श्रीशिवलीलामृत माहिती
ग्रंथ - पोथी > शिवलीलामृत Posted at 2018-12-04 16:08:09
श्रीशिवलीलामृत ग्रंथ पोथी
भगवान शंकराची विशेष कृपा प्राप्त करून घेण्यासाठी अनेकजण शिवलीलामृत पोथीचे पारायण करतात. व त्यामुळे उत्तम फलप्राप्तीचा अनुभव सुद्धा अनेकांना आला आहे ..
सप्ताह किंवा पारायणाची पध्दत
एका शुभदिवशी सोमवारी किंवा प्रदोष किंवा शिवरात्रीच्या दिवशी सकाळी / सायंकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन शिवाचे पूजन अर्चन अभिषेक करून ११ बेलाची पाने पिंडीवर वहावीत व शंकराचे जप नामस्मरण करून " हे परमेश्वर श्री शिवशंकर मृत्युंजया , मी आपल्या प्रसन्नते साठी तसेच शांति, समाधान, आनंद वृद्धीसाठी व माझी मनोकामना पुर्ती (जी इष्ट कामना असेल ती बोलावी ) साठी श्रीशिवलीलामृत ग्रंथ पोथीचे ७ दिवसात ( जेवढे दिवस पारायण करणार तेवढे बोलावे ) पारायण करणार आहे तरी हे कार्य आपण कृपा करून माझ्याकडून पूर्ण करून घ्यावे." अशी प्रार्थना करावी ( शक्य असल्यास ब्राह्मण गुरुजींना घरी बोलावून पूजन करावे) व तेथे किंवा स्वत:च्या घरी येऊन सकाळी संध्याकाळी ( रात्रीच्या भोजनापूर्वी ) शिवलीलामृत पोथी वाचावी. सदैव शूचिर्भूत असावे.
सोमवार - अध्याय १ व अध्याय २
मंगळवार - अध्याय ३ व अध्याय ४
बुधवार - अध्याय ५ व अध्याय ६
गुरुवार - अध्याय ७ व अध्याय ८
शुक्रवार - अध्याय ९ व अध्याय १०
शनिवार - अध्याय ११ व अध्याय १२
रविवार - अध्याय १३ व अध्याय १४
रविवारी किंवा सोमवारी १५ वा अध्याय वाचावा.
पारायण करताना पोथीसमोर किंवा देवासमोर धूप दीप असावा.
पोथी मोठयाने वाचलेली उत्तम . इतरांनीही ऐकली तरी चालेल..
वाचन पूर्ण झाल्यावर १०८ वेळा ॐ नम: शिवाय या मंत्राचा जप करावा ( जमल्यास रोज जप करावा ) जमल्यास ब्राह्मण गुरुजींना बोलावून शिवशंकराचे विशेष पूजन अर्चन करून त्यांना धान्य शिधा , शुभ्र वस्त्र , फळ , खडीसाखर , पांढरे तीळ व तूप दान करावे व दक्षिणा द्यावी.. पारायणाच्या सुरुवातीला सुद्धा गुरुजींना बोलावून पूजन अभिषेक असे केल्यास उत्तम , परंतु निदान पारणे उद्यापन च्या वेळेस तरी गुरुजींना बोलवावे.
Search
Search here.