जयजयाजी मदनांतक गौरीशंकरा
पंचारती करितो तुज हे महेश्वरा ।।ध्रु॰।।
व्याघ्रांबर अंगी तू नित्य सेवेसी ।
रुंडमाळ कंठी असे मस्तकी शशि ।
गिरिजा तव वामांकी शोभते तशी ।
भस्मप्रिया भूतपते इंदुशेखरा ।। १ ।। जय...
बहु दुर्जन त्रिपुर दैत्य प्रबल जाहला ।
हरि विधीसह विबुध पिडूनी त्रास दिधला ।
तेव्हां ते अति भावे स्तविती मग तुला ।
त्रिपुरासुर वधुनि सुखी करिसी सुरवरा ।।२।। जय..
एकवीस स्वर्गीहुनी उंची तव अती ।
सर्वेशा दाता तू सद्गतीप्रती ।
तव लीला वर्णनासी अल्प मम मती ।
विठ्ठलसुत विनवीतसे रक्षी किंकरा ।।३।। जय...
Search
Search here.