शनि स्तोत्र

स्तोत्र - मंत्र  > नवग्रह स्तोत्र Posted at 2016-06-04 08:52:33
शनि अमावस्या उपाय आज संध्याकाळी शनि अमावस्या म्हणून एक काळे कापड , त्यावर काळे उडीद व त्यावर एक पणती असे सामान एका मारुती मंदिरात ठेवणे किंवा मंदिरा जवळील पिंपळ खाली किंवा कुठे चांगल्या ठिकाणावरील  पिंपळ वैगेरे झाडा खाली ठेवणे .. पणती मध्ये तेल व वाती टाकून ती पणती लावणे .. तेल शक्यतो तिळाचे असल्यास उत्तम .. पणती मधील तेलामध्ये आपल्या चेहऱ्याची छाया पाहून साडेसाती आदी त्रास पीडा कमी होण्या साठी प्रार्थना करणे .. अगरबत्ती लावणे .. वरील वस्तू घरातून च घेऊन जाणे , त्या दिवशी विकत घेऊ नये .. काळा कपडा विकत घेतला तर चालेल , पण तेल वैगेरे विकत घेऊ नये .. या दिवशी दशरथ कृत शनि स्तोत्र ( कोणस्थ पिंगलो बभ्रु ) एकदा तरी वाचणे . तसेच त्याबरोबर एकदा कोणतेही विष्णू स्तोत्र व शिव स्तोत्र वाचणे . ( हे स्तोत्र खालील साईट वर उपलब्ध आहेत ) देवाला आपला जो काही त्रास असेल तो कमी करण्यास मनापासून सांगावे . हे केल्याने शनिपीडा कमी होते . मोठे वाईट अनपेक्षित अरिष्ट होत नाही . तसेच कालसर्प दोषाचे अशुभत्व / त्रास सुद्धा कमी होते .. कोणी कोणी या अमावस्येपासून दर अमावस्येला हा उपाय करू शकतात .. ©श्री श्याम जोशी गुरुजी ® टिटवाळा ज्यांना देवावर , आपल्या धर्मावर , धर्म शास्त्रावर विश्वास आहे अशांनीच हा उपाय मनापासून श्रद्धेने करावा .. इतर नास्तिकांनी त्रास सहन करत राहावे ( निदान नावे ठेवू नयेत ) . .. दशरथ कृत शनि स्तोत्र नम: कृष्णाय नीलाय शितिकण्ठनिभाय च। नम: कालाग्निरूपाय कृतान्ताय च वै नम: ।।१।। नमो निर्मांस देहाय दीर्घश्मश्रुजटाय च । नमो विशालनेत्राय शुष्कोदर भयाकृते।।२।। नम: पुष्कलगात्राय स्थूलरोम्णेऽथ  वै नम:। नमो दीर्घायशुष्काय कालदष्ट्र नमोऽस्तुते।।३।। नमस्ते कोटराक्षाय दुर्निरीक्ष्याय वै नम: । नमो घोराय रौद्राय भीषणाय कपालिने।।४।। नमस्ते सर्वभक्षाय वलीमुखायनमोऽस्तुते। सूर्यपुत्र नमस्तेऽस्तु भास्करे भयदाय च ।।५।। अधोदृष्टे: नमस्तेऽस्तु संवर्तक नमोऽस्तुते । नमो मन्दगते तुभ्यं निंस्त्रीणाय नमोऽस्तुते ।।६।। तपसा दग्धदेहाय नित्यं  योगरताय च । नमो नित्यं क्षुधार्ताय अतृप्ताय च वै नम: ।।७।। ज्ञानचक्षुर्नमस्तेऽस्तु कश्यपात्मज  सूनवे । तुष्टो ददासि वै राज्यं रुष्टो हरसि तत्क्षणात् ।।८।। देवासुरमनुष्याश्च  सिद्घविद्याधरोरगा: । त्वया विलोकिता: सर्वे नाशंयान्ति समूलत:।।९।। प्रसाद कुरु  मे  देव  वाराहोऽहमुपागत । एवं स्तुतस्तद  सौरिग्र्रहराजो महाबल: ।।१०।। हे स्तोत्र म्हणून शनिमहाराजांची कृपा आपणा सर्वांवर होवो आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त होऊन सर्व दुःख त्रास कमी होवोत अशी माझी शनिदेवांकडे प्रार्थना . श्री श्याम जोशी गुरुजी टिटवाळा

Search

Search here.