साईबाबा नमस्कार अष्टक

स्तोत्र - मंत्र  > साईबाबा स्तोत्र Posted at 2018-12-03 19:18:07
साईबाबा नमस्काराष्टक अनंता तुला तें कसें रे स्तवावें । अनंता तुला तें कसें रे नमावें । अनंत मुखांचा शिणे शेष गातां । नमस्कार साष्टांग श्री साईनाथा ।। 1 ।। स्मरावें मनीं त्वत्पदां नित्य भावें । उरावें तरी भक्तिसाठीं स्वभावें ।। तरावें जगा तारुनी मायताता । नमस्कार साष्टांग श्री साईनाथा ।। 2 ।। वसे जो सदा दावया संतलीला । दिसे अज्ञ लोकांपरी जो जनांला ।। परी अंतरीं ज्ञान कैवल्यदाता । नमस्कार साष्टांग श्री साईनाथा ।। 3 ।। बरा लाधला जन्म हा मानवाचा । नरा सार्थका साधनीभूत साचा ।। धरुं साइप्रेमा गळाया अहंता । नमस्कार साष्टांग श्री साईनाथा ।। 4 ।। धरावें करीं सान अल्पज्ञ बाला । करावें अम्हां धन्य चुंबोनि गाला ।। मुखीं घाल प्रेमें करा ग्रास आतां । नमस्कार साष्टांग श्री साईनाथा ।। 5 ।। सुरादीक ज्यांच्या पदा वंदिताती । शुकादीक जयांतें समान्तव देती ।। प्रयागादि तीर्थें पदीं नम्र होतां ।। नमस्कार साष्टांग श्री साईनाथा ।। 6 ।। तुझ्या ज्यां पदा पाहतां गोपबाली । सदा रंगली चित्वस्वरुपीं मिळाली ।। करी रास क्रीडा सवें कृष्णनाथा । नमस्कार साष्टांग श्री साईनाथा ।। 7 ।। तुला मागतों मागणें एक घावें । करा जोड़ितों दीन अत्यंत भावें ।। भवीं मोहनीराज हा तारि आतां । नमस्कार साष्टांग श्री साइनाथा ।। 8 ।

Search

Search here.