वास्तुशांति सामान लिस्ट
यज्ञ - शान्ति > पूजा शान्ति साहित्य यादी Posted at 2018-09-19 13:54:29
-- वास्तू शांती हवन सामान लिस्ट --
हळद , कुंकू , चंदन , अष्टगंध
समयी , निरांजन , दिव्यासाठी तेलाच्या तूपाच्या वाती - कापूस , माचीस
अगरबत्ती , धूप , कापुर
पळी भांडे - फुलपात्र
घरातील गणपती मूर्ती - तांबे पितळ पंचधातु इत्यादीची
शंख , घंटी
वास्तू प्रतिमा , ध्रुव प्रतिमा , पंच रत्ने , सुवर्ण शलाका ( सोन्याची तार ) , 4 नाग
( वास्तू ध्रुव प्रतिमा सोन्याची - चांदीची - तांब्याची - पंचधातु ची वेगेरे जे शक्य असेल ते घ्यावे.. नाग मात्र चांदीचे घेतले तरी चालतील )
एक साधी मातीची पणती
पंचामृत वाटीभर ( दूध + दही + तूप + मध + साखर )
सुपाऱ्या - 12 छोट्या व 12 मोठया ( किंवा सर्वच मोठ्या सुपार्या )
8 ते 10 पत्रावळी , 2 ते 3 मोठी ताटे ,
5 ते 7 वाट्या किंवा पत्रावळीचे द्रोण , 2 - 3 पळी / चमचे , रद्दी पेपर
एक दोन स्टील चे भांडे ( निर्माल्य पाणी वैगेरे काढण्यासाठी )
घरातील फोटोना हार , दरवाजाला हार - तोरण - आंब्याची डहाळी , रांगोळी , पूजेसाठी सुद्धा आंब्याची पाने - डहाळी
गंगाजल , गोमूत्र , विड्याची पाने 35
21 हळकुंड , 21 अक्रोड , 21 खारीक , 21 लवंग , 21 वेलची
35 कॉइन्स - सुट्टे पैसे ( एक किंवा 2 रू चे कॉइन्स ) , 10 रू च्या 12 नोटा , 50 च्या 4 नोटा , 100 च्या 4 नोटा
वेगवेगळी रंगीत फुले ( तेरडा नको ) , तुळशीपत्र , बेलपत्र , दुर्वा , गजरे व वेण्या 2 - 3
बसण्यासाठी धुतलेल्या चादर / बेडशीट / आसन वैगेरे
हात पुसण्या साठी - देव पुसण्यासाठी - देवाची भांडी पुसण्यासाठी 2 ते 3 स्वच्छ धुतलेले किंवा नवीन नॅपकिन / वस्त्र / हातरुमाल
हाताला बांधायाचा नाडा - धागा ( लाल / पंचरंगी ) आणि जानवे जोड 3
चौरंग व पाट मिळून टोटल सहा - सात
देवासाठी / दानासाठी ---> 2 - 3 ब्लॉउज पीस , एक पंचा - उपरणे , एक टॉवेल , एक नॅपकिन ,
एक धोतर उपरणे किंवा शर्ट पॅन्ट पीस , एक् साडी ,
एक नवीन कलश व ताम्हण व पळीभांडे ( दान म्हणून ) जमल्यास शक्य असल्यास , कंपल्सरी नाही ..
8 फळे , 9 नारळ , 3 खोबरेवाट्या , 100 ग्राम गूळ , 100 ग्राम खडीसाखर
3 ते 4 तांब्या / पितळेचे कलश व 2 ते 3 ताम्हण
3 किलो गहू , 4 किलो बारीक तांदूळ , दीड किलो बारीक तांदूळ कणी / भगर
नवग्रहांची धान्ये प्रत्येकी 250 ग्राम वेगवेगळे पिशवीत पुडीत धान्य किंवा डाळी च्या स्वरूपात ( --> तूर - मूग - मटकी - वाटाणा - चवळी - हरभरा - चणा डाळ - पांढरे तीळ - शेंगदाणे - रवा - साबुदाणा - साखर )
गायीचे तूप अर्धा पाऊण किलो
काळे तीळ अर्धा पाऊण किलो
शेणाच्या गोवऱ्या 4 - 5 शेण्या , हवना साठी इंधन म्हणून 3 किलो लाकडे , तसेच समिधाचे 6 बंडल
होम हवना साठी 10 - 15 विटा किंवा यज्ञपात्र हवन पात्र , आणि थोडी रेती / वाळू / माती
घर - जागा स्वच्छ करावी , गोमूत्र गंगाजल शिंपडावे , दरवाजाला हार तोरण लावावे , रांगोळी काढावी , घरातील देवाच्या फोटोना वैगेरे हार घालावे ,
पूजेच्या दिवशी उपवास असेल - उपवासासाठी फराळ म्हणून वेफर्स / राजगिरा चिकी - लाडू वेगेरे आणावीत , पूजेच्या काही दिवस आधीपासून तसेच काही दिवस नंतर पर्यंत शाकाहार असावा , ( 21 दिवस आधी व नंतर ) ,
पूजेला बसणार्याने धुतलेले स्वच्छ वस्त्र धारण करावे ( काळा - लाल - हिरवा आदी भडक रंग नसावा )
महत्वाचे -- या सर्व पूजा यज्ञ साहित्य याद्या / लिस्ट अनेकांची मते विचारात घेऊन बनवलेल्या आहेत .. यादितील साहित्य किंवा संख्या यामध्ये स्थळ - प्रांत विभाग / ब्राह्मण शाखा / पद्धत रीती रिवाज या प्रमाणे कमी जास्त तो बदल होऊ शकतो , या साठी हे एवढेच् कसे / असेच का / एवढी संख्या ??? वैगेरे वैगेरे अशा तक्रार न करता या याद्यांचा लाभ घ्यावा .. इतरांना पाठवताना स्वतः त्यामध्ये योग्य तो बदल करावा. काही सूचना - सुधारणा असल्यास नक्की कळवावे.. धन्यवाद ...
महत्वाचे -- या सर्व पूजा यज्ञ साहित्य याद्या / लिस्ट अनेकांची मते विचारात घेऊन बनवलेल्या आहेत .. यादितील साहित्य किंवा संख्या यामध्ये स्थळ - प्रांत विभाग / ब्राह्मण शाखा / पद्धत रीती रिवाज या प्रमाणे कमी जास्त तो बदल होऊ शकतो , या साठी हे एवढेच् कसे / असेच का / एवढी संख्या ??? वैगेरे वैगेरे अशा तक्रार न करता या याद्यांचा लाभ घ्यावा .. इतरांना पाठवताना स्वतः त्यामध्ये योग्य तो बदल करावा. काही सूचना - सुधारणा असल्यास नक्की कळवावे.. धन्यवाद ...
Search
Search here.