधियुक्त अन्नाहार, द्रव्य, तिल दर्भादि यास नारायण-नागबली असे म्हणतात. हा विधी शास्त्रप्रामाण्य व परंपरा यास धरूनच त्र्यंबकेश्वर येथे केला जातो. हे विधान पुत्रप्राप्ती, जीवित संततीस आरोग्य, दुर्धर शरीरपीडेचा नाश, योगक्षेम व्यवस्थित चालणे, मृतात्म्यास इष्ट गति मिळणे, पिशाच पीडेपासून मुक्तता इत्यादि हेतूचे पूर्तीसाठी करतात. वर सांगितलेल्या हेतूचा विचार करता असे दिसते की अपत्यतेचे कारन उभय पतिपत्नीस
भाग नं.३६
अगर एकात असणारे शारीरीक दोष हे जसे शकते; तसेच उभय पतीपत्नी सर्वथा दोषरहित असून जर अनपत्यता असेल तर काही अदृष्ट कारण असण्याची शक्यता आहे. ही गोष्ट गृहित धरणे योग्येच आहे. अदृष्ट कारण परंपरा निश्चित करताना पुष्कळ लोकांना येणारा अनुभव समान हीच एकमात्र कसोटी असु शकते व त्यावरून विधी-विधानाचा युक्तपणा ठरविला जातो. याही विचारसरणीत सूक्ष्म दोष रहातो तो असा की, व्यवहारात पुष्कळ वेळा असे आढळते की एकादा माणूस एखाद्या गणिताचे उत्तर बरोबर सांगतो. परंतु त्याची उत्तर आणण्याची पद्धत मात्र चूक असते. तसाच प्रकार इतर ठिकाणी केलेल्या काही विधीबद्दल असण्याची शक्यता आहे. म्हणजे विधान केल्यानंतर अनपत्यता दूर झाल्यास विधानाने निर्दिष्ट केलेली अदृष्ट कारणपरंपरा शंभर टाक्के अचूकासे सांगणे संपूर्णतया तर्कसंगत होणार नाही. दुसऱ्या बाजूने विचार करता असे दिसते की, चुकीच्या पद्धतीने एखाद्या गणिताचे उत्तर चुकण्याची शक्यता जास्त म्हणून सर्वसाधारण समान अनुभव आल्यास कारणपरंपरायुक्त असे म्हणणे चूक ठरणार नाही. वरील विवेचनावरून एक गोष्टा लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. येथे केलेले हे विधन अनुभवसिद्ध व पूर्ण परंपरेला धरूनच केले जाते. सांप्रत अगोदर कारणेपरंपरेचा विचार करणे हे प्रयत्नवाद व बुद्धिवाद यास सोडून आहे असे मानण्यात येते असे मानणे एकांगीपणाचे निदर्शक आहे. केवळ गोचर कारणपरंपरेचा विचार करणे हे जसे इष्ट नव्हे. दोघांचाहि विचार करणे हे तर्कास धरून आहे. एकाच कारणावर अवासतव भार देणे म्हणजे रोगापासून मूक्तता हे प्रधान ध्येय अभिप्रेत असता. केवळ विशिष्ट वैद्याचेच औषध घेऊन रोगमुक्त होण्याचा आग्रह धरणे होय. याप्रमाणे सारासार विचार पद्धतीने विचार करूनहेनारायण नागबलीचे वेदप्रणीत विधान आपले वंशवृद्धीकरता संसारात येणाऱ्या अपरिहार्य अडचणी दूर होणेकरिता भाविक व श्रद्धाळूजनांना शास्त्रकारांनी अत्यंत सूक्ष्म दृष्टीने विचार करून मार्गदर्शन म्हणून सांगितले आहे. शास्त्रज्ञांचे इच्छेप्रमाणे
भाग नं. ३७
श्री त्र्यंबकेश्वरचरणी अशी प्रार्थना करीत आहे की :-
सर्वेपि सुखिनःसन्तु सर्वे सन्तु निरामयाः ।
सर्वे भद्राणि पश्चन्तु मा कश्चिद् दुःखमाप्नुयात् ॥
ही अल्प सेवा श्री त्र्यंबकेश्वर महाराजांचे चरणी समर्पण करून पूरी करतो.
