शिव शंकर आरती
मस्तकि जन्हूतनया विमलार्जुन तारी । भाळी रजनीनायक वामांगी गौरी ॥
नयनी पावक श्रवणी विनतासुतगौरी ॥ कंठी विषधर कंबुज व्याघ्रांबरधारी ॥ १ ॥
ऊँ हर हर हर महादेव हर शिव भूतेशा, हर शिव नागेशा ।
उजळूनी उत्तमधूप , लावुनी कर्पूरदीप दुर करिं भवपाशा ॥ धृ. ॥
दशभुज पंचानना तूं वससी स्मशानीं । भस्म अर्चूनी अंगी कंथा परिधानी ॥
पन्नग रुळती गळां सुर भजती वाणीं । वृषभारूढ तूं योगी शंकर शूळपाणीं ॥ ऊँ हर हर. ॥ २ ॥
विश्वंभर जटिला शिव कर्पूरगौरा । रतिपति जाळुनि क्रोधें वधिले त्वा त्रिपुरा ॥
शिव शिव नाम जपतां वाचे रघुवीरा । नकळे महिमा शेषा निर्गुण ॐकारा ॥ ऊँ हर हर. ॥ ३ ॥
जपतसाधन तेथे साक्षी कर्माचा । नाना तत्पर योग आश्रय धर्माचा ॥
साधक परमार्थाचा भक्ता सौख्याचा । गाभा स्वानंदाचा अंतक सकलांचा ॥ ऊँ हर हर. ४ ॥
सद्गुरू सर्वेशा तूं सद्गतिचा दाता । माया ही निर्मूळ शंकर तूं कर्ता ॥
एकविस स्वर्गे उंच त्याहूनि तूं वरचा । वदनी तानाजीच्या वदनी भक्ताजीच्या शिव शिव ही वार्ता ॥ ऊँ हर हर हर महादेव. ॥ ५ ॥
Search
Search here.