श्री स्वामी समर्थ स्तवन

स्तोत्र - मंत्र  > श्री स्वामी समर्थ स्तोत्र Posted at 2018-11-28 05:53:01
श्री स्वामी समर्थ स्तवन नाही जन्म नाही नाम | नाही कुणी माता पिता | प्रगटला अदभुतसा | ब्रह्मांडाचा हाच पिता || १ || नाही कुणी गुरुवर | स्वये हाच सुत्रधार | नवनाथी आदिनाथ | अनाथांचा जगन्नाथ || २ || नरदेही नरसिंह | प्रगटला तरुपोटी | नास्तिकाच्या कश्यपूला |आस्तिकाची देण्यागती || ३ || कधी चाले पाण्यावरी | कधी धावे अधांतरी | यमा वाटे ज्याची भीती | योगीश्वर हाच यती || ४ || कधी जाई हिमाचली | कधी गिरी अरवली | कधी नर्मदेच्या काठी | कधी वसे भीमातटी || ५ || कालीमाता बोले संगे | बोले कन्याकुमारीही | अन्नपूर्णा ज्याचे हाती | दत्तगुरु एकमुखी || ६ || भारताच्या कानोकानी | गेला स्वये चिंतामणी | सुखी व्हावे सारे जन | तेथे धावे जनार्दन || ७ || प्रज्ञापुरी स्थिर झाला | माध्यान्हीच्या रविप्रत | रामानुज करी भावे | स्वामी पदा दंडवत || ८ || || श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, ॐ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ || २८ स्तवने = १ मंडळ, अशी २८ मंडळे केल्यास संकट , अरिष्ट दूर होते. आपले पठण पूर्ण झाल्यावर किंवा निदान फलप्राप्ती झाल्यानंतर घरी ब्राह्मणाला बोलावून एखादे सत्कर्म ( स्वामी पूजन अर्चन - अभिषेक - होम हवन जे जमेल ते इत्यादी )   करावे. ||  श्री स्वामी समर्थ || 

Search

Search here.