उदक शान्ति पूजा सामान लिस्ट
यज्ञ - शान्ति > पूजा शान्ति साहित्य यादी Posted at 2018-12-15 13:50:09
--- उदक शान्ति पूजा सामान लिस्ट ---
हळद , कुंकू , चंदन , अष्टगंध , अबीर - बुक्का , गुलाल
समयी , निरांजन , दिव्यासाठी तेलाच्या तूपाच्या वाती - कापूस , माचीस , गायीचे तूप व तिळाचे तेल दिव्यासाठी
अगरबत्ती , धूप , कापुर
पळी भांडे - फुलपात्र
घरातील गणपती मूर्ती - तांबे पितळ पंचधातु इत्यादीची ( नसल्यास फोटो / नारळ / सुपारी ) , व शंख , घंटी जे असेल ते
पंचामृत वाटीभर ( दूध + दही + तूप + मध + साखर ) ..
सुपाऱ्या 21 , लाल - पिवळे - हिरवे वस्त्र ब्लाउजपिस
एक स्टील चे भांडे ( निर्माल्य पाणी वैगेरे काढण्यासाठी )
घरातील फोटोना हार , दरवाजाला हार तोरण आंब्याची डहाळी , रांगोळी , पूजेसाठी सुद्धा आंब्याची पाने डहाळी
गंगाजल , गोमूत्र , विड्याची पाने 25
11 हळकुंड , 11 अक्रोड , 11 खारीक , 21 लवंग , 21 वेलची , मिक्स सुकामेवा ड्रायफ्रूट
21 कॉइन्स - सुट्टे पैसे ( एक किंवा 2 रू चे कॉइन्स ) , 10 रू च्या 05 नोटा , 50 च्या 4 नोटा
वेगवेगळी रंगीत फुले ( तेरडा नको ) , तुळशीपत्र , बेलपत्र , दुर्वा , गजरे व वेण्या 2 - 3 ,
बसण्यासाठी धुतलेल्या चादर / बेडशीट / आसन वैगेरे
हात पुसण्या साठी - देव पुसण्यासाठी - देवाची भांडी पुसण्यासाठी 2 ते 3 स्वच्छ धुतलेले नॅपकिन / वस्त्र / हातरुमाल
हाताला बांधायाचा नाडा - धागा ( लाल / पंचरंगी ) आणि जानवे जोड 3
एक दोन शेणी ( गोवरी ) व गुग्गुळ वैगेरे धूप व कापुर
देवासाठी ---> एक पंचा किंवा उपरणे , एक टॉवेल , एक नॅपकिन ( नवीन )
देवाला गुरुजींना दान म्हणून धोतर उपरणे किंवा शर्ट पॅन्ट पीस , आणि एक् साडी ( दान म्हणून , जमल्यास , कंपल्सरी नाही .. दोन्ही पैकी एक असले तरी हरकत नाही )
5 फळे , 5 नारळ , 2 खोबरेवाट्या , 100 ग्राम गूळ , 100 ग्राम खडीसाखर ,
250 ग्राम पेढे , तसेच नंतर वाटीभर भात बिन मिठाचा ,
3 तांब्या / पितळेचे कलश व 2 ते 3 ताम्हण
सव्वा किलो गहू , सव्वा किलो बारीक तांदूळ
नवग्रहांची धान्ये प्रत्येकी 250 ग्राम वेगवेगळे पिशवीत पुडीत धान्य किंवा डाळी च्या स्वरूपात ( --> तूर - मूग - मटकी - वाटाणा - चवळी - हरभरा - चणा डाळ - ज्वारी - बाजरी - पांढरे तीळ - शेंगदाणे - रवा - साबुदाणा - साखर ) शक्य असल्यास जमल्यास )
देवाच्या तसेच आपल्या पूर्वजांच्या फोटोला हार घालणे ..
जर एखाद्याच्या मृत्यूनंतरची उदकशांती असल्यास त्या मृत व्यक्तीचा फोटो .. तसेच त्या व्यक्ती प्रित्यर्थ काही वस्तू - साहित्य वगैरे दान देणे असल्यास ते साहित्य ..
घर - जागा स्वच्छ करावी , गोमूत्र गंगाजल शिंपडावे , दरवाजाला हार तोरण लावावे , रांगोळी काढावी , घरातील देवाच्या फोटोना वैगेरे हार घालावे , .. हळद , कुंकू वैगेरे वाट्यांमध्ये काढून ठेवावे ..
पूजेच्या दिवशी उपवास असेल - उपवासासाठी फराळ म्हणून वेफर्स / राजगिरा चिकी - लाडू , चहा कॉफी वेगेरे चालेल , पूजेच्या काही दिवस आधीपासून तसेच काही दिवस नंतर पर्यंत शाकाहार असावा ,
पूजेला बसणार्याने धुतलेले स्वच्छ वस्त्र धारण करावे ( काळा - लाल - हिरवा आदी भडक रंग नसावा )
मोबाईल वैगेरे बंद ठेवावा किंवा दुसऱ्यांना द्यावा . सर्व लक्ष पूजेकडेच द्यावे ..
------------ ----------- ----------- --------- ---------
----------- विशेष सूचना ---------
या सर्व पूजा यज्ञ साहित्य याद्या / लिस्ट अनेकांची मते विचारात घेऊन बनवलेल्या आहेत .. यादितील साहित्य किंवा संख्या यामध्ये स्थळ - प्रांत विभाग / ब्राह्मण शाखा / पद्धत रीती रिवाज या प्रमाणे कमी जास्त तो बदल होऊ शकतो , या साठी हे एवढेच् कसे / असेच का / एवढी संख्या वैगेरे वैगेरे अशा तक्रार ना करता या याद्यांचा लाभ घ्यावा .. इतरांना पाठवताना स्वतः त्यामध्ये योग्य तो बदल करावा. काही सूचना - सुधारणा असल्यास नक्की कळवावे..
या याद्या सिलेक्ट करून कॉपी पेस्ट / शेअर होतात .. हवा तो बदल करून फॉरवर्ड करू शकतात.
धन्यवाद ...
Search
Search here.