शंकरगीता अध्याय ११ वा

ग्रंथ - पोथी  > शंकरगीता Posted at 2018-12-05 17:28:09
शंकर गीता अध्याय ११ वा ज्याच्या चरणास हातांचा विळखा । जे विश्वाचे असती सखा विश्वात तूल्यबल न ज्यांच्या नखा । त्यांना वंदन त्रिवार ।।१।। स्त्रिया एका दिवाळीत । महाराजांस न्हाऊ चालू, ठरवित सुगंधी तेल उटणे आणीत । भस्मे तयारी पहात ।।२।। सुगंधी तेल लावून उटणे । महाराजांना आंघोळ घालणे हे भाग्य कसे आपणा लाभणे ? । विचार भस्मे करीत ।।३।। महाराज न्हाणीघरात जात । ‘धोतर सोड’ भस्मेस म्हणत महाराज दिगंबर ते होत । स्त्रिया कैशा जातील ? ।।४।। तेल उटणे लावून । आंघोळ घाल भस्मेस सांगत महाराजांस तेल उटणे लावून । भस्मे न्हाऊ घालीत ।।५।। नुसता मनात विचार येत । महाराज तो लगेच पूर्ण करत भस्मे झाले आनंदीत । कृपा केवढी गुरूंची ? ।।६।। महाराज एकदा भस्मेस म्हणत । माग तूला जे हवे असत ‘तुम्ही आत्मदर्शन मज देऊन । शेवट गोड करावा’ ।।७।। भस्मे असे म्हणताक्षणी । त्यांच्या उजव्या हातात महाराजांनी आपला उजवा हात देऊनी । कानात गुह्य सांगितले ।।८।। महाराज शांतपणे म्हणाले । ‘तुझे कार्य कृतार्थ झाले ’ भस्मे यांना कुरवाळले । महाराजांनी ममतेने ।।९।। महाराज एकदम म्हणाले । ‘ना-या गेला ’कुणा न कळले ।। केडगाव नारायण महाराज गेले । वृत्त दुस-या दिनी ये ।।१०।। एकदा भस्मे मठात जात । समाधीसमोर उभे रहात ।। भस्मे यांच्या मनात । एक विचार चमकला ।।११।। ‘मला अगदी प्रत्येक क्षण । महाराजांची होते आठवण ।। त्यांनाही माझी आठवण । होत असेल की नाही ?’ ।।१२।। ‘आता आठवण रे तुझी । कायम ठेवतो पहा मी ?’ ।। समाधीतून घुमला ध्वनी । भस्मे ध्वनी ऐकत ।।१३।। भस्मे जो बांधीत फेटा । तोच महाराजांच्या मस्तकी दिसला ।। अगदी तसाच होता बांधलेला । भस्मे चकित जाहले ।।१४।। तेव्हापासून मूर्तीला । तसाच फेटा बांधण्याला ।। सुरवात झाली, रिवाज पडला । यातील गुह्य असे हे ।।१५।। आचार्य अत्रे मराठात । एक अग्रलेख लिहीत ।। गृहमंत्री कन्नमवार यांच्यावर । खरमरीत अत्यंत जहाल ।।१६।। कन्नमवारच्या पत्नीने सत्वर । खटला भरला अत्र्यांवर ।। अत्र्यांना अटक होणार । एवढे प्रकरण रंगले ।।१७।। झोपेत अत्र्यांच्या पाठीत । महाराज लाथ मारून सांगत ।। कन्नमवार प्रकरण फाईल होत । खडबडून अन्ने उठलेच ।।१८।। दुस-या दिनी कन्नमवार गेले । वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाले ।। त्यांनी हे प्रकरण फाईल केले । फोनने कळविले अत्र्यांना ।।१९।। वृत्त कळतांच अन्ने नाचत । समाधीच्या दर्शनास जात ।। तेव्हापासून महाराजांचे लावत । फोटो कार्यालयात ।।२०।। नाटकातही स्टेजवरती । महाराजांचे फोटो लावती ।। ऐशी अत्रे यांची भक्ती । महाराजांवर बसलीच ।।