श्राद्ध साहित्य यादी

यज्ञ - शान्ति  > पूजा शान्ति साहित्य यादी Posted at 2018-10-17 12:53:47
कलश व ताम्हण - दोन ते तीन पळी भांडे बारानंतर एक ते दीड तासापर्यंत श्राद्ध करावे. श्राद्धाला लागणारी तयारी पांढरे चंदन उगाळून, पांढरी सुवासिक फुले, तुळस, स्वच्छ काळे तीळ, यव (धान्य), सुपारी, तीनचार ताम्हणे, तांबे ३, पळ्या ३, पाट दोन, गोपीचंदन, सुटे पैसे, पत्रावळी, केळीची पाने. शिधा साहित्य - गव्हाचे पीठ (अर्धा किलो), तांदूळ (पावकिलो), हरबरा डाळ (पाव किलो), तुरडाळ (पाव किलो), गुळ (पाव किलो), तुप (१०० ग्रॅम), लाल भोपळा साधारण (१०० ग्रॅम), २ बटाटे, ५-६ मिरच्या, दक्षिणा. या शिध्यावर तुळशीपत्र ठेवून पांढरे चंदन, उगाळून, पांढरी सुवासिक फुले, मोगरा, जाई-जुई, सोनटक्का दुहेरी तगर, कमळे लाल सोडून, अगस्तीची फुले, सोनचाफा, नागचाफा, पारिजात, बकुल, सुरंगी वगैरे. तुळस, माका, अगस्तीची पाने, दुर्वा, स्वच्छ केलेले धुतलेले काळे तीळ, तसेच यव (जव टरफलासहित गहू) पूर्वी एक धान्य मिळत होते. सुपार्‍या चांगल्या (पोफळेसुद्धा), नारळ (वाजणारे), धूप (अगरबत्ती), दीप दोन्ही, विड्याची देठाची पाने, शक्य झाल्यास विडे बनवून, कापुर, जानवी जोड, काडेपेटी, पांढरी लोकर, वस्त्र धोतर, पंचा, शर्टपीस, शाल, पलंगपोस, चादर वगैरे भस्म, मध, तीन चार ताम्हने, तांबे ३, पळ्या ३, आसने, पाट, भांडी ३, गोपीचंदन, सुटे पैसे, पत्रावळी, केळीची पाने, द्रोण, अथवा पाट्या, शक्यतो स्टीलचे ताट वाटी वापरू नये. श्राद्धाचे जेवण  वरण, भात, तांदळाची खीर, कढी-भजी टाकून, पुर्‍या, पाटवडी (डाळीच्या पिठाच्या वड्या), पाटवड्याची भाजी, उडदाच्या डाळीचे वडे, हरभरा डाळीचे वडे, भजी, घारगे (गूळ घालून केलेल्या पुर्‍या) अळुवडी भाज्या - मेथी, कारले, गवार (अख्खी), भेंडी, लाल भोपळा. कोशिंबीर - पेरू, केळी, डाळींब, सफरचंद, काकडी या फळांची लिंबू, आल्याचा तुकडा (काही पदार्थ राहिले असल्यास सर्व 'आले' या अर्थी) शक्यतो पदार्थात कांदा, लसूण वापरू नये. तारतम्याने भाज्यांच्या अभावी कडधान्ये चालतात.   महत्वाचे --  या सर्व पूजा यज्ञ साहित्य याद्या / लिस्ट अनेकांची मते विचारात घेऊन बनवलेल्या आहेत .. यादितील साहित्य किंवा संख्या यामध्ये स्थळ - प्रांत विभाग / ब्राह्मण शाखा /  पद्धत रीती रिवाज या प्रमाणे  कमी जास्त तो बदल होऊ शकतो , या साठी हे एवढेच् कसे / असेच का / एवढी संख्या वैगेरे वैगेरे अशा तक्रार ना करता या याद्यांचा लाभ घ्यावा .. इतरांना पाठवताना स्वतः त्यामध्ये योग्य तो बदल करावा. काही सूचना - सुधारणा असल्यास नक्की कळवावे.. धन्यवाद

Search

Search here.