आरती सप्रेम जयजय स्वामी गजवदना

आरती  > गणेश आरती Posted at 2018-10-11 16:58:16
आरती सप्रेम जयजय स्वामी गजवदना आरती सप्रेम जयजय स्वामी गजवदना । तुझिया स्मरणें जाति पातकें पार्वतीनंदना । मोरया पार्वतीनंदना ॥ धृ ॥ मस्तकी मुकुट जडिताचा शोभतो जाण । कानी कुंड्लांची दिपकें झळकती परिपूर्ण ॥ पायीं घुंगुर वाळे घालुनी शोभती चरण । तुझिया दोंदावरी कंठी पदक घालुन ॥ १ ॥ मूषक वाहनावरी स्वारी करोनियां फिरसी । चंद्रम तुजला हांसे म्हणोनि शाप दिधलासी ॥ तेहतीस कोटी देव मिळोनि प्रार्थियलें तुजसी । दया करा महाराज उ:शाप देउनियां त्यासी ॥ २ ॥ भाद्रपद चतुर्थीचा दिवस सुदिन । त्या दिवशीं या चंद्रमाचे पाहूं नये वदन । हाच शाप दिधला त्यासी ऎका हो जन । जे जन पाहतील मुख त्यांसी दु:खपीडा जाण ॥ ३ ॥ वत्सें रक्षित असतां कृष्णें सोम पाहिला । स्यमंतक मणि जाबुवंते गृहासमिप नेला । आळ आला श्रीकृष्णावरी क्रोधातें चढला । शोधालागीं जातां तेव्हां जांबुवंत मिळाला ॥ ४ ॥ रामचंद्रे जांबुवंते होतें बोलणें । यास्तव आतां जाणे झाले युद्धाकारणें । युद्ध प्रसंग टळला तेव्हां कन्या देऊन । मणि आधन दिधला तेव्हा आले परतुन ॥ ५ ॥ सत्राजिता श्रीकृष्णाने मणि तो दिधला । असत्य भाषण करितां त्यांसी क्रोध बहु आला । सत्यभामा बोलावुनि दिधली कृष्णाला । मणि आंदण देऊनि त्यासी समाधान केला ॥ ६ ॥ गोपिकांचे गृही श्रीहरी भक्ती नवनीर । गोपी जाऊनि यशोदेपाशी सांगती वृत्तांत । कृष्ण तुझा चांडाळ येऊनि धरी अमुचा हस्त । काय सांगू यशोदे त्याची करणी अघटीत ॥ ७ ॥ ऎसी वार्ता कानी पडतां माता घाबरली । जाईनि एकदंतापाशी नवस बोलली । संकष्टीची व्रतें तुझी करीन मी आगळी ॥ ८ ॥ यशोदेचे नवस पूर्ण झाले म्हणोनिया । व्रतें तुझी नरनारी करतील मोरया । पतित मी आळशी माझी मतिमंद काया । दास म्हणे माझें मस्तक नित्य तुझे पायी ॥ ९ ॥

Search

Search here.