पंचायतन आरती
आरती > संकीर्ण इतर आरती Posted at 2018-10-17 04:37:40
पंचायतन आरती
जयदेव जयदेव जय पंचायतना ॥
हरि हर भगवती गणपति चिन्मणि चिद्रत्ना ॥ध्रु०॥
क्षिरनिधिजापति शेषशयना गोविंदा ॥
नित्य निरामय सच्चित्सुखरूप निर्द्वंद्वा ॥
बाळ मुकुंदा परमानंदा सुखकंदा ॥
आरति तुझिया चरणारविंदा ॥१॥
कर्पूरगौरा गिरिजारमणा महादेवा ॥
हर मृड शिव शंकर स्वामी नीलग्रीवा ॥
वेदश्रुति वदती तुज एकमेवा ॥
आरति करिता घडली तव सेवा ॥२॥
चिच्छक्ती चिन्मात्रें तूं मूळ माते ॥
अनघ निजमुखसरिते स्वानंदभरिते ॥
करविरपुरवासिनि तूं कुळादैवते ॥
आरति केली तुजला चित्सत्ते ॥३॥
मंगळमूर्ति गजानन प्रारंभीं स्तवितां ॥
सकलहि विघ्नें नासुनि हरिली तनु ममता ॥
म्हणवुनि भावें नमिलें तुज एकदंता ॥
आरति करितां झाली समसाम्यें समता ॥४॥
विश्वप्रकाशक अंबरमणि निजतेजाचा ॥
चिद्नगनीं तो उदयो होतां तम कैंचा ॥
परा पारुषली कुंठित हे वाचा ॥
अभंय निज रंगें हा रंगविला साचा ॥५॥
Search
Search here.