दत्त / स्वामी / साई आरती

आरती  > श्री दत्तात्रेय आरती Posted at 2018-12-09 04:26:28
सद्गुरू / दत्त / स्वामी / साई - आरती ( या भजनात साई शब्द ऐवजी इतर म्हणजे स्वामी / अवधूत / सद्गुरू असे शब्द वापरून सुद्धा म्हणतात )  ऐसा यई बा । साई दिगंबरा । अक्षयरुप अवतारा । सर्वहि व्यापक तूं । श्रुतिसारा । अनुसयाsत्रिकुमारा ।। धृ० ।। काशी स्नान जप, प्रतिदिवशीं । कोल्हापुर भिक्षेसी । निर्मल नदि तुंग, जल प्राशी । निद्रा माहुर देशीं ।। ऐसा० ।। 1 ।। झोळी लोंबतसे वामकरीं । त्रिशूल-डमरु-धारी । भक्तां वरद सदा सुखकारी । देशील मुक्ती चारी ।। ऐसा० ।। 2 ।। पायीं पादुका जपमाला , कमंडलू मृगछाला । धारण करिशी बा । नागजटा मुगुट शोभतो माथां ।। ऐसा० ।। 3 ।। तत्पर तुझ्या या जे ध्यानीं । अक्षय त्यांचे सदनीं । लक्ष्मी वास करी दिनरजनीं । रक्षिसि संकट वारुनि ।। ऐसा० ।। 4 ।। या परि ध्यान तुझें गुरुराया । दृश्य करीं नयनां या । पूर्णानंदसुखें ही काया । लाविसि हरिगुण गाया ।। ऐसा० ।। 5 ।।

Search

Search here.