साधी शान्ति हवन
यज्ञ - शान्ति > पूजा शान्ति साहित्य यादी Posted at 2018-12-15 11:34:01
--- शांती हवन सामान लिस्ट ---
हळद , कुंकू , चंदन , अष्टगंध
समयी , निरांजन , दिव्यासाठी तेलाच्या तूपाच्या वाती - कापूस , माचीस
अगरबत्ती , धूप , कापुर
पळी भांडे - फुलपात्र
घरातील गणपती मूर्ती - तांबे पितळ पंचधातु इत्यादीची
शंख , घंटी
पंचामृत अर्धा वाटी ( दूध + दही + तूप + मध + साखर )
सुपाऱ्या - 8 ते 10 छोट्या व 8 - 10 मोठया ( किंवा सर्वच मोठ्या सुपाऱ्या )
पाच सात पत्रावळी , 2 ते 3 मोठी ताटे ,
5 ते 7 वाट्या किंवा पत्रावळीचे द्रोण , 2 - 3 पळी / चमचे , रद्दी पेपर
एक दोन स्टील चे भांडे ( निर्माल्य पाणी वैगेरे काढण्यासाठी )
घरातील फोटोना हार , दरवाजाला हार तोरण आंब्याची डहाळी , रांगोळी , पूजेसाठी सुद्धा आंब्याची पाने डहाळी
गंगाजल , गोमूत्र , विड्याची पाने 30
21 हळकुंड , 21 अक्रोड , 21 खारीक , 21 लवंग , 21 वेलची
30 कॉइन्स - सुट्टे पैसे ( एक किंवा 2 रू चे कॉइन्स ) , 10 रू च्या 05 नोटा , 50 च्या 3 नोटा , 100 च्या 3 नोटा
वेगवेगळी रंगीत फुले ( तेरडा नको ) , तुळशीपत्र , बेलपत्र , दुर्वा , गजरे व वेण्या 2 - 3
बसण्यासाठी धुतलेल्या चादर / बेडशीट / आसन वैगेरे
हात पुसण्या साठी - देव पुसण्यासाठी - देवाची भांडी पुसण्यासाठी 2 ते 3 स्वच्छ धुतलेले किंवा नवीन नॅपकिन / वस्त्र / हातरुमाल
हाताला बांधायाचा नाडा - धागा ( लाल / पंचरंगी ) आणि जानवे जोड 3
चौरंग व पाट मिळून टोटल तीन - चार
देवासाठी ---> 2 - 3 ब्लॉउज पीस , एक पंचा - उपरणे , एक टॉवेल , एक नॅपकिन , एक
धोतर उपरणे किंवा शर्ट पॅन्ट पीस , एक् साडी ( दान म्हणून )
5 फळे , 8 नारळ , 3 खोबरेवाट्या , 100 ग्राम गूळ , 100 ग्राम खडीसाखर , थोडा मिक्स सुकामेवा
3 ते 4 तांब्या / पितळेचे कलश व 2 ते 3 ताम्हण
अडीच किलो गहू , चार किलो बारीक तांदूळ
नवग्रहांची धान्ये प्रत्येकी 250 ग्राम वेगवेगळे पिशवीत पुडीत धान्य किंवा डाळी च्या स्वरूपात ( --> तूर - मूग - मटकी - वाटाणा - चवळी - हरभरा - चणा डाळ - ज्वारी - बाजरी - पांढरे तीळ - शेंगदाणे - रवा - साबुदाणा - साखर )
गायीचे तूप अर्धा - पाऊन किलो
काळे तीळ अर्धा - पाऊन किलो
शेणाच्या गोवऱ्या 3 - 4 शेण्या , हवना साठी इंधन म्हणून 2 - 3 किलो लाकडे , तसेच 6 - 7 समिधा बंडल
होम हवना साठी 10 विटा किंवा यज्ञपात्र हवन पात्र / हवन कुंड , आणि त्यात थोडी रेती / वाळू / माती लागेल.
घर - जागा स्वच्छ करावी , गोमूत्र गंगाजल शिंपडावे , दरवाजाला हार तोरण लावावे , रांगोळी काढावी , घरातील देवाच्या फोटोना वैगेरे हार घालावे ,
पूजेच्या दिवशी उपवास असेल - उपवासासाठी फराळ म्हणून वेफर्स / राजगिरा चिकी - लाडू वेगेरे आणावीत , पूजेच्या काही दिवस आधीपासून तसेच काही दिवस नंतर पर्यंत शाकाहार असावा ,
पूजेला बसणार्याने धुतलेले स्वच्छ वस्त्र धारण करावे ( काळा - लाल - हिरवा आदी भडक रंग नसावा )
------------ ----------- ----------- --------- ---------
----------- विशेष सूचना -----
या सर्व पूजा यज्ञ साहित्य याद्या / लिस्ट अनेकांची मते विचारात घेऊन बनवलेल्या आहेत .. यादितील साहित्य किंवा संख्या यामध्ये स्थळ - प्रांत विभाग / ब्राह्मण शाखा / पद्धत रीती रिवाज या प्रमाणे कमी जास्त तो बदल होऊ शकतो , या साठी हे एवढेच् कसे / असेच का / एवढी संख्या वैगेरे वैगेरे अशा तक्रार ना करता या याद्यांचा लाभ घ्यावा .. इतरांना पाठवताना स्वतः त्यामध्ये योग्य तो बदल करावा. काही सूचना - सुधारणा असल्यास नक्की कळवावे..
या याद्या सिलेक्ट करून कॉपी पेस्ट / शेअर होतात .. हवा तो बदल करून फॉरवर्ड करू शकतात.
धन्यवाद ...
Search
Search here.