श्री शंकर महाराज स्तवन

स्तोत्र - मंत्र  > श्री सद्‌गुरु स्तोत्र Posted at 2018-11-02 16:06:07
श्री शंकर महाराज स्तवन  संतवर्य श्री योगिराज प्रभु शंकरमहाराज वंदन करुनी चरणि अर्पितो भक्तीचा साज।।१।। अतर्क्यलीला, अगाध महिमा, अमर्याद करणी सदैव आम्ही नतमस्तक हो, आपल्याच चरणी।।२।। इष्टदेवता ग्रामदेवता स्थानदेवताही सर्व देवता आमच्या अगदी आहेत हो तुम्ही।। ३।। सकलहि देवांच्या रूपात तुम्ही दर्शन देत अधिकार हा प्रचंड तुमचा कळूनिया येत।।४।। अशक्य जे जे जगी, सहज ते तुम्हालाच शक्य तुम्ही कोण? हे ओळखणे ही मानवा न शक्य।।५।। जी जी इच्छा मनी धरावी पूर्ण तुम्ही करता जे जे तुमच्या मनात येईल, करून दाखविता।।६।। भूत भविष्य नि वर्तमान हे तुमच्या हातात महाकाळ हा तुम्हापुढे हो होई भयभीत।।७।। तुम्हा पाहणे, तुम्हांस स्मरणे, घेणे दर्शन भाग्यविण या गोष्टी साऱ्या, येती ना घडुन।।८।। तुमच्या चरणी सतत आमची वाढावी निष्ठा अयोग्य गोष्टी आम्हाला हो वाटाव्या विष्ठा।।९।। धरले आम्ही भावे तुमचे, जगी घट्ट चरण सोडणार कधि नाही आम्ही, आले जरी मरण।।१०।। नित्य घडावे स्मरण नि पूजन, देहच रंगावा शंकर महाराजांचा जयजयकार मुखी व्हावा।।११।। अकरा कवनांचे हे स्तोत्र पठण करता दिनरात विजयी होईल सर्वत्र कामना पूर्ण होतील।।१२।। ।। संतवर्य योगीराज सद् गुरु राजाधिराज शंकर महाराज की जय ।।

Search

Search here.