श्री सत्यदत्त आरती

आरती  > श्री दत्तात्रेय आरती Posted at 2018-03-27 17:42:05
  श्री सत्यदत्त आरती करितों प्रेमें तुज नीरांजन स्थिरावुनियां मन ॥ दत्तात्रेया सद्गुरुवर्या भावार्थे करुन ॥धृ०॥ धरणीवर नर पीडित झालें भवरोगें सर्व । कामक्रोधादिक रिपुवर्गें व्यापुनि सगर्व । योग याग तप दान नेणती असतांहि अपूर्व ॥ सुलभपणे निजभजनें त्यासी उद्धारि जो शर्व ॥१॥ अत्रिमुनीच्या सदनीं तीन्हीं देव भुकें येतीं । भिक्षुक होऊनि अनसूयेप्रति बोलति त्रयमूर्तीं । नग्न होऊनी आम्हाप्रति द्या अन्न असें वदती । परिसुनि होउनि नग्न अन्न दे तंव ते शिशु होती ॥२॥ द्रर्वासाभिध मौनि जाहला शंभु प्रमथेंदु । ब्रह्मदेव तो झाला चंद्र झाला तो उपेंद्र ॥ दत्तात्रेय जो वीतनिद्र तो तारक योगींद्र । वासुदेव यच्चरण चिंतुनी हो नित्यातंद्र ॥३॥

Search

Search here.