समान नक्षत्र शान्ति

यज्ञ - शान्ति  > पूजन कर्म विधी Posted at 2018-03-16 19:43:27
एक नक्षत्र जनन शांती बहीण भावंडें अथवा पिता पुत्र , माता पुत्र इत्यादिकांचा जन्म जर एकाच नक्षत्रावर झाला, तर अत्यंत त्रासदायक घटना घडण्याची शक्यता असते. अर्थात इतरही ग्रहदोष व कर्म याचा सुद्धा भाग त्यात आलाच.. बापाच्या अथवा आईच्या किंवा भावंडांच्या जन्मनक्षत्रावर मुलगा अथवा मुलगी झाल्यास गोमुखप्रसव शान्ति करावी. सख्खा भाऊ अथवा बहीण यांच्या जन्मनक्षत्रावर भाऊ अथवा बहीण झाल्यास गोप्रसवशान्ति न करतां, नुसतीच शान्ति करावी अथवा गोप्रसव सह करावी.. पिता , माता किंवा बंधू - भगिनी यापैकी कोणाचे नक्षत्र समान असेल त्याप्रमाणे योग्य असेल तो संकल्प करावा. ज्या नक्षत्रीं जन्म असेल त्याची किंवा त्या नक्षत्रदेवतेची प्रतिमा तांबडया वस्त्रांत कलशावर मांडून, विविध स्तोत्र मंत्रांनीं तिची विधिवत पूजा करावी. शास्त्रोक्त रीतीने पूजा - अन्वाधान करुन शेवटीं, ज्यांचे जन्म एक नक्षत्रावर झाले असतील त्यांना अभिषेक करावा. काही जणांच्या मते या प्रसंगीं ग्रहमख आवश्यक नाहीं. हरिहरांच्या प्रतिमेची पूजा करुन तिचें दान करावें, असेंही क्वचित् ग्रंथांत सांगितलें आहे. काही ठिकाणी लघुरुद्र सुद्धा करतात व काही ठिकाणी लघुरुद्र सह शान्ति हवन सुद्धा करण्याचा प्रघात आहे..

Search

Search here.