तुळशीची आरती २

आरती  > संकीर्ण इतर आरती Posted at 2019-02-07 06:26:43
तुळशीची आरती २ तुळसीमळमृत्तिका जो लावी भाळीं । अनुदिनी तुळसी तीर्थी करितो आंघोळि ॥ तुळसीकाष्ठीं ग्रीवा मंडित वनमाळी । त्याच्यासंगे राहे हरि सर्वकाळीं ॥ १ ॥ जय देवी जय देवी जय माये तुळसी । अक्षय मोक्षाचें निजपद भावें देसी ॥ धृ. ॥ मंजरिया हो तुझ्या वज्राच्या धारा । पापाचें पर्वत जळती तनुभारा ॥ आले यमकिंकर म्हणती रविकुमरा । तुळसीमूळें न दिसे पापासी थारा ॥ जय. ॥ २ ॥ तुझिया एका दळे सोडविले देव । म्हणुनि तुझ्या चरणीं धरिला दृढ भाव ॥ वृन्दे वस्तीसी तूं मज देई ठाव । मुक्तेश्वर म्हणे पै मुख्य सद्‌भाव ॥ जय. ॥ ३ ॥

Search

Search here.