२१।। एकदा चारीधाम यात्रा करून । भस्मे कोल्हापुरी येऊन जगन्मातेस अभिषेक करावा म्हणून । भस्मे यांनी ठरवले ।।२२।। अभिषेकास भस्मे स्वत: बसत । दोनशे घागरी दूध लागत ।। अभिषेक संपता भटजी म्हणत । ‘ देवीस मागा हवे ते ’ ।।२३।। भस्मे लक्ष्मीकडे पहात । लक्ष्मीच्या ठिकाणी महाराज दिसत ।। समाधीनंतरची ही घटना असत । भस्मे चकित जाहले ।।२४।। एकदा पुण्यतिथीचा दिवस असत । भस्मे अखंड वीणा धरत ।। मठात गर्दी प्रचंड असत । समाधीस अभिषेक जाहला ।।२५।। समाधीला अत्तर लावण्यास । अत्तर दिले सर्वांस ।। सारेजण अत्तर लावत । महाराजांच्या समाधीला ।।२६।। डॉक्टर धनेश्वर लावीत अत्तर । भस्मे यांच्या डोक्यावर ।। भस्मे म्हणती अहो धनेश्वर । समाधी आहे समोर ।।२७।। ऐसे असता माझ्या डोक्यावर । तुम्ही का लावले अत्तर ।। यावर म्हणती धनेश्वर । माझेच करणे बरोबर ।।२८।। सन एकोणीसशे सेहेचाळीस । श्रीक्षेत्र तुळजापूर ।। तुळजाभवानीसमोर । अश्विन शुध्द अष्टमी ।।२९।। या दिवशी महाराजांनी । तुझ्या मस्तकावरती ।। पादुका दिल्या आहेत म्हणुनी । त्यांना अत्तर लावतो ।।३०।। जे जे उपचार समाधीस झाले । ते ते उपचार अगदी सगळे ।। डॉक्टर धनेश्वरांनी केले । भस्मे यांच्या डोक्यास ।।३१।। महाराज जेव्हा पादुका देत । तेव्हा डॉक्टर धनेश्वर तेथे नसत ।। भस्मेही हे विसरून जात । प्रेरणा दिली धनेश्वरा ।।३२।। धनेश्वर परमार्थात पुढे असत । महाराजच त्यांना प्रेरणा देत ।। महाराज त्यांच्या मुखाने वदत । जाणीव होण्या भस्मेंना ।।३३।। पुण्याचे दत्तात्रय गणेश अभ्यंकर । यांच्या घरी म्हणाले महाराज ।। अंतापूरी दावलमलिक म्हणून । पीर दर्गा असे जो ।।३४।। पीर दर्गा हा मुळात नसे । हीच मच्छिंद्रनाथांची समाधी असे यवनी राज्यात पडतसे । नाव दावलमलिक ।।३५।। तेथील पुजारी ब्राह्मण असत । पुजा-यास दृष्टांत होत ।। मच्छिंद्रनाथ स्वत:चे वय सांगत । दोन हजार वर्षांचे ।।३६।। हिंदू - मुसलमानांचा पेशावरला । भयंकर दंगा सुरू झाला ।। त्यात अडकले नेहरू त्या समयाला । इकडे सोलापूरात ।।३७।। महाराज रहिमबाबाकडे गेले । रहिमबाबांना खूप बडविले ।। नेहरूना मी सोडविले । महाराज तेव्हा म्हणाले ।।३८।। नेहरू दंग्यापासून सुटले । त्यांचे संकट महाराजांनी निवारले ।। त्यामुळेच नेहरु वाचले । तेव्हा कळले लोकांस ।।३९।। बॅरिस्टर मेहेंदळेंच्या घरात । महाराज एकदा झोपत ।। अगदी प्रेतासारखेच पडत । घाबरून गेले सर्वही ।।४०।। पुढील व्यवस्था करावी म्हणून । या विचारात गुंगून ।। चौथ्या दिवशी आपणाहून । बसले महाराज उठून ।।४१।। महाराज म्हणाले सर्वां । सोलापूरचे जनार्दनबुवा ।। गेले त्यांची व्यवस्था करण्या । गेलो होतो मी पहा ।।