कर्पूरगौरा गौरीशंकरा आरती

आरती  > शिव आरती Posted at 2018-03-28 06:41:44
शिव शंकर आरती कर्पूरगौरा गौरीशंकरा आरति करूं तुजला ॥ नाम स्मरता प्रसन्न होउनि पावसि भक्ताला ॥ धृ. ॥ त्रिशूळ डमरू शोभत हस्तीं कंठि रुंडमाळा ॥ उग्रविषातें पिऊनि रक्षिसी देवां दिक्पाळां ॥ तृतीय नेत्रीं निघती क्रोधें प्रळयाग्नी ज्वाळा ॥ नमिती सुरमुनि तुजला ऎसा तूं शंकर भोळा ॥ १ ॥ ढवळानंदी वाहन शोभे अर्धांगी गौरी ॥ जटा मुकुटीं वास करितसे गंगासुंदरी ॥ सदया सगुणा गौरीरमणा मम संकट वारीं ॥ मोरेश्वरसुत वासुदेव तुज स्मरतो अंतरी ॥ २ ॥

Search

Search here.