साईबाबा स्तोत्र4
स्तोत्र - मंत्र > साईबाबा स्तोत्र Posted at 2018-12-09 04:38:14
साईबाबा स्तोत्र4
प्रभातसमयीं नभा शुभ रवि प्रभा फांकली ।
स्मरे गुरु सदा अशा समयिं त्याछळे ना कली ।
म्हणोनि कर जोडूनी करुं अतां गुरुप्रार्थना ।
समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना ।। 1 ।।
तमा निरसि भानु हा गुरुहि नासि अज्ञानता ।
परन्तु गुरुची करी न रविही कधीं साम्यता ।
पुन्हां तिमिर जन्म घे गुरुकृपेनि अज्ञान ना ।
समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना ।। 2 ।।
रवि प्रगट होउनि त्वरित घालवी आलसा ।
तसा गुरुहि सोडवी सकल दुष्कृतीलालसा ।
हरोनि अभिमानही जडवि तत्पदीं भावना ।
समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना ।। 3 ।।
गुरुसि उपमा दिसे विधिहरीहरांची उणी ।
कुठोनि मग येई ती कवनिं या उगी पाहुणी ।
तुझीच उपमा तुला बरवि शोभते सज्जना ।
समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना ।। 4 ।।
समाधि उतरोनियां गुरु चला मशीदीकडे ।
त्वदीय वचनोक्ति ती मधुर वारिती सांकडें ।
अजातरिपु सदगुरु अखिलपातका भंजना ।
समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना ।। 5 ।।
अहा सुसमयासि या गुरु उठोनियां बैसले ।
वोलोकुनि पदाश्रिता तदिय आपदे नासिलें ।
असा सुहितकारि या जगतिं कोणिही अन्य ना ।
समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना ।। 6 ।।
असे बहुत शाहणा परि न ज्या गुरुची कृपा । न तत्स्वहित त्या कळे करितसे रिकाम्या गपा ।
जरी गुरुपदा धरी सुदृढ़ भक्तिने तो मना ।
समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना ।। 7 ।।
गुरो विनति मी करीं हृदयमंदिरीं या बसा ।
समस्त जग हें गुरुस्वरुपची ठसो मानसा ।।
घडो सतत सत्कृती मतिहि दे जगत्पावना ।
समर्थ गुरु साइनाथ पुरवी मनोवासना ।। 8 ।।
Search
Search here.