श्रीस्वामी समर्थ आरती2
आरती > श्री स्वामी समर्थ आरती Posted at 2018-11-17 03:33:52
आरती स्वामी राजा ।
कोटी आदित्यतेजा । तु गुरु मायबाप ।
प्रभू अजानुभुजा । आरती स्वामी राजा ॥धृ॥
पुर्ण ब्रम्ह नारायण । देव स्वामी समर्थ । कलीयुगी अक्कलकोटी । आले वैकुंठ नायक । आरती स्वामी राजा ॥१॥
लीलया उध्दरिले । भोळे भाबडे जन । बहुतीव्र साधकासी । केले आपुल्या समान ।
आरती स्वामी राजा ॥२॥
अखंड प्रेम राहो । नामी ध्यानी दयाळा । सत्यदेव सरस्वती । म्हणे आम्हा सांभाळा । आरती स्वामी राजा ॥३॥
Search
Search here.