साईबाबा आरती2

आरती  > साईबाबा आरती Posted at 2018-12-03 17:27:18
घेउनियां पंचारती । करुं बाबांसी आरती । करुं साईसी आरती , माझ्या बाबांसी आरती ।। उठा उठा हो बांधव । ओंवाळूं हा रमाधव ।। सांई रमाधव ।। ओं बाबा रमाधव ।। करुनीयां स्थीर मन । पाहूं गंभीर हें ध्यान ।। साईंचें हें ध्यान , माझ्या बाबांचे हें ध्यान ।। कृष्णनाथा दत्तसाई । जडो चित्त तुझे पायीं । साई तुझें पायीं ।। जडो चित्त तुझे ठायीं ।। घेउनियां पंचारती । करुं बाबांसी आरती । करुं साईसी आरती , माझ्या बाबांसी आरती ।।

Search

Search here.