कडकडिला स्तंभ गडगडिले गगन

कडकडिला स्तंभ गडगडिले गगन
अवनी होत आहे कंपायमान
तडतडली नक्षत्रे पडताती जाण
उग्ररूपे प्रगटे तो सिंहवदन ।। १ ।।

जयदेव जयदेव जय नरहरीराया
आरती ओवाळू महाराजवर्या ।। ध्रु॰ ।।

एकवासी स्वर्गमाळा डळमळली कैसी
ब्रह्मयाच्या वाटे अभिनव चित्तासी
चंद्रसूर्य दोन्ही लोपती प्रकाशी
कैलासी शंकर दचके मानसी ।। २ ।। जय…

थरथरती त्या जटा जिव्हा लळलळित
तीक्ष्ण नखे तो दैत्य बिदारिन
अर्धांगी कमलजा शिरी छाया धरीत
माधवदास स्वामी नरहरी शोभत ।। ३ ।। जय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!