नवचंडी साहित्य यादी
यज्ञ - शान्ति > पूजा शान्ति साहित्य यादी Posted at 2018-07-29 03:26:42
## ----*नवचंडी साहित्य सामान लिस्ट*---- ##
चौरंग व पाट टोटल मिळून सात आठ किंवा जमल्यास 10 - 12 ( कारण पाठ म्हणताना पोथी साठी सुद्धा लागतील )
बसण्यासाठी आसन , चादर bedsheets 4
5 कलश व 5 ताम्हण
2 पळी व 2 फुलपात्र
2 समई व 2 निरांजन
गणपती , घंटी , शंख , देवी , टाक
हळद , कुंकू , अबीर , चंदन , अष्टगंध
कापूर , गुग्गूळ धूप , धुपस्टिक्स , अगरबत्ती पुडा ,
तेलवाती , फुलवाती , माचिस , 4 बटाटे , लिंबू
1/- 2/- रू. चे 51 काॅईन
पंचामृत : - दूध , दही , मध , साखर , तूप ( वाटीभर )
थोडी खीर (तांदूळाची ) , थोड़ा भात , दही
पिवळी मोहरी 5/- रु. ची
कमळाचे बी 5/- रु. ची
गव्हाच्या पिठात हळद टाकून केलेले पणती सारखे 17 दिवे
गोमूत्र , गंगाजल ,
प्रसादाला पेढे 250 ग्राम , थोड़े पूरण खीर
1 पंचा , 1 टाॅवेल , 1 नॅपकीन , दोन तीन ब्लाउज पीस ,
12 नारळ व मोठ्या सुपा-या 15 , छोटयां सुपाऱ्या 25
फळ 15 ( काही फळे डबल टीबल चालतील ) डाळिंब कम्पल्सरी , दोन डझन वेलची केळी , विड्याची पानं 100
खाण्याचे बदाम , काजू , खारीक , मनुका प्रत्येकी 51
( सुकामेवा ) मिक्स ड्रायफ्रूट 250 ग्राम ( हे देवाला व देवीच्या हवनाला सुद्धा लागणार आहे )
खोबरे वाट्या 8
51 हळकुंड , 51 वेलची , 51 लवंग , 2 जायफळ
तिळाचे तेल दिव्यासाठी
अत्तर व थोडा कापूस
5 जानवे जोड व हाताचा नाडा
होमासाठी लाकडे - ढलप्या 6 - 7 किलो
विटा 20 किंवा हवनकुंड
रेती , वाळू - 1 घमेली
समिधा बंडल - 11 , शेणी - 8
धोतर , उपरणे - शर्ट , पॅन्टपीस दान म्हणून
वेगवेगळी रंगीत फुले जास्त व 3 - 4 हार व 4 - 5 गजरे
तुळस , दुर्वा , बेलपत्र एक दोन बंडल सर्व
एक नवीन कलश व ताम्हण दान म्हणून जमल्यास
आंबा , वड , पिंपळ , जांभूळ , उंबर या झाडांची 8 - 8 पाने / डहाळी
बेलफळ
नवी काशाची वाटी / थाळी / भांडे
गहू 3 किलो व बारीक तांदुळ 8 किलो
तूर , मुग , चणे , मसूर , मटकी , चवळी , वाटाणा , साखर , भगर , शेंगदाणा , रवा , पोहे , साबुदाणा. हे सर्व नवग्रहांची धान्ये अक्खे किंवा डाळीच्या स्वरूपात प्रत्येकी 250 ग्राम वेगवेगळे पुडित पिशवीत
गूळ व खडीसाखर 150 ग्रॅम
उडीद डाळ 150 ग्रॅम
काळे तीळ सव्वा किलो
सफेद तीळ 250 ग्रॅम
गायीचे शुध्द तुप दीड किलो
साडी , चोळी व सौभाग्य अलंकार दान
एक साड़ी देवीला ओटी म्हणून
हवन सामग्री पूडा व सर्वोषधी 50 ग्रॅम
जव 100 ग्रॅम , साळ 250 ग्रॅम
10 रू. च्या 15 नोटा व 50 रू. च्या 10 नोटा व 100 रू. च्या 4 नोटा
