शनि कवच

स्तोत्र - मंत्र  > नवग्रह स्तोत्र Posted at 2016-08-13 03:03:59

II शनि कवच II 

या स्तोत्र पठणाने आपल्या जीवनातील त्रास संकटे दुःख यांचा नाश होतो . तसेच जन्मकुंडली मधील शनिग्रहाची अशुभ स्थिती , साडेसाती , शनि ग्रह अशुभ भ्रमण इत्यादीं मुळे होणारे शारीरिक - मानसिक त्रास व अशुभ फळ नष्ट करण्यासाठी व श्री शनि महाराज अनुकूल होऊन त्यांचा कृपाशीर्वाद प्राप्त होण्यासाठी हे स्तोत्र अत्यंत उत्तम होय . पण एक नेहमी लक्षात ठेवावे कि शनि महाराज हे विधी - नियमांचे अत्यंत  काटेकोर पणे पालन करणारे असून त्यांना विधी नियम पाळणारा सदाचारी व्रतस्थ व्यक्तीच प्रिय आहे . जर कोणतेही नियम न पाळता कोणी कोणतीही उपासना करत असेल तर ती उपासना फलद्रुप होत नाही . म्हणूनच शुद्ध आचरण विधी नियमस्थ राहून कोणतीही उपासना करावी . हे स्तोत्र रोज किंवा दर शनिवारी पठण करतात . प्रदोष - शिवरात्र - अमावस्येला सुद्धा विशेष पठण करतात. सकाळी किंवा संध्याकाळी - रात्री किंवा दोन्ही वेळेस 1 / 3 / 5 / 8 / 11 / 21 / 51 / 108 वेळा घरी किंवा मंदिरात पठण करू शकतात . श्रावण शनिवारी याचे पठण हे जास्त फलदायी मानले  गेले आहे .. आपणा सर्वांच्या चुका अपराध क्षमा करून सर्व त्रास दुःख कमी करून श्रीशनिमहाराज आपण सर्वाना आशीर्वाद देवो हि त्यांच्याकडे नम्र प्रार्थना . अथ श्री शनिकवचम्   अस्य श्री शनैश्चरकवचस्तोत्रमंत्रस्य कश्यप ऋषिः अनुष्टुप् छन्दः शनैश्चरो देवता शीं शक्तिः शूं कीलकम् शनैश्चरप्रीत्यर्थं जपे विनियोगः  निलांबरो नीलवपुः किरीटी गृध्रस्थितस्त्रासकरो धनुष्मान् II चतुर्भुजः सूर्यसुतः प्रसन्नः सदा मम स्याद्वरदः प्रशान्तः II १II ब्रह्मोवाच II श्रुणूध्वमृषयः सर्वे शनिपीडाहरं महत् I कवचं शनिराजस्य सौरेरिदमनुत्तमम् II २ II कवचं देवतावासं वज्रपंजरसंज्ञकम् I शनैश्चरप्रीतिकरं सर्वसौभाग्यदायकम् II ३ II ॐ श्रीशनैश्चरः पातु भालं मे सूर्यनंदनः I नेत्रे छायात्मजः पातु पातु कर्णौ यमानुजः II ४ II नासां वैवस्वतः पातु मुखं मे भास्करः सदा I स्निग्धकंठःश्च मे कंठं भुजौ पातु महाभुजः II ५ II स्कंधौ पातु शनिश्चैव करौ पातु शुभप्रदः I वक्षः पातु यमभ्राता कुक्षिं पात्वसितत्सथा II ६ II नाभिं ग्रहपतिः पातु मंदः पातु कटिं तथा I ऊरू ममांतकः पातु यमो जानुयुगं तथा II ७ II पादौ मंदगतिः पातु सर्वांगं पातु पिप्पलः I अङ्गोपाङ्गानि सर्वाणि रक्षेन्मे सूर्यनंदनः II ८ II इत्येतत्कवचं दिव्यं पठेत्सूर्यसुतस्य यः I न तस्य जायते पीडा प्रीतो भवति सूर्यजः II ९ II व्ययजन्मद्वितीयस्थो मृत्युस्थानगतोSपि वा I कलत्रस्थो गतो वापि सुप्रीतस्तु सदा शनिः II १० II अष्टमस्थे सूर्यसुते व्यये जन्मद्वितीयगे I कवचं पठतो नित्यं न पीडा जायते क्वचित् II ११ II इत्येतत्कवचं दिव्यं सौरेर्यनिर्मितं पुरा I द्वादशाष्टमजन्मस्थदोषान्नाशायते सदा I जन्मलग्नास्थितान्दोषान्सर्वान्नाशयते प्रभुः II १२ II II इति श्रीब्रह्मांडपुराणे ब्रह्म-नारदसंवादे शनैश्चरकवचं संपूर्णं II

Search

Search here.