साईनाथ आरती

आरती  > साईबाबा आरती Posted at 2018-12-09 04:04:22
ओंवाळूं आरती माइया सदगुरुनाथा, साईनाथा । पांचाही तत्वांचा दीप लाविला आतां ।। निर्गुणाची स्थिति कैसी आकारा आली । सर्वा घटीं भरुनि उरली सांई माउली ।। ओंवाळूं  ।। रज तम सत्व तिघे माया प्रसवली । मायेचिये पोटीं कैसी माया उद्घवली ।। ।। ओंवाळूं  ।। सप्तसागरी कैसा खेळ मांडीला । खेळूनियां खेळ अवघा विस्तार केला ।। ।। ओंवाळूं ।। ब्रहांडींची रचना कैसी दाखविली डोळां । तुका म्हणे माझा स्वामी कृपाळू भोळा ।। ।। ओंवाळूं ।।

Search

Search here.