४२।। एकोणीसशे अडोतिसात । ही घटना असे घडत ।। दोन्ही ठिकाणचे हे वृत्त । कळले दोन्ही ठिकाणी ।।४३।। सिद्राम महादप्पा सोरेगावकर । फुलांचा यांचा व्यापार ।। दादा फुलारी लोक तर । यांना प्रेमे म्हणतात ।।४४।। एकानिष्ठ भक्त महाराजांचे । महाराजांवर प्रेम तयांचे ।। त्यांना महाराज म्हणाले । ‘काय पाहिजे माग ते ’ ।।४५।। ‘महाराज मज म्हणा आपले’ । दादा फुलवारी यांनी मागितले ।। मागण्यात केवढे कौशल्य भले । स्पष्ट येते दिसून ।।४६।। महाराजांचा तीव्र संचार होता । दादा फुलारीच्या अंगात ।। अगदी महाराजांसारखेच दिसत । संचारात फुलारी ।।४७।। व्याघ्रमुखी होऊन । व्याघ्रध्वनी काढून ।। संचारात जातात रंगून । दादा फुलारी या परी ।।४८।। कसलीच आशा मला नसता । महाराजकृपे सर्व घडत ।। म्हणून अनुभव मला न येत । वदती दादा फुलारी ।।४९।। रामभाऊ कोराड मास्तर । नि:सीम प्रेम महाराजांवर ।। स्तनपान करून वर । आई म्हणत महाराज ।।५०।। महाराज नेहमी सांगत । ‘ प्रत्यक्ष राम समोर असत ।। त्यांच्या चरणावर सतत । नजर माझी असेच ’ ।।५१।। नेहमी महाराज आपली मान । खालीच का करतात बसून ।। महाराजांच्या उद्गारावरून । गुह्य याचे उकलते ।।५२।। वीरासन घालून महाराज बसत । बसतसे जैसा हनुमंत ।। रामासमोर महाराज बसत । हनुमंताच्या रूपाने ।।५३।। महाराज जेव्हा समाधी घेत । देह तेव्हा हनुमंत बनत ।। प्रत्यक्ष सर्व हे अवलोकत । हनुमंत संगती अशी ही ।।५४।। महाराज एकदा म्हणाले । लोक गर्दी करू लागले ।। म्हणून दारू पिणे मी सुरू केले । गर्दी तेव्हा थांबली ।।५५।। अफू गांजा भांग मटण । दारू सिगारेट तंबाखू पान ।। नुसते बुजगावणे हे देखून । नकली लोक फिरकत ना ।।५६।। महाराज म्हणाले मधुबूवाला । मे महिन्यात पुरूषोत्तमबूवाला ।। पाठवून देई पुण्याला । समाधी घेणार आहे मी ।।५७।। महाराज बोलून निघून गेले । मधुबूवा मोठ्याने रडू लागले ।। रडून रडून बेशुध्द पडले । उपाय करून शुध्दी न ये ।।५८।। महाराजांना आणले । मधुबूवा शुध्दीवरती आले ।। महाराज मधुबूवांना घेऊन बसले । एकाच ताटात जेवण्या ।।५९।। महाराज मधुबूवांना म्हणत । ‘मी गेलो जरी मसणात ।। तरीही मी तुझ्याजवळ असत । खात्री मनी असू दे’ ।।६०।। सोलापूरी पार्शी लोकांस । जनार्दनबूवा गाणे शिकवण्यास जात, तेथे महाराज येत । अंडी आणण्या सांगितले ।।६१।। प्रत्येकाच्या हातावरती । महाराज अंडे ठेवती ।। त्यावर दूध घालण्यास सांगती । जनार्दनबूवास महाराज ।।६२।। हळदीकुंकू वाहण्या सांगत । हीच पार्थिवपूजा असत ।। तेव्हापासून पार्शी लोकांत । पार्थिवपूजा चालली ।।६३।। बालगंधर्व आजारी पडले । एकशे तीन टेंपरेचर आले ।। नाटक तर जाहीर झाले । महाराज आले पुण्याहून ।।