श्री स्वामी समर्थ आरती1

आरती  > श्री स्वामी समर्थ आरती Posted at 2018-11-17 02:24:26
जय देव , जय देव , जय श्री स्वामी समर्था , जय श्री स्वामी समर्था । आरती ओवाळू चरणी ठेउनिया माथा ।।धृ।। छेलि खेडे ग्रामी तु अवतरलासी , राया अवतरलासी । जग्दउध्दारासाठी राया तु फिरसी । भक्तवत्सल खरा तु एक होसी , राया एक होसी। म्हणुनी शरण आलो तव चरणासी । जय देव, जय देव० ॥१॥ त्रैगुण-परब्रम्ह तुझा अवतार , तुझा अवतार । त्याची काय वर्णु लिला पामर । शेशादिक क्षीणले नलगे त्या पार , नलगे त्या पार । तेथे जडमुढ कैसा करु मी विस्तार । जय देव, जय देव० ॥२॥ देवाधिदेवा तु स्वामी राया , तु स्वामी राया । निरजर मुनीजन ध्याती भावे तव पाया । तुझसी अर्पण केली आपुली ही काया , आपुली ही काया । शरणागता तारी तु स्वामी राया । जय देव, जय देव० ॥३॥ अघटीत लिला करुनी जडमुढ उध्दारिले , जडमुढ उध्दारिले । किर्ती एकूनी कानी चरणी मी लोळे । चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले , मज हे अनुभवले । तुझ्या सुता नलगे चरणा वेगळे । जय देव, जय देव० ॥४॥

Search

Search here.