नवनाथ आरती

आरती  > संकीर्ण इतर आरती Posted at 2018-12-05 05:10:48
नवनाथ आरती जयदेव जयदेव जय श्रीनवनाथा , हो स्वामी नवनाथा । भावार्ते आरती, ओवाळू आरती, श्रीगुरुनाथा ॥ जयदेव जयदेव ॥ धृ ॥ कलियुगी अवतार नवनाथांचा । केलासे उद्धार भक्तजनांचा । दावीला मूळमार्ग शाबरी विद्येचा । आगळा महिमा न कळे स्वामी सिद्धांचा ॥ १ ॥ जयदेव जयदेव जय श्रीनवनाथा , हो स्वामी नवनाथा । भावार्ते आरती, ओवाळू आरती, श्रीगुरुनाथा ॥ जयदेव जयदेव ॥ मच्छीपासूनि झाले स्वामी मच्छिंद्र । गोरक्ष जन्मले गोवर भस्मात । जालंदर उत्पत्ति यज्ञकुण्डात । कानिफ पैदास गजकर्णात ॥ २ ॥ जयदेव जयदेव जय श्रीनवनाथा , हो स्वामी नवनाथा । भावार्ते आरती, ओवाळू आरती, श्रीगुरुनाथा ॥ जयदेव जयदेव ॥ जयाचे चरणापासूनी झाले चर्पटीनाथ । गहिनी गोपीचंद अडबंगनाथ । हरिणीने रक्षिले भर्तरीनाथ । पुढे चौर्‍यांशी सिद्धांचे गणित ॥ ३ ॥ जयदेव जयदेव जय श्रीनवनाथा , हो स्वामी नवनाथा । भावार्ते आरती, ओवाळू आरती, श्रीगुरुनाथा ॥ जयदेव जयदेव ॥ कलीमध्ये नवनाथ प्रकटले । शाबरीविद्या देऊनि जग उद्धरिले । विद्येच्या प्रतापे सुरवर जिंकिले । नाथांच्या सेवेशी शरणागत आले ॥ ४ ॥ जयदेव जयदेव जय श्रीनवनाथा , हो स्वामी नवनाथा । भावार्ते आरती, ओवाळू आरती, श्रीगुरुनाथा ॥ जयदेव जयदेव ॥

Search

Search here.