तुला मोदक आवडे फार रे

भजन - स्तुती Posted at 2018-10-12 15:38:38

तुला मोदक आवडे फार रे

श्री गजानना श्री गजानना , पार्वती च्या सुकुमार रे | तुला मोदक आवडे फार रे  ||धृ|| सुदंर दिसतो सिंहासनी बसतो , मोदक भक्षितो फार रे ||१|| दुर्वा हरळी बहु प्रेमाची , शिंदुर चर्चितो लाल रे ||२|| मी बालक रे तु पालक रे , करि विघ्नाचा संहार रे ||३|| अग्र पुजेचा तु अधिकारी , भक्ताना सांभाळ रे ||४|| एका जनार्दनी म्हणे रमापती , सेवक गुंफीतो हार रे ||५|| भाद्रपदाची गणेश चतुर्थी , दरवर्षी येणार रे ||६|| तुला मोदक आवडे फार रे ...

Search

Search here.