येई हो विठ्ठले माझे माउली ये
येई हो विठ्ठले माझे माउली ये
निढळावरि कर ठेवूनि वाट मी पाहे ।। ध्रु॰ ।।
आलिया गेलिया हाती धाडी निरोप
पंढरपुरी आहे, पंढरपुरी आहे माझा मायबाप ।। १ ।।
पिवळा पीतांबर कैसा गगनी झळकला
गरुडावरी बैसूनि माझा कैवारी आला ।। 2 ।।
विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिपवाळी
विष्णूदास नामा, विष्णूदास नामा, जीवेभावे ओवाळी ।। ३ ।।