सत्यनारायण साहित्य यादी
यज्ञ - शान्ति > पूजा शान्ति साहित्य यादी Posted at 2018-07-29 03:16:01
--- श्रीसत्यनारायण पूजा सामान लिस्ट ---
हळद , कुंकू , चंदन , अष्टगंध , अबीर बुक्का , गुलाल
समयी , निरांजन , दिव्यासाठी तेलाच्या तूपाच्या वाती - कापूस , माचीस , गायीचे तूप व तिळाचे तेल दिव्यासाठी
अगरबत्ती , धूप , कापुर
पळी भांडे - फुलपात्र
घरातील गणपती व बाळकृष्ण मूर्ती - तांबे पितळ पंचधातु इत्यादीची ( घरात नसल्यास लग्नात आलेली )
शंख , घंटी
पंचामृत वाटीभर ( दूध + दही + तूप + मध + साखर ) व प्रसाद अपेक्षित व्यक्तींप्रमाणे ..
सुपाऱ्या 30 , लाल - पिवळे - हिरवे वस्त्र ब्लाउजपिस
एक स्टील चे भांडे ( निर्माल्य पाणी वैगेरे काढण्यासाठी )
घरातील देवाच्या फोटोना हार , दरवाजाला हार तोरण आंब्याची डहाळी , रांगोळी , पूजेसाठी सुद्धा आंब्याची पाने डहाळी
गंगाजल , गोमूत्र , विड्याची पाने 25
11 हळकुंड , 11 अक्रोड , 11 खारीक , 21 लवंग , 21 वेलची
21 कॉइन्स - सुट्टे पैसे ( एक किंवा 2 रू चे कॉइन्स ) , 10 रू च्या 02 नोटा
वेगवेगळी रंगीत फुले ( तेरडा नको ) , तुळशीपत्र , बेलपत्र , दुर्वा , गजरे व वेण्या 2 - 3 ,
बसण्यासाठी धुतलेल्या चादर / बेडशीट / आसन वैगेरे
हात पुसण्या साठी - देव पुसण्यासाठी - देवाची भांडी पुसण्यासाठी 2 ते 3 स्वच्छ धुतलेले नॅपकिन / वस्त्र / हातरुमाल
हाताला बांधायाचा नाडा - धागा ( लाल / पंचरंगी ) आणि जानवे जोड 3
चौरंगाला 4 केळी / कर्दळी चे खांब बांधून तयार ठेवणे
देवासाठी ---> एक पंचा किंवा उपरणे , एक टॉवेल , एक नॅपकिन ( नवीन )
लग्नाची पहिलीच पूजा असेल तर दान म्हणून धोतर उपरणे किंवा शर्ट पॅन्ट पीस , आणि एक् साडी ( दान म्हणून , जमल्यास , कंपल्सरी नाही .. दोन्ही पैकी एक असले तरी हरकत नाही )
5 फळे , 5 नारळ , 2 खोबरेवाट्या , 100 ग्राम गूळ , 100 ग्राम खडीसाखर
2 तांब्या / पितळेचे कलश व 2 ते 3 ताम्हण
सव्वा किलो गहू , सव्वा किलो बारीक तांदूळ
नवग्रहांची धान्ये प्रत्येकी 250 ग्राम वेगवेगळे पिशवीत पुडीत धान्य किंवा डाळी च्या स्वरूपात ( --> तूर - मूग - मटकी - वाटाणा - चवळी - हरभरा - चणा डाळ - ज्वारी - बाजरी - पांढरे तीळ - शेंगदाणे - रवा - साबुदाणा - साखर )
सत्यनारायणाचा फोटो , तो नसल्यास कोणत्याही विष्णूरूपाचा फोटो ( श्रीराम / श्रीकृष्ण / श्रीविठ्ठल / गजानन महाराज / स्वामी समर्थ इत्यादी ) , फोटोला हार घालुन तयार ठेवणे ..
घर - जागा स्वच्छ करावी , गोमूत्र गंगाजल शिंपडावे , दरवाजाला हार तोरण लावावे , रांगोळी काढावी , घरातील देवाच्या फोटोना वैगेरे हार घालावे , चौरंगाला केळीचे किंवा कर्दळीचे खांब बांधून चौरंग तयार ठेवावा .. हळद , कुंकू वैगेरे वाट्यांमध्ये काढून ठेवावे .. तुळशीची निदान 108 तरी पाने निवडून ठेवावीत. मंजिरी सकट असल्यास उत्तमच.
अपेक्षित माणसांचा प्रसाद तयार करून ठेवावा ..
पूजेच्या दिवशी उपवास असेल - उपवासासाठी फराळ म्हणून वेफर्स / राजगिरा चिकी - लाडू , चहा कॉफी वेगेरे चालेल , पूजेच्या काही दिवस आधीपासून तसेच काही दिवस नंतर पर्यंत शाकाहार असावा ,
पूजेला बसणार्याने धुतलेले स्वच्छ वस्त्र धारण करावे ( काळा - लाल - हिरवा आदी भडक रंग नसावा )
लग्ना नंतरची पहीलीच पूजा असल्यास पूजा सुरु होण्या आधी नववधूची ओटी भरावी . तिला गजरा वैगेरे द्यावा ..
मोबाईल वैगेरे बंद ठेवावा किंवा दुसऱ्यांना द्यावा . सर्व लक्ष पूजेकडेच द्यावे ..
-- -- --- -- -- --- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- --
महत्वाचे -- या सर्व पूजा - यज्ञ - साहित्य याद्या / लिस्ट अनेकांची मते विचारात घेऊन बनवलेल्या आहेत .. यादितील साहित्य किंवा संख्या यामध्ये स्थळ - प्रांत विभाग / ब्राह्मण शाखा / पद्धत - रीती - रिवाज या प्रमाणे कमी जास्त तो बदल होऊ शकतो , या साठी - हे एवढेच् कसे / असेच का / एवढी संख्या ??? वैगेरे वैगेरे अशा तक्रार ना करता या याद्यांचा लाभ घ्यावा .. इतरांना पाठवताना स्वतः त्यामध्ये योग्य तो बदल करावा. काही सूचना - सुधारणा असल्यास नक्की कळवावे..
धन्यवाद ....
Search
Search here.