६४।। नाटक कैसे होणार । काळजीत पडले सारे फार ।। महाराज म्हणाले म्हणून तर । पुण्याहून आलो मी इथे ।।६५।। डॉक्टर तपासण्यास येत । महाराज त्याला सवाल करत ।। कुणी तूला डॉक्टर केले असत ? । काय कळते तूला रे ।।६६।। अंतरनाड्या तपासणारा । मी बाप आहे डॉक्टरांचा ।। सोडावॉटर बाटली आण । सिगारेट आणा म्हणाले ।।६७।। सोडावॉटरच्या बाटलीत । महाराज सिगारेटची राख टाकत ।। गंधर्वांना पिण्यास देत । ताप उतरला लगेच ।।६८।। दरदरून अगदी घाम सुटत । गंधर्वास हुषारी वाटत ।। खडखडीत गंधर्व बरे होत । नाटक झाले थाटात ।।६९।। नाटकाच्या मध्यंतरात । स्टेजवर महाराजांची पूजा करीत ।। महाराजकृपे नाटक होत । बालगंधर्व म्हणाले ।।७०।। सोलापूर जक्कल मळ्यात । स्वामी समर्थांची पुण्यतिथी असत ।। महाराज होते उपस्थित । कार्यक्रम सुरू सर्वही ।।७१।। झाडाखाली कढईत । खीर होती अगदी शिजत ।। झाडावरची चिमणी पडत । धुरामुळे खिरीत ।।७२।। खीर शिजवणा-याला खिरीत । मेलेली चिमणी दिसून येते ।। घाबरून चिमणी तो काढीत । सांगे सर्वांस घडले जे ।।७३।। कसा नैवेद्य दाखवावा स्वामींना । काय वाढावे लोकांना प्रश्न पडला सर्वांना । महाराज सांगती ।।७४।। महाराज तेथे येऊनी । चिमणी हातात घेऊनी ।। म्हणती चिमणीस कुरवाळूनी । कुठे ? कशी पडली ही ।।७५।। तोच महाराजांच्या हातातून । चिमणी गेली लगेच उडून ।। अडचण आता काय म्हणून ? । महाराज सर्वां विचारती ।।७६।। थक्क होऊन सारे पाहत । कार्यक्रम झाला थाटात ।। एकोणीसशे सेहेचाळीसात । घटना असे घडली ही ।।७७।। जमवावीत माणसे शंभर । मज ना वाटे, महाराज म्हणत ।। एक जरी मजजवळ येत । उध्दार त्याचा करीन मी ।।७८।। मंदिर बांधले सुंदर । मोहक अगदी कलाकुसर ।। मूर्तीच नसेल आत जर । बजार बुणगे ऐसे हे ।।७९।। केशवजीभाई आशर असत । व्यापार त्यांचा मुंबईत ।। महाराज त्यांच्या घरी जात । आशर यांना सांगत ।।८०।। सासवड शुगर फॅक्टरीस । अर्ज कर मॅनेजर होण्यास ।। आशर तसा अर्ज करीत । नेमणूक झाली लगेच ।।८१।। आशरना मोठे आश्चर्य वाटत । ते महाराजांची पूजा करत ।। पुढे ते जनरल मॅनेजर होत । महाराज प्रभाव असा हा ।।८२।। दत्ता मिस्त्री शुगर फॅक्टरीत । रात्री त्याची आई मरत ।। घरात रडारड चालत । महाराजांना निवेदिले ।।८३।। महाराज सर्वांना सांगत । म्हातारीस सोडवून मी आणीत ।। सकाळी तेथे महाराज जात । उठून बसली म्हातारी ।।८४।। महाराज म्हणाले म्हातारीस । काल कुठे गेली होतीस ? ।। म्हातारी सांगे सर्वांस । उग्र पुरुष मी पाहिला ।।८५।। आला रेड्यावर बसून । ओढिले मज पाश टाकून ।। वरती गेला मज घेऊन । एक हनुमान तेथे ये ।।८६।। त्याने त्या पुरूषास बडवून । मला आणले सोडवून लोकांस कळले कोण हनुमान । आश्चर्य केवढे घडविले ? ।।