शुक्रेश्वर सिद्धेश्वर आरती

आरती  > शिव आरती Posted at 2018-03-28 02:36:02
श्री शिवशंकर आरती / सिद्धेश्वर आरती शुक्रेश्वर सिद्धेश्वर शंभो महादेवा । विश्वेश्वर त्रिगुणालय दिनरजगी घ्यावा ॥ मुकुटी गंगा भाळी शशि नीलग्रीवा । सुंदर ध्यान दिगंबर जगदात्मा गावा ॥ १ ॥ जय देव जय देव जय गिरिजारमणा । त्रिपुरांतक हर रुद्रा नमितो तवचरणा ॥ धृ. ॥ नमिती सुरमुनी ऎसा तूं शंकर भोळा । होऊनी याचक येऊनि चिलया उद्धरिला ॥ मार्कंडेयालागी मृत्यू चुकविला ॥ मत्करुणा कां न ये जिव उरला डोळां ॥ जय. ॥ २ ॥ जन्मार्जित दोषाने चौर्यांशी फिरलो । कवण्या योगें न कळे नरजन्मा आलों ॥ विसरुनि हितमतिगतिला भवडोहि फसलो । तापत्रयसंतापे जर्जर बहु झालो ॥ जय. ॥ ३ ॥ मृगजलतृष्ण लटकी हे मजला कळले । मायेच्या अनुसंगे कवटाळुनि धरिले ॥ कामक्रोधादिक हे रिपु जागे केले । विषयांच्या लोभाने स्वहित बुडविले ॥ जय. ॥ ४ ॥ ऎसी दु:खे वदतां थकलो मी ताता । आतां अंत न पाहें होई मज दाता ॥ विष्णूचा कैवारी सांब प्रिय असतां । मग कां करणे लागे भवसागरचिंता । जय. ॥ ५ ॥

Search

Search here.