श्रीस्वामी समर्थ तारकमंत्र

स्तोत्र - मंत्र  > श्री स्वामी समर्थ स्तोत्र Posted at 2018-03-30 15:26:22
अत्यंत खडतर परिस्थिती असेल तर संपूर्णपणे श्री स्वामी समर्थाना शरण जाऊन या मंत्राचे भक्ती श्रद्धायुक्त अंतःकरणाने सतत - नित्य / अनेक वेळा पठण करावे.. सर्व अडचणी दूर होऊन स्वामींच्या कृपेने सौख्य समाधान प्राप्त होते.. याचा अनेकांना अनुभव आहे .. परंतु आपल्या उपासने बरोबर आपले कष्ट - प्रयत्न चालूच ठेवावे , कारण ईश्वर त्यालाच मदत करतो जो स्वतः कष्ट - प्रयत्न करतो.. स्वामींसमोर धूप दिप लावून खडीसाखरेचा नेवैद्य - प्रसाद ठेवून हा मंत्र सतत म्हणावा.. जर त्रास अति असेल तर हातात पाणी भरलेले फुलपात्र घेऊन या मंत्राचे अनेकवेळा पठण करून ते पाणी सर्वांनी प्यावे तसेच सर्व घरातून - जागेतून कोपऱ्याकोपऱ्यात शिंपडावे.. ।। श्री स्वामी कृपातीर्थ तारकमंत्र ।। निशंक हो, निर्भय हो मना रे, प्रचंड स्वामी बळं पाठीशी रे । अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी ।। १ ।। जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय । आज्ञेविणा काळ ना नेई त्याला, परलोकीही ना भिती तयाला ।। २ ।। उगाची भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळूदे । जगी जन्म म्रुत्यु असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा ।। ३ ।। खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होशी त्याविण तू स्वामी भक्त । कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ ।। ४ ।। विभूती नमननाम ध्यानांदी तीर्थ, स्वामीच या पंचप्राणामॄतात । हे तीर्थ घेई, आठवी रे, प्रचिती, न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती ।। ५ ।। श्री स्वामी चरणाविंदार्पणमस्तू ..... ... ।। ऊँ श्री स्वामी समर्थ ।। ...

Search

Search here.