शंकरगीता अध्याय १४ वा

ग्रंथ - पोथी  > शंकरगीता Posted at 2018-12-05 17:12:22
शंकर गीता अध्याय १४ वा महाराज पाहती मज रोखून । वंदन केले मी वाकून महाराज रोखून पाहून । तसेच बसले पहात ।।१।। तीक्ष्ण डोळे मजला म्हणती । काय अडचणी तुझ्या पुढती ? ।। त्यांची तुजला कसली भीती ? । समर्थ मी आहेच ।।२।। माझ्या लीला विलासांची महती । तुला हवी ना होती ? ।। कोणत्या अपूर्व घटना घडती । तुला हव्या होत्या ना ? ।।३।। मम लीला विलासांचा डोंगर । ठेविला मी तुझ्या समोर ।। त्यातले कळस चमकदार । तेवढेच फक्त लिहावे ।।४।। भारतीय महायुध्दात । अठरा अक्षौहणी सैन्य असत ।। सर्वांच्या नुसत्या नावास न पुरत । अठरा अध्याय केवळ ।।५।। भगवंतानी भगवद्गीता । तरीही सांगितली या जगता ।। म्हणून सांगितली तुज ’शंकर गीता’ । अठरा अध्याय म्हणून ।।६।। हे हनुमंताचे शेपूट । याचा सापडणार नाही शेवट ।। म्हणून अठरा अध्यायाचा तट । बांधून आहे ठेवला ।।७।। महाराजांच्या डोळ्यांचे । बोल ऐकून मोलाचे ।। चकित होऊन वदलो वाचे । जयजय प्रभो शंकर ।।८।। अभ्यंरांच्या स्प्नात । रोज त्यांच्या मातोश्री येत ऐसे का रोज घडत ? । काळजी त्यांना लागली ।।९।। पैठणला महाराजांनी । अभ्यंकरांना घेतले बोलावुनी ।। महाराज नदीत उभे राहुनी । अभ्यंकरांना म्हणाले ।।१०।। भाताचे पिंड करुन सत्वर । वहा माझ्या पायावर ।। पिंड वाहताच चरणांवर । महाराज सांगू लागले ।।११।। तुझी आई झाली रे मुक्त । तेंव्हापासून अभ्यंकरांच्या स्वप्नात ।। आईचे येणे बंद होत । महाराजांनी उध्दरले ।।१२।। दत्तात्रेय गणेश अभ्यंकर । यांच्या वडिलांपासून ।। घरी महाराज येत असून । हेही भजती महाराजा ।।१३।। हे नऊ वर्षांचे असल्यापासून । महाराजांच्या सहवासात असून ।। महाराज यांना घेऊन । फिरले अनेक ठिकाणी ।।१४।। रात्री - अपरात्री महाराज येत । चहा - खिचडी करण्यात ।। भलतीच कामे करण्या लावत । करवूनही घेत ते ।।१५।। एकदा महाराज त्यांच्या घरात । चादर पांघरुन झोपत ।। जन्मल्या बाळासम लहान होत । अभ्यंकर झाले चकित ।।१६।। त्यांनी वडिलांना बोलावून म्हटले । अहो महाराज बाळ झाले ।। वडिलांनी पांघरुण काढले । पूर्ववत दिसले महाराज ।।१७।। महाराज म्हणाले ’माझे ऐका । मोठ्याचे लहान होता येईल का ?।। प्रत्यक्ष पाहिले ते खोटे का ? । भांबावून गेले दोघेही ।।१८।। अभ्यंकर म्हणाले महाराजांना । आपले मूळ रुप मज दाखवा ना ।। अभ्यंकर म्हणाले महाराजांना । जरुर बेटा दाखवीन ।।१९।। समाधीनंतर काही वर्षांनी । शुध्द अष्टमीच्या दिनी ।। रात्रीचे अडीच वाजले असूनी । मोठा चमत्कार जाहला ।।२०।। एक भव्य तेजस्वी व्यक्ती । प्रगटली अचानक समाधीवरती ।। पंचवीस फूट उंची होती । पुरुषरुप मनोहर ।।