टेंबे स्वामी आरती

आरती  > श्री सद्‌गुरु आरती Posted at 2018-11-30 05:41:22
श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांची सद्गुरु डाँ. रामचंद्र महाराज पारनेरकर यांनी लिहलेली आरती आरती भक्तीभावे करुनी, स्मरुया गुरु अंतःकरणी।।धृ।। सद्गुरु तोची कृपामुर्ती, देत मज कवणाची स्फुर्ती त्रिभुवन अगाध गुरुमहिमा, कळेना निगमासही सीमा जेथे वाल्मीकी व्यास ऋषी थकले शक्य कसे मजसी. परी तो सदय गुरुराणा, वसतसे भक्तांच्या ध्याना तोची मती देत,मुका वदवित, पंगु गिरीचढत जयाची अतर्क्यही करणी, तयाच्या लागतसे चरणी ।।१।। होतो अवनीला भार, कराया त्याचा परिहार जगाला करावया पुनीत, दत्तगुरु युगेयुगे येत चिरंतन परंपरा गुरुची, वहाते गंगा योगाची. ज्या गृही पतिव्रता नारी, प्रभुचा जन्म तिचे दारी नृसिंह सरस्वती, नाथ प्रभुती, सिद्धसांगती श्रीमद वासुदेव स्वामी, सतसंकल्पी गुरुवाणी।।२।। पोळलो तिन्ह ही तापाने, बुडालो स्वकृत पापाने, षड्रिपु छळती सदाकाळी, मती मम नष्टभ्रष्ट झाली गेला जन्म फुकट गेला, असा हा निश्चय मनी झाला सद्गुरु सदा सर्वकाळ, माता होऊनी सांभाळ तुच माऊली, तुच सावली, बहुत तारली करावा सार्थ जन्म स्वामी, मज ह्रदयासी लावुनी ।।३।। जयजय सद्गुरु सर्वेषा,शिष्य तारक परमेशा जन्मुनी ब्रह्मवर्त देशी, केले तप गंगे पाशी. घेऊनी सुखे चौथी दिक्षा, मानीले वेदाच्या पक्षा. होई अवतार मुळारंभ, वर्षीतो भक्तीचा मेघ भक्ती ऊधळीत, द्यान ऊजळीत, योग साधीत सद्गुरु वासुदेव स्वामी तयाच्या लागतसे भजनी।।४।।    सद्गुरु विष्णुमहाराज पारनेरकर संकल्पीत कविश्रेष्ठ श्रीदासोपंत विरचीत श्रीदत्तमहात्म ग्रंथातुन सादर.

Search

Search here.