संस्कृती वनी फिरत

भजन - स्तुती Posted at 2018-10-11 18:02:33

संस्कृती  वनी फिरत

संस्कृती वनी फिरत संस्कृती वनी फिरत राहिलो संकटा मध्ये फार पोळलो तारियातुनी तुच ईश्वरा , धाव पाव रे त्र्यंबकेश्वरा / श्रीमहेश्वरा .. 1 .. बाल्य वेचिले खेळण्या मधी । तुज न पुजिले यौवनी कधी वार्धकी तनु होई जर्जरा , धाव पाव रे त्र्यंबकेश्वरा / श्रीमहेश्वरा  .. 2 .. आप्त सोयरे स्वार्थ जानती , ईष्ट मित्र ते गोड बोलती अंती एकला तुची प्रभुवरा , धाव पाव रे त्र्यंबकेश्वरा / श्रीमहेश्वरा .. 3 .. ब्रम्ह पर्वता चित्त चक्षुनी , तुजसी पहातो येथे राहुनी पुरवी कामना हीच प्रभुवरा , धाव पाव रे त्र्यंबकेश्वरा / श्रीमहेश्वरा .. 4 .. त्र्यंबकेश्वरी राहणे घडो , तव पदं भुजी चित्त हे जडो पुरवी / करीतो मागणे हेची प्रभुवरा , धाव पाव रे त्र्यंबकेश्वरा / श्रीमहेश्वरा  .. 5 ..

Search

Search here.