२१।। महिन्याने पुन्हा अष्टमीशी । तीच उंची त्याच वेळेशी समाधीवरती चटदिशी । स्त्रीरुप प्रगटले सुंदर ।।२२।। चूल पेटविली त्या स्त्रीने । कढईत भाजले शेंगदाणे ।। तसेच तोंडात ओतले हाताने । अगदी गरम असतांना ।।२३।। ती स्त्री म्हणे, मी आदिशक्ती । दर्शन, प्रसाद खाऊनी ।। मी जाणार आहे येथूनी । आवाज स्पष्ट कणखर ।।२४।। समाधीवर पादुकांच्या उजव्या बाजूस । गुप्त झाले पुरुषरुप ।। पादुकांच्या डाव्या बाजस । शक्ती अंतर्धान हो ।।२५।। अशीच एक अष्टमी असत । समाधी - मठाच्या मंडपात ।। एक भव्य रुप प्रगटत । तेज:पुंज विशाल ।।२६।। मारुतीसमोर मंडपात । मांडी घालून ते बसत ।। तेथनच ते पाय लांबवीत । समाधीवर ठेवले ।।२७।। बाबुराव रुद्र आणि अभ्यंकर । पहात होते हा प्रकार ।। तेवढ्यात ‘बाब्या’ ऐसा पुकार । त्या पुरुषाने केलाच ।।२८।। बाबुराव आवाज ओळखत । महाराज आपणास बाब्याच म्हणत ।। त्या पुरुषाने एका हातात । धरले बाबुरावांना ।।२९।। लांबवून दुस-या हातास । धरले अभ्यंकरास ।। अभ्यंकरास तो पुरुष । म्हणू लागला जोरात ।।३०।। माझे मळ रुप तूजला । पहावयाचे आहे ना ? ।। शब्द मी तुज दिला होता ना । पाहून घेई आता ते ।।३१।। तो पुरुष तेथून निघाला । पादुकांच्या उजव्या बाजूस गेला ।। अल्लख ऐसा पुकार केला । अंतर्धान पावला ।।३२।। पुढे ती शक्ती प्रगटत । पादुकांच्या डाव्या बाजूस जात ।। ‘अल्लख’ ऐसे पुकारत । गुप्त झाली तेथेच ।।३३।। अभ्यंकरांच्या मनात । अगदी लख्व प्रकाश पडत ।। ओळखिले हेच महाराज असत । मूळ रुप दाखविले ।।३४।। तीन वर्षांनी समाधीनंतर । अष्टमीस मठात समाधीवर प्रत्यक्ष महाराज निजले वर । पाय त्यांनी लांबविला ।।३५।। पाय एवढा लांबवीत । वर हंडी टांगलेली असत ।। तिला पायाने हलवीत । प्रत्यक्ष अभ्यंकर पहात ।।३६।। अभ्यंकरांची मुलगी आजारी । प्रत्यक्ष महाराज प्रगटले घरी ।। टोपी, चपला ठेवूनी दुरी । संडासात गेले लघवीस ।।३७।। टोपी ,चपला अभ्यंकरांनी । ठेविल्या पेटीत लपवुनी ।। बराच वेळ झाला म्हणुनी । संडास त्यांनी उघडला ।।३८।। महाराज तर गुप्त झाले । मग पेटीत सामान पाहिले ।। ते सामानही गुप्त झाले । घटना समाधीनंतरची ।।३९।। एकदा अभ्यंकरांच्या घरात । मी त्यांच्याशी होतो बोलत ।। त्यांच्या डोक्यावर मजला दिसत । दोन पाऊले तेजस्वी ।।४०।। अभ्यंकरांना मी म्हटले । महाराजांची चरणकमले ।। तुमच्या डोक्यावर भाग्य भले । अभ्यंकर वदले यावर ।।४१।। मी महाराजांसंगे खेळत । माझ्या डोक्यावर ते पाय ठेवत ।। नेहमीच ऐसे असे घडत । त्याच्याच परिणाम हा असत ।।४२।। महाराज एकदा सांगती । शिष्याच्या मस्तकावरती ।। गुरुंची ती पाऊले असती । गुरुप्रसाद असे हा ।।