कोहळा व एक मोठी सुरी / चाकू / खड्ग
पळसाच्या पानांचे ( किंवा इतर जे शक्य असेल ते ) खोल ताटासारख्या 25 - 30 पत्रावळी व 25 - 30 द्रोण ,
रांगोळी व रंग
--**--**-----***-------***------***----***----***-------
((( वर सांगितलेले सामान निट व्यवस्थित आणावे , मात्रा कमी करू नये , गुरुजी सुद्धा बरेच सामान आनणार आहे जे यात लिहिलेले नाही )))
या व्यतिरिक्त घरातील - स्टील ची दोन तीन मोठी ताटे , पाच सहा वाटया , पाच सहा चमचे , दोन टोप भांडे वेगेरे लागू शकतात
सर्व साहित्य स्वच्छ करून ठेवावे , पेपर डिश आणून ठेवणे , त्यामध्ये फराळ् वेगेरे होउ शकतो , दोन तीन वेळा चहा - कॉफी - सरबत होउ शकते , गुरुजीना फराळ् म्हणून फळे - राजगिरा लाडू - केळाचे वेफर्स - साबूदाना बटाटा चिवड़ा असे लागेल , एकूण सहा सात गुरुजी असू शकतात ...
* पुजेच्या आधीच्या दिवशीच् व पुजेच्या दिवशी सुद्धा सर्व घर गोमूत्र गंगाजल शिंपडून स्वच्छ करणे..
* पुजेच्या दोन दिवस आधिपासून सर्वानी आंघोळीच्या पाण्यात थोड़े गोमूत्र गंगाजल टाकून आंघोळ करणे ..
* पुजेला लागणारे ताम्बे पितळेची भांडी ( कलश - ताम्हण - समई वेगेरे ) तसेच स्टील ची भांडी वेगेरे सुद्धा स्वच्छ साफ करून ठेवणे ..
* दाराला हार , तोरण लावणे.. दारासमोर रांगोळी काढणे..
* पुजेच्या दिवशी उपवास असेल.. उपवासचे पदार्थ चालतील - वर सांगितले आहे
* पूजेच्या एक महीना आधिपासून व एक महीना नंतर कोणीच मांसाहार - चायनीज वेगेरे खाऊ नये ( घरात - बाहेर कुठेच नाही )
मोबाईल वैगेरे बंद ठेवणे किंवा दुसऱ्याकडे देणे व सर्व लक्ष पूजेकडे व गुरुजी जे सांगतील त्याकडे असावे .
पूजेच्या काही दिवस आधीपासून व काही दिवस नंतर पर्यंत ( साधारण कमीत कमी 11 - 21 दिवस तरी ) घरातील सर्व सदस्यांनी शाकाहारी राहावे. म्हणजे पूर्ण फळ प्राप्त होण्यास अडथळा येत नाही.
-- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- --
महत्वाचे --> या सर्व पूजा - यज्ञ - साहित्य याद्या / लिस्ट अनेकांची मते विचारात घेऊन बनवलेल्या आहेत .. यादितील साहित्य किंवा संख्या यामध्ये स्थळ - प्रांत विभाग / ब्राह्मण शाखा / पद्धत - रीती - रिवाज या प्रमाणे कमी जास्त तो बदल होऊ शकतो , या साठी - हे एवढेच् कसे / असेच का / एवढी संख्या ??? वैगेरे वैगेरे अशा तक्रार ना करता या याद्यांचा लाभ घ्यावा .. इतरांना पाठवताना स्वतः त्यामध्ये योग्य तो बदल करावा. काही सूचना - सुधारणा असल्यास नक्की कळवावे..
धन्यवाद ...
Search
Search here.