समर्थ श्रीरामदास स्तवन

स्तोत्र - मंत्र  > श्री सद्‌गुरु स्तोत्र Posted at 2019-02-17 15:21:28
समर्थ श्रीरामदास स्तवन निर्माणस्थळ गौतमी परि महाकृष्णातिरीं जो वसे | कांतासंग नसे, प्रपंचही नसे, आशा दुराशा नसे || ज्याला उत्तम रामदास म्हणती, त्रैलोक्य वंदीतसे | ऐसा सदगुरु हा अनंत कविचा बद्धांस तारीतसे ||१|| वस्त्रें हुर्मुजी भरजरीं पटकुले, माथा चिराही वसे | कायें सुंदर गौरवर्ण विलसे भाळीं अवाळू असे || स्वामींचा कविता समुद्र अवघा कल्याण लीहीतसे | ऐसा सदगुरु हा अनंत कवीचा बद्धांस तारीतसे ||२|| ज्याची पूर्ण समाधि सज्जनगडी गुप्त प्रकारें असे | पादूकांवरि शेष शोभतसे, दोन्हीकडे आरसे | ज्याची पुण्यतिथी सुदीन नवमी उत्साह होतो असे | ऐसा सदगुरु हा अनंत कवीचा बद्धांस तारीतसे ||३|| जेणे सात्त्विक राजसादिही तिन्ही आत्मस्थिती आटले | वेदांताबुधीचे प्रभाव अवघे जेणें निराकर्णिले | विज्ञानें भवसिंधु पार तरला जिंकोनी साही धुरा | ऐसा सदगुरु रामदास विलसे, जो निस्पृहाचा तुरा ||४|| ज्याची गाढ उपासना जरी असे जाणे अयोध्यापती | नेणें त्याहुनी अन्य दैवत असे ऐशी जयाची स्थिती | ज्याचा गुप्त विचारही परि असे नारी नरा लेकुरा | ऐसा सदगुरू रामदास विलसे, जो निस्पृहाचा तुरा ||५|| सह्याद्रीगिरीचा विभाग विलसे मंदारशृंगापरी | नामें सज्जन जो नृपें वसविला श्रीउर्वशीचे तिरीं | साकेताधिपती, कपी, भगवती हे देव ज्याचे शिरीं | तेथे जागृत रामदास विलसे, जो या जनां उद्धरी ||६|| || जय जय रघुवीर समर्थ ||

Search

Search here.