४३।। भस्मे आणि अभ्यंकर । या दोघांच्या मस्तकावर ।। महाराजांची पाऊले सुंदर । मी आहेत पाहिली ।।४४।। अक्कलोट स्वामी समर्थांचा । घरी फोटो लाव असा ।। महाराजांनी आदेश दिला । अभ्यंकरांना एकदा ।।४५।। अभ्यंकर म्हणाले महाराजांस । तुम्ही जेव्हा फोटो द्याल ।। तेव्हाच मी तो लावणार । अन्यथा लावणार नाहीच ।।४६।। बेळगावच्या गंधे महाराजांना । हगवण लागली, गुण येईना ।। गंधे म्हणाले सर्वांना । आता उपाय एकच ।।४७।। महाराजांच्या समाधीमठात । नेऊन सोडा मज सांप्रत काय व्हावयाचे ते होवो तेथ । आले समाधीमठात ।।४८।। जणू अक्कलोटस्वामी महाराज । असे दिसत गंधे महाराज ।। त्यांची हगवण सुश्रुषा कामकाज । अभ्यंकर होते करीत ।।४९।। नगरहून एक शेतकरी आला । तो अगदी दिसावयाला ।। शंकरमहाराजांसारखा भला । शेतकरी सांगू लागला ।।५०।। माझ्या भावाला मुलगा झाला । त्याने नवस होता केला ।। मुलगा झाल्यावर समाधीला । दर्शनास येण्याचा ।।५१।। त्याप्रमाणे बैलगाडीतून । भाऊ मुलाला घेऊन ।। येत आहे मागाहून । पुढे दर्शना मी आलो ।।५२।। तो शेतकरी आल्यावर । गंध्यांची हगवण पळाली पार ।। बरे वाटू लागले फार । प्रकृती त्यांची सुधारली ।।५३।। शेतकरी अभ्यंकरांस । त्यांचा पूर्ववृत्तांत सांगत ।। अभ्यंकर अगदी थक्क होत । ठावूक त्याला हे कसे ? ।।५४।। शेतकरी म्हणाला गंधे यांना । सांगू नका कोणास ।। मी कोण ? आणखी खास । शेतक-याने सांगितले ।।५५।। भाऊ येत नाही म्हणून । शेतकरी गेला निघून ।। गंधे अभ्यंकरांना बोलावून । विचारती, कोण हा शेतकरी ? ।।५६।। हेच शंकर महाराज असत । ऐकता अभ्यंकर झाले चकित ।। गंधे अभ्यंकरांच्या घरी येत । डबा नैवेद्याचा घेतला ।।५७।। दोघे समाधी मठात येत । गंधे नैवेद्य दाखवीत ।। अभ्यंकरांना एक फोटो देत । अक्कलकोट स्वामींचा ।।५८।। गंधे म्हणाले अभ्यंकरांना । महाराजांनी सांगितले मजला ।। अक्कलोट स्वामींचा फोटा तुजला । द्यावा, म्हणून दिला हा ।।५९।। अभ्यंकर फोटो असता पहात । महाराज असताना जे घडत ।। संपूर्ण सारे आठवत । धन्यता त्यांना वाटली ।।६०।। आज अभ्यंकरांच्या स्ववास्तूत । अक्कलकोटस्वामींचा फोटो असत शंकरमहाराजांचाही शोभत । दिव्य फोटो मोहक ।।६१।। एकदा महाराज होते बसलेले । दर्शनास लोक जमलेले ।। एक हरिजन गृहस्थ तेथे आले । प्रसादाच्या आशेने ।।६२।। दर्शनास तर गर्दी असत । महाराज सर्वांस प्रसाद देत ।। हरिजन दूर उभा असत । चिंता, प्रसाद मिळेल का ? ।।६३।। तेथूनच महाराजांनी । आपला हात लांब करुनी ।। हा घे प्रसाद’ असे म्हणुनी । दिला प्रसाद हरिजना ।।६४।। पुढे काही वर्षांनी । अगदी त्याच ठिकाणी ।। महाराजांची समाधी होउनी । कैक प्रसंग असेही ।।