पुष्पांंजली ही तुम्हा अर्पितो
आरती > श्री दत्तात्रेय आरती Posted at 2018-10-12 09:26:46
पुष्पांजली ही तुम्हा अर्पितो दत्त गुरु सदया ॥ तवपदी वंदन करण्या स्फुर्ती द्यावी या ह्रदया ।
तुलसी बेल आणि फुले सुवासित , नाना विधी माला , अर्पित असे बहू प्रेमभरे , आम्हीं श्रीगुरु चरणाला ॥
किंचित सेवा भजन पुजन हे , घडले या चरणी , गोड करुनी घ्या प्रेमे आमुची , भक्तांची करणी ॥
दिनदयाळा भक्तवत्स्ला , श्रीगुरु यति राया , पुष्पगंध हा सदा अर्पितो , प्रेमे तव पाया , साधुसंत देवादिक हे , नमिती तव पायी , धन्य मानीती ते आपल्याला , संशय मुळी नाही ॥
अत्रीरुषी अनुसुया सूता तु , अवतरला कलिया , ऊध्दरण्याला भक्तजनाला , हरुनी पापलया ॥
दिन दयाळा आम्ही लेकुरे , शरण तुम्हा आलो , भक्ती प्रेम पूष्पांजली ही वाहण्याला सजलो ॥....
Search
Search here.