जय जय आरती पार्वतीरमणा
भवभयनाशना दुष्ट निकंदना ।। ध्रु॰ ।।
पंचवदन दशभुज विराजे
जटाजूटी गंगा सुंदर साजे ।। १ ।। जय...
कंठी रुंडमाळा हस्तिंकपाल
वाहन नंदी शोभे भूषण व्याल ।। २ ।। जय...
गजचर्मांबर तव परिधान
त्रिशूलधारण भस्मविलेपन ।। ३ ।। जय...
दिगंबररुपा शिवमहारुद्रा
वासुदेव प्रार्थी ज्ञानसमुद्रा ।। ४ ।। जय...
Search
Search here.