संस्कृत अर्धवाक्य लेखमाला 2
श्याम जोशी ब्लॉग Posted at 2016-07-01 13:40:54
संस्कृत सुभाषित ( अर्ध वाक्य ) लेख द्वितीय
01 जुलै 2016
लेखक अभ्यासक - श्री श्याम जोशी गुरुजी
टिटवाळा
आपणा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद व आभार .. माझ्या या साध्या छोट्या लिखाणाला अनेकांनी भरभरून प्रोत्साहन दिले ..
काल आपण *कालाय तस्मै नमः* या सुप्रसिद्ध अर्ध वचना विषयी माहिती घेतली . आज आपण बघणार आहोत *सत्यं ब्रुयात् प्रियं ब्रुयात्* या वचना विषयी ...
अनेक ठिकाणी अनेक वेळा बोलले जाणारे *सत्यं ब्रुयात् प्रियं ब्रुयात्* हे देखील प्रसिद्ध असे अर्ध वचन आहे .. सत्य बोलावे गोड बोलावे अशा अर्थाने हे अनेक ठिकाणी अनेक वेळा वापरले जाते .. पूर्ण रूप खालील प्रमाणे --->
सत्यं ब्रुयात् प्रियं ब्रुयान् न ब्रुयात सत्यमप्रियम् |
प्रियं च नानृतम् ब्रुयात् एषःधर्म सनातनः ||
सुप्रसिद्ध अशा मनुस्मृती या ग्रंथामधील चौथ्या अध्यायातील 138 क्रमांकाचे हे वचन आहे ..
( मनुस्मृती चौथा अध्याय 138वा श्लोक )
अर्थ ---> खरे बोलावे , गोड बोलावे , कटू सत्य बोलू नये , व गोड असत्य सुद्धा बोलू नये हा सनातन धर्म आहे ...
व्यवहारात कसे वागावे या विषयी उत्कृष्ट मार्गदर्शन मनुमहाराजांनी केले आहे .. अनेक वेळा आपण समोरच्याला "खुश" करण्यासाठी खोटे गोड बोलतो म्हणजे केव्हा केव्हा खोटी स्तुती सुद्धा करतो .. पण यामुळे भविष्यात अडचणींचा प्रसंग सुद्धा येऊ शकतो .. म्हणूनच जे काही आहे ते सदैव सत्य बोलावे , पण ते सत्य सुद्धा समोरच्याला झेपेल - समोरचा दुखावणार नाही अशा प्रकारे सांगितले पाहिजे असे अभिप्रेत आहे ..
चला .. उद्या पुन्हा भेटू एक नविन वचन - वाक्य घेऊन ...
... शुभम् भवन्तु .....
लेखक --
आपलाच -- © श्री श्याम जोशी गुरुजी
टिटवाळा
www.shyamjoshi.org
या लेखमालेचा उद्देश --> अनेक वेळा बोलता बोलता आपण संस्कृत मधील एखादे छोटे सुभाषित , वाक्य बोलून जातो . परंतु ते सुभाषित - वाक्य एका मोठ्या सुभाषिताचा किंवा वाक्याचा छोटासा भाग असतो हे आपल्याला माहीत नसते . व्यवहारात ते छोटेसे वाक्य सदैव वापरात असल्याने स्मृतीत राहते व त्याचा पूर्णभाग विस्मृतीत जातो . आपण अशाच ( अर्ध ) वचनांचा - सुभाषितांचा अर्थासह उहापोह या लेखमालेत करणार आहोत ..
Search
Search here.