आरती भुवनसुंदराची
आरती > विष्णु आरती Posted at 2018-03-31 02:42:41
आरती भुवनसुंदराची -- कृष्ण आरती
आरती भुवनसुंदराची l इंदिरा वरा मुकुंदाची llध्रु॰ll
पद्मसम पादयुग्मरंगा l ओवाळणी होती भृंगा l
नखमणि स्रवताहे गंगा l जे का त्रिविध तापभंगा llचालll
वर्तुळ गुल्फ भ्राजमाने l किंकीणी क्वणित नाद घणघणित l
वांकीवर झुणित, नूपुरे झनन मंजिराची l झनन ध्वनी मंजिराची ll१ll
पीतपट हाटक तप्त वर्णी l कांची नितंब सुस्थानी l
नाभिची अगाध हो करणी l विश्वजनकाची जे जननी llचाल ll
त्रिवली ललित उदरशोभा l कंबुगळा माळ, विलंबित झळाळ l
कौस्तुभ सरळ बाहु श्रीवत्सतरळ मणिमरळ कंकणाची l
प्रीति बहु जडित कंकणाची ll२ll आरती...
इंदुसम आस्य कुंदरदना l अधरारुणार्क बिंबवदना l
पाहता भ्रांति पडे मदना l सजल मेघाब्धि दैत्यदमना llचालll
झळकत मकरकुंडलाभा कुटिलकुंतली l
मयुर पत्रावली वेष्टिले तिलक भाळी केशरी झळाळित l
कृष्णकस्तुरीची अक्षता काळी कस्तुरीची ll३ll आरती...
कल्पद्रुमातळी मूर्ती l सौदामिनी कोटीदीप्ती l
गोपी गोपवलय भवती l त्रिविष्टप पुष्पवृष्टि करिती llचालll
मंजुळ मधुर मुरलीनादे l चकित गंधर्व चकित अप्सरा l
सुरगिरीवरा, कर्पुराधर रतीने प्रेमयुक्त साची l
आरती ओवाळित साची ll४ll आरती...
वृन्दावनीचिये हरणी l सखे गे कृष्ण माय बहिणी l
श्रमलो भवाब्धिचे फिरणी lआता मज ठाव देई चरणी llचालll
अहा हे पूर्ण पुण्यश्लोका l नमितो चरण शरण मी करुणा येऊ दे l
विशाळपाणि कृष्ण नेणते, बाळ आपुले राखि लाज याची l
दयानिधे राखि लाज याची ll५ll आरती...
Search
Search here.