८७।। महाराज सांगत रांगोळीचे । घरात स्वस्तिक काढावे ।। त्यावर हळदीकुंकू वहावे । त्यावर पाट ठेवावा ।।८८।। जसा आपल्या घरात । अखंड नंदादीप असतो तेवत ।। तसे हे स्वास्तिक सुशोभित । आपल्या घरात असावे ।।८९।। प्रधान नोकरीस दिल्लीत । अचानक त्यांना तार येत ।। थोरले बंधू अत्यवस्थ असत । तात्काळ यावे मुंबईला ।।९०।। विनायक थोरला बंधू असत । एक बंधू डॉक्टर प्रख्यात ।। निष्णात डॉक्टर सारे जमत । आशा सोडली सर्वांनी ।।९१।। विनायक म्हणाले प्रधानांना । तू आणशील का महाराजांना ।। कोणीही मज महाराजाविना । वाचवू शकणार नाहीच ।।९२।। प्रयत्न करतो प्रधान म्हणत । महाराजांचा तर पत्ताच नसत ।। प्रधान खोलीत ध्यानस्थ बसत । महाराजांन आळविती ।।९३।। अगदी आर्त स्वरात । प्रधान महाराजांना सांगत ।। कठीण वेळ, यावे धावत । जेथे असाल तेथून ।।९४।। भाऊ मृत्यूच्या दाढेत । डॉक्टर सारे हात टेकत ।। तुम्हीच त्याला वाचवू शकत । प्रार्थना केली भक्तीने ।।९५।। प्रधानांच्या कानात । महाराजांचा ध्वनी प्रकटत ।। काळजी करू नको मी असे येत । सर्व ठीक होईल ।।९६।। महाराज तत्काळ तेथे आले । विनायकाच्या खोलीत गेले ।। विनायकाचे डोके थोपटले । हात कपाळी ठेवले ।।९७।। तू बरा झालास आता । कसलीही करू नकोस चिंता ।। आनंद विनायका झाला पुरता । महाराज सन्निध बैसले ।।९८।। विनायकास झोप लागत । महाराज खोलीबाहेर निघत ।। तोच डॉक्टरांचा ताफा येत । विनायकास तपासण्या ।।९९।। महाराज डॉक्टरांना सांगत । विनायकास झोप लागत आपोआप जाग येईपर्यंत । उठवू नका कुणी त्याला ।।१००।। दोन तास निघून गेले । विनायकाने डोळे उघडले ।। महाराजानीच मला वाचविले । दाढेतून मृत्यूच्या ।।१०१।। विनायक सांगू लागला । माझा पुनर्जन्म घडवून आणला ।। शरीरातून जाणा-या प्राणाला । महाराजांनी आणले ।।१०२।। ते अतिमानव महापुरूष थोर । नव्हेत तर प्रत्यक्ष परमेश्वर ।। शब्दाने त्यांचे उपकार । व्यक्त करणे शक्य ना ।।१०३।। डॉक्टरांचा कंपू आला । तो विनायकास तपासू लागला ।। डॉक्टरकंपू चकित झाला । खडखडीत तब्येत पाहून ।।१०४।। महाराजांस एका संस्थानिकांनी । भ्रष्ट करण्यास वेश्यांकडुनी ।। दारू पाजविली, परी त्या सर्वजणी । भक्त बनल्या पहा की ।।१०५।। महाराज घटकेत लहान होत । मोठेही होत क्षणात ।। कधी स्त्री, कधी पुरूष बनत । चमत्कार त्यांचा असा हा ।।१०६।। दुस-या महायुध्दात । जपानवर बाँब पडणार असत ।। ऐसे महाराज सांगत । तीन वर्षे आधीच ।।१०७।। महाराजांच्या सुदिव्य चरणी । साष्टांग वंदन भावे करुनी ।। अकरावा अध्याय या ठिकाणी । पूर्ण झाला असेच ।।१०८।। ।। संतवर्य योगिराज सद्गुरू राजाधिराज श्री शंकर महाराज की जय ।।

Search

Search here.