सोन्याच्या पावलाने
भजन - स्तुती Posted at 2018-10-12 02:05:34
सोन्याच्या पावलाने
सोन्याच्या पावलाने महालक्षुमी आली , ओवाळीतो कापराने भक्ती प्रसन्न झाली ॥ कुंकवाने घातला सडा , मुखी तांबूल विडा , हाती शोभे हिरवा चूडा , दिला प्रसादाचा विडा ॥ नेत्रांच्या लावल्या वाती , पंचप्राणांच्या ज्योती , आरती भक्त जन गाती , तेथे अंबिकेची वस्ती ॥ भाव भक्तींच्या केल्या माळा , घातल्या अंबिकेच्या गळा , पायी वाजे घुंगुरवाळा , केला नवरात्राचा सोहळा ॥ अंबिकेची भरली ओटी , लावली चंदन उटी , किर्ती तुझी जगजेठी , झाली दर्शनाला दाटी ॥
Search
Search here.