जय जय श्री शनिदेवा
आरती > नवग्रह आरती Posted at 2018-03-26 00:48:21
॥ आरती शनैश्चराची ॥
जय जय श्रीशनिदेवा ॥ पद्मकर शिरीं ठेवा ॥ आरती ओवाळीतों ॥ मनोभावें करूनी सेवा ॥ ध्रु०॥
सूर्यसूता शनिमूर्ती ॥ तुझी अगाध कीर्ती ॥ एकमुखें काय वर्णूं ॥ शेषा न चले स्फूर्ती ॥ जय जय ॥ १ ॥
नवग्रहांमाजी श्रेष्ठा ॥ पराक्रम थोर तुझा ॥ ज्यावरी तूं कृपा करिसी ॥ होय रंकाचा राजा ॥ जय जय ॥ २ ॥
विक्रमा सारिखा हो ॥ शतकर्ता पुण्यराशी ॥ गर्व धरितां शिक्षा केली ॥ बहु छळियेलें त्यासी ॥ जय जय ॥ ३ ॥
शंकराच्या वरदाने ॥ गर्व रावणें केला ॥ साडेसाती येतां त्यासी ॥ समूळ नाशासी नेला ॥ जय जय ॥ ४ ॥
प्रत्यक्ष गुरूनाथा चमत्कार दावियेला ॥ नेउनी शूळापाशीं ॥ पुन्हां सन्मान केला ॥ जय जय ॥ ५ ॥
ऐसे गुण किती गाऊं ॥ धणी न पुरे गातां ॥ कृपा करीं दिनावरी ॥ महाराजा समर्था ॥ जय जय ॥ ६ ॥
दोन्ही कर जोडोनियां ॥ रखमा लीन सदा पायीं ॥ प्रसाद हाचि मागे ॥ उदयकाळ सौख्य दावीं ॥ जय जय ॥ ७ ॥
Search
Search here.