पाठात्मक नवचंडी साहित्य यादी

यज्ञ - शान्ति  > पूजा शान्ति साहित्य यादी Posted at 2018-07-29 03:21:27
पाठात्मक नवचंडी साहित्य यादी ( हवन नाही ) 2 कलश आणि 3 ताम्हण पळी व फुलपात्र हळद , कुंकू , चंदन / अष्टगंध अगरबत्ती , कापुर , माचिस समई , निरांजन , वाती / कापूस दिव्याना तेल व तूप , धुप आंब्याची पाने / डहाळ्या तुलशी पत्र , बेलपत्र , दूर्वा देवाला हार , तोरण वेगेरे गजरे - वेणी वेगेरे , रांगोळी अर्धी वाटी पंचामृत , पेढे किंवा प्रसाद ( खीर / पुरण इत्यादी ) देव व हात पुसन्यासाठी नॅपकिन 25 सुटे पैसे कॉइन्स , 10 च्या 11 नोटा , 50 च्या 5 नोटा , 3 जानवे जोड़ , गुळ 100 ग्राम , खडीसाखर 100ग्राम , सूंठ किंवा सुंठ पावडर , 2 खोबरे वाटया , 21 वेलची , 21 लवंग , जायफल 2 - 3 पत्रावळी किंवा मोठी ताटें 3 - 4 द्रोण किंवा वाटया व 2 चमचे गणपति , घंटी , शंख , एक चौरंग , पाट  ( पोथी ठेवायला पाट 5 ते 6 असल्यास उत्तम ), गहु व तांदूळ दोन्ही सव्वा किलो ( नवग्रहांची धान्ये - तूर, मूग, चने, वाटाने, मसूर, उडीद, मटकी, चवळी, शेंगदाने, साखर, तीळ - ही धान्ये प्रत्येकी 250 ग्राम अख्खे किंवा डाळीच्या स्वरुपात वेगवेगळे पुड़ित  ) 25 सुपाऱ्या व 25 विड़्याची पाने 5 फळे, 5 नारळ, फुले मिक्स ( तेरडा नको ) , गोमूत्र , गंगाजल , लाल व पिवळे वस्त्र / ब्लाऊज़ पीस , एक साडी व पीस देवीला ओटी दान म्हणून , ब्राह्मणाला वस्त्रदान म्हणून धोतर उपरणे / शर्ट पॅन्ट पीस - ( जमल्यास ) कम्पल्सरी नाही  , 11 हलकुण्ड , 11 अक्रोड , 11 बदाम 50 ग्राम मिक्स ड्रायफ्रूट्स 1 पंचा / उपरणे व 1 टॉवेल व नॅपकिन नविन , हाताला बांधायचा धागा , अत्तर , ( ब्राह्मणाला शिधा म्हणून - पीठ , बटाटे, एक भाजी , मसाला , तांदूळ डाळ , तूप गुळ ) दरवाजा ला हार तोरण लावणे , आंब्याची डहाळी लावणे, रांगोळी काढणे सर्व घरात गोमूत्र , गंगाजल शिंपडणे . हळद कुंकु वगेरे वाटयांमधे काढून ठेवणे. देवीचे पाठ आहेत त्यामुळे आपल्या कुलदेवतेला - कुलस्वामी ला परंपरेनुसार जो भोजन नेवैद्य आवडत असेल ते तयार ठेवणे ( अर्थात उपवास नसल्यास ) किंवा पेढे पूर्ण खीर यापैकी काहीतरी दाखवू शकतो , स्वतःला आणि ब्राह्मणांना फराळ म्हणून राजगिरा चिकी /  राजगिरा लाडू  / केळा वेफर्स / बटाटा चिवडा यापैकी पदार्थ असावेत .. मोबाईल वैगेरे बंद ठेवणे किंवा दुसऱ्याकडे देणे व सर्व लक्ष पूजेकडे व गुरुजी जे सांगतील त्याकडे असावे . पूजेच्या काही दिवस आधीपासून व काही दिवस नंतर पर्यंत ( साधारण कमीत कमी 11 - 21 दिवस तरी ) घरातील सर्व सदस्यांनी शाकाहारी राहावे. म्हणजे पूर्ण फळ प्राप्त होण्यास अडथळा येत नाही. -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- महत्वाचे -- या सर्व पूजा - यज्ञ - साहित्य याद्या / लिस्ट अनेकांची मते विचारात घेऊन बनवलेल्या आहेत .. यादितील साहित्य किंवा संख्या यामध्ये स्थळ - प्रांत विभाग / ब्राह्मण शाखा / पद्धत - रीती - रिवाज या प्रमाणे कमी जास्त तो बदल होऊ शकतो , या साठी -  हे एवढेच् कसे / असेच का / एवढी संख्या ??? वैगेरे वैगेरे अशा तक्रार ना करता या याद्यांचा लाभ घ्यावा .. इतरांना पाठवताना स्वतः त्यामध्ये योग्य तो बदल करावा. काही सूचना - सुधारणा असल्यास नक्की कळवावे.. धन्यवाद .... 

Search

Search here.