येई हो विठ्ठले माझे माउली ये

आरती  > विठ्ठल आरती Posted at 2018-03-29 14:44:00
येई हो विठ्ठले माझे माउली ये निढळावरि कर ठेवूनि वाट मी पाहे ।। ध्रु॰ ।। आलिया गेलिया हाती धाडी निरोप पंढरपुरी आहे, पंढरपुरी आहे माझा मायबाप ।। १ ।। पिवळा पीतांबर कैसा गगनी झळकला गरुडावरी बैसूनि माझा कैवारी आला ।। 2 ।। विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिपवाळी विष्णूदास नामा, विष्णूदास नामा, जीवेभावे ओवाळी ।। ३ ।।

Search

Search here.