नारायणबली
या विधीच्या अंतर्गत प्रमुख विधींना कार्यक्रम
अधिकार सिद्धर्थ (९) नवति प्राजापत्यानि । ( प्रायश्चितम् ) एकादश रुद्रश्राद्धम् _ प्रधान संकल्प --पंचदेवतास्थापन व पूजनअग्नि स्थापन. अन्वाधान, मुख्य देवतास उद्देशून हवन, प्रायश्चित होम, अग्निपूजन, विष्णूश्राद्ध, पंचदेवता श्राद्ध, बलिदान, पालाशविधी, नारायण प्रेत आवाहन, पूजन व विसर्जन- नारायण प्रेतदहन, उदकुंभ दान, अवयव दान, अवयव पिंडदान व पिंडपूजन, स्मशान बलिअग्न्नामहिक्रोदिष्ट श्राद्ध, अग्नि स्थापन, प्रेतास उद्देशून हवन, मासिक श्राद्ध, सपिंडी श्राद्ध, चटरुपी ब्राह्मण आवहन, पूजन, अर्घ्यपात्र संयोजन, पिंडदान पिंड संयोजन पार्थेय श्राद्ध.
नागबलीचा विधिक्रम
नारायन नागबली हा विधी यजमानाने आपले सुत्राप्रमाणे करून घेण्याची काळजी घ्यावी.
प्रायश्चित संकल्प, प्रधान संकल्प, नागमूर्तीची प्राणप्रतिष्ठा, पिष्ट नागमूर्तीचे पूजन, बलिदान, बलिपूजन, नागमूर्ती विसर्जन, दहन, पिंडदान, आशीर्वाद पूर्णता.
उपाध्यायाच्या घरचा कार्यक्रम
पूण्याहवाजम सुवर्णनाघप्रतिमा पूजन व प्रतिमेचे दानसंकल्पित व्यप्रदान - तीर्थश्राद्ध - ब्राह्मणभोजन प्रतिमेचे दन, संकल्पित द्रव्यदान.
भाग नं. ३८
नारायणबलीतील द्यावयाची दाने
१) रुद्रश्राद्ध - २१ ब्राह्मणास भोजन व २२ बैल, २) विष्णूतर्पण सांगता ( पयस्विनी गाय ), ३) पंचदेवता स्थापनेकरिता - (पांच कलश, पांच ताम्हणे, पांच मूर्ती), ४) विष्णूश्राद्ध - (गोदान), ५) पंच देवताश्राद्ध (भूमिदान, कपिला गाय, बैल, महिष, तेरा मण तील पर्वत), ६) एकादशाहश्राद्ध (वृषोत्सर्ग गोप्रदान), ७) महिकोंदिष्ट श्राद्ध (पापक्षालनार्थ धेनू, ऋणधेनू, वैतरणा धेनू अष्टविध पददान, दशदाने), ८) षोडश श्राद्ध ( अन्न, उदक, दीप), ९) सपिंडी श्राद्ध ( मोक्षधेनू, वस्त्र, दक्षिणा), १०) पाथेयश्राद्ध ( छत्र, कमंडलू, उपानह, कंबल )
नागबलीकरिता दाने
कपिला धेनू, अन्नदान, सुवर्णनागप्रतिमा,
नारायण नागबलीस लागणारी उपकरणी व साहित्य :-
यजमानाने बरोबर आणावयाचे सामान
धोतरजोडी कोरी, एक पांढरे पातळ नऊवारी, पांढरे कापडाची चोळी, आपले शक्तिप्रमाणे सोन्याची नागप्रतिमा, धोतर व पातळ सचैल वस्त्राकरिता ( ज्या वस्त्रावर उभयतांनी स्नान करावयाचे ते पुन्हा नेसावयाचे नसते. )
खालील सर्व सामानाची व्यवस्था उपाध्याय करतात.
चरुपात्र, पाच कलश, पांच तबकड्या, तांब्या, भांडे, पळी, तीन ताम्हने, पांच गोमुख्या, पांच धोतरे, पांच आसने, चार देवतांच्या मूर्ती, ( सुवर्ण, ताम्र, रजत, लोह) होमाकरिता तुप, तांदूळ एक शेर, पळसाच्या काड्या, समिधा, शुभा (गोवऱ्या) पंचवीस, तीळ, जव, फुले, पुष्पमाला पंचामृतयुक्त पूजेचे सामान , सुगड, स्वयंपाकरिता साहित्य, जानवी दोन, द्रोण दहा, पत्रावळी दहा, दर्भ, कणीक एक शेर, सर्वीषधी सामान.
साभार :- आंतरजाल , सोशल मिडिया , ग्रन्थ पुस्तके ...
टिटवाळा
Search
Search here.