श्री योगेश्वरी आरती

आरती  > देवी आरती Posted at 2019-02-09 04:28:56
श्रीयोगेश्र्वरीची आरती धन्य अंबापुर महिमा विचित्र । पार्वती अवतार योगिनी क्षेत्र । दंतासुर मर्दोनि केलें चरित्र । सिद्धांचे स्थळ ते महा पवित्र । जयदेवी जयदेवी जययोगेश्र्वरी । महिमा न कळे तुझा वर्णिता थोरी । जयदेवी जयदेवी ॥ १ ॥ पतित पावन सर्व तीर्थ महाद्वारीं । माया मोचन सकळ माया निवारी । साधका सिद्धि वानेच्या तीरीं । तेथील महिमा वर्णूं न शके वैखरी । जयदेवी जयदेवी जययोगेश्र्वरी । महिमा न कळे तुझा वर्णिता थोरी । जयदेवी जयदेवी ॥ २ ॥ सिद्ध लिंग स्थळ परम पावन । नरसिंह क्षेत्र तेथें नृसिंह वदन । मूळ पीठ रेणागिरी नांदे आपण । संताचें माहेर गोदेवी स्थान । जयदेवी जयदेवी जययोगेश्र्वरी । महिमा न कळे तुझा वर्णिता थोरी । जयदेवी जयदेवी ॥ ३ ॥ महा रुद्र जेथें भैरव अवतार । काळभैरव त्याचा महिमा अपार । नागझरी तीर्थ तीर्थांचें सार । मार्जन करितां दोष होती संहार । जयदेवी जयदेवी जययोगेश्र्वरी । महिमा न कळे तुझा वर्णिता थोरी । जयदेवी जयदेवी ॥ ४ ॥ अनंतरुप शक्ति तुज योग्य माते । योगेश्र्वरी नाम त्रिभुवन विख्याते । व्यापक सकळां देहीं अनंत गुण भरिते । नीलकंठ ओवाळूं कैवल्य माते । जयदेवी जयदेवी जययोगेश्र्वरी । महिमा न कळे तुझा वर्णिता थोरी । जयदेवी जयदेवी ॥ ५ ॥

Search

Search here.