६५।। सयाजीराव गायकवाड । यांना बडोद्याच्या गादीवर ।। महाराजांनी बसवले स्वकर । वैभवशाली थाटात ।।६६।। बडोद्याच्या राजवाड्यात । महाराजांचा पुतळा असत ।। अत्यंत प्रेक्षणीय शोभत । भव्य फोटो तसाच ।।६७।। महाराज नेहमी हिमालयात । मुद्दाम पहा जात असत ।। अनेकजण तेथे दिसत । समाधी घेऊन बसलेले ।।६८।। चार - चार हजार वर्षापासून । जिवंत समाधी घेऊन ।। बसले आहेत कित्येकजण । दाढी जमिनीपर्यंत ।।६९।। कित्येकांच्या भुवयांचे केस । जमिनीपर्यंत लांबत ।। अशांची दाढी महाराज हलवीत । पहात समाधी खरी खोटी ।।७०।। पुण्याच्या लकडी पुलावरती । एक गृहस्थ रोज येऊन बसती ।। महाराजही तेथे येती । गप्पा मारीत दोघेही ।।७१।। नियमाने दोघांच्या गप्पा होत । गृहस्थ महाराजांस विचारत ।। आपले नाव काय असत ? । राहता कोठे आपण ? ।।७२।। शंकरमहाराज माझे नाव । मी राहतो धनकवडी मठात ।। महाराज त्याला सांगत । ऐकून त्याने घेतले ।।७३।। पुढे दोन दिवसात । महाराज आले नाहीत चौकशी करण्यास गृहस्थ येत । धनकवडी मठात ।।७४।। शंकर महाराज कोठे असत ? । बाबुराव रुद्र दाखवित ।। ही महाराजांची समाधी असत । गृहस्थ थक्क जाहला ।।७५।। लकडी पुलावरती रोज । नियमाने येतात हे महाराज ।। आले नाहीत काल आज । चौकशीस आलो म्हणून ।।७६।। रुद्र त्याला सांगत । समाधी घेऊन आठ वर्ष होत ।। गृहस्थ झाले चकित । रुद्रही थक्क जाहले ।।७७।। समाधी घेतल्यावर काही वर्षांनी । एका भक्ताच्या लग्नास जाउनी ।। कोठी सांभाळली महाराजांनी । फोटो काढला त्यात महाराज ।।७८।। महाराजांचा मुहुर्त । अमावस्या हा असे ख्यात ।। हाच मुहूर्त ते सांगत । कोणत्याही कामास ।।७९।। महाराज हजामतीस बसत । हजामत होईपर्यंत ।। केस येत पूर्ववत । किमया कैशी पहा ही ! ।।८०।। नगरचे नवले महाराजांना म्हणाले मज विष्णुपद दाखवा ना ।। महाराज नदीत उभारुन नवलेना । ‘विष्णुपद पहा’ म्हणाले ।।८१।। पाण्यात सुवर्णपद दिसले । हात ठेवीत त्यावर नवले ।। हात सरकवीत बघू लागले । विष्णुपद किती लांब ते ? ।।८२।। सुवर्ण - विष्णुपद संपेना । आश्चर्य वाटे नवले यांना ।। मुगुट दिसला वर पाहताना । आकाशाला भिडलेला ।।८३।। अपूर्व अशा या घटनेनी । दाखवून दिले महाराजांनी ।। स्पष्टपणे मी कोण असुनी । बोध मानवा असा हा ।।८४।। पुण्यास समाधी घेतल्या । ब-याच वर्षानंतर ।। वाशीमचा जानू महार । मुलगा त्याचा हरवला ।।८५।। चोहीकडे शोध केला । नुसता पत्ताही न लागला ।। तीन महिन्यांनी मुलगा आला । हाती खाऊ घेऊन ।।८६।। विचारता ’कोठे होतास ?’ । मुलगा सांगे बापास शंकरमहाराज इथे येऊन । घेऊन गेले मला ते ।।८७।। महाराजांच्या समवेत । इतके दिवस होतो हिंडत ।। आज खाऊ देऊन हातात । महाराजांनीच सोडले ।।८८।। शांताबाई पुणेकर । त्यांचे पती निवर्तल्यावर ।। विसाव्या दिवशी महाराज तर । त्यांच्या घरी गेलेच ।।८९।। तुला विसावा देण्यासाठी । आज आलो तुझ्या सदनी ।। सर्व व्यवस्थित होईल म्हणुनी । महाराज गेले सांगून ।।९०।। सहा मुले, शांताबाई । सांभाळ केला भावानी ।। आज मुलांचे सर्व व्यवस्थित असूनी । समाधान शांताबाईस ।।९१।। नाशिकला काबुलीबाबाकडे । महाराजांचा मुक्काम त्यांच्याकडे ।। नागपूरचे ताजुद्दीन बाबाही आले । महाराजांच्या दर्शना ।।९२।। महाराज जेंव्हा झोपत । तेव्हा ताजुद्दीन पहारा करीत ।। मुसलमानांना हे न खपत । अडथळा करण्यास येत ते ।।९३।। जेंव्हा मुसलमान तेथे येत । तेव्हा ताजुद्दीनबाबाचा पहारा असत ।। मुसलमानांना ताजुद्दीन दिसत । साक्षात भगवान हनुमंत ।।९४।। मुसलमान घाबरुन पळून जात । ज्यांच्यास्तव हनुमंत पहारा करीत ।। ते कोण असावेत । बोलकी घटना ही असे ।।९५।। प्राध्यापक रंगनाथ दत्तात्रेय वाडेकर । दर्शनास गेले समाधीवर ।। महाराजांच्या दर्शनाची हुरहुर । त्यांना होती लागली ।।९६।। दर्शन घेता समाधीतून । जे अकराशे अकरा’ प्रगटला ध्वनी ।। इंग्रजी भाषेतील ध्वनी ऐकूनी । अर्थबोध होईना ।।९७।। अर्थबोध झाला समाधीवर । ‘जे’ म्हणजे ज्ञानेश्वर ।। ‘जे’ ज्ञानेश्वराचे आद्याक्षर । पुढे एक चारदा असत ।।९८।। अकराशे अकरा यात । एक अंक चारदा असत ।। ज्ञानेश्वराचा पहिला अध्याय । ओवी पहिली त्यातील ।।९९।। त्या ओवीचे पहिले चरण । त्याचेही पहिले अक्षर म्हणजे ॐ हे असत । चार एकचा अर्थ हा ।।१००।। ज्ञानेश्वरांच्या समाधीवर । वाडेकरांना ॐचीच साधना मिळत ।। तीच साधना इतेही प्रगटत । आनंद त्यांना जाहला ।।१०१।। अक्कलकोट स्वामी समर्थ । माणिकप्रभू शंकरमहाराज ।। साईबाबा एकत्र फिरत । काही वर्षे, चौघेही ।।१०२।। एकोणीसशे अठ्ठावीस साली । पाकिस्तान होणार म्हणूनी ।। सांगितले होते महाराजांनी । त्याप्रमाणे घडलेच ।।१०३।। महाराज म्हणाले एकदा । कोणता पुढारी मरणार कसा ।। कुणावर झाडल्या जाणार गोळ्या । विषप्रयोग कुणावर ? ।।१०४।। खून कोणाचा होणार ? । विमान पडून कोण मरणार ? ।। नावे, दिनांक सांगत सविस्तर । त्याप्रमाणे घडलेच ।।१०५।। त्या अनामिक पुढा-याची । नावे या पवित्र ग्रंथात कशासी ? ।। म्हणून तो उल्लेख टाळला असूनी । महाराज बोल अचूक ।।१०६।। इसवीसन दोन हजार साली । माझा पठ्ठ्या शिवाजी ।। दिल्लीच्या तक्तावर येणार असुनी । महाराजांचे बोल हे ।।१०७।। पाहून महाराजांची चरणकमले । भक्तीने मी वंदन केले ।। चौदाव्या अध्यायाचे संपले । लिखाण या ठिकाणी ।।१०८।। ।। संतवर्य योगिराज सद्गुरू राजाधिराज श्री शंकर महाराज की जय ।